१३ जुलै १९८५ चा तो दिवस…शनिवार होता. लंडनच्या वेम्बल स्टेडियम बाहेर लाईव्ह एड या म्युझिक इवेंटसाठी हजारोंच्या संख्येने संगीतप्रेमी जमले होते. रॉक आणि पॉप म्यूझिकमधले डायर स्ट्रेट्स, यूटू, डेव्हिड बोव्ही, द व्हू, एल्व्हिस कोस्टेलो, पॉल मॅककार्टनी असे दिग्गज या कॉन्सर्टला परफॉर्म करणार होते. त्यात अजून एक रॉक बँड परफॉर्म करणार होता, ज्यांचं नाव होतं क्वीन ! या बँडचा लिड सिंगर फ्रेडी मर्क्युरी स्टेजवर आला. त्यासोबतच इतर मेंबर ब्रायन मे, रॉजर टेलर, जॉन डिकन तयार झाले. एवढ्यात फ्रेडी मर्क्युरीने पियानोवर बसला. त्याने आपल्या Bohemian Rhapsody या गाण्याची सुरुवात केली. जशी त्याने पहिलीच पियानोची की वाजवली, एवढ्यात संपूर्ण उपस्थित पब्लिकच्या आवाजाने अक्षरशः भूकंप यायचा बाकी होता. स्टेडियम दणाणून उठला होता आणि तेवढ्यात फ्रेडी मर्क्युरी गाऊ लागला… (इथे मर्क्युरीचा song चा पार्ट) एक काळ होता की, याच फ्रेडी मर्क्युरीची क्रेझ मायकल जॅक्सनपेक्षा जास्त होती. त्याच्या गाण्यांनी संपूर्ण जगाला अक्षरशः वेड लावलं. विशेष म्हणजे हा रॉकस्टार फ्रेडी मर्क्युरी चक्क भारतीय होता. आज या फ्रेडी मर्क्युरीचा प्रवास आपण जाणून घेऊ. (Freddie Mercury)
पारशी धर्माची सध्याची लोकसंख्या केवळ लाख-दीड लाखांच्या आसपास… म्हणजे पाहायला गेल तर कोटींच्या लोकसंख्येत पारशी लोकं पोहोचले देखील नसतील. तरीही जागतिक पातळीवर आपली छाप सोडणारे अजरामर व्यक्तिमत्व या धर्माने जगाला दिले. यात टाटा कुटुंब, अर्देशीर गोदरेज, फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ, दादाभाई नौरोजी, दिनशॉ पेटीट, and होमी भाभा असे अनेक जगप्रसिद्ध व्यक्ती आले. यामध्ये प्रामुख्याने घेतलं जाणार नाव म्हणजे फ्रेडी मर्क्युरी… आता अशा ब्रिटिश नावामुळे तुम्ही गोंधळून जाल पण त्याचं मूळ नाव होत, फारुख बुलसारा…! फ्रेडी मर्क्युरी नाव कसं आलं ? (Freddie Mercury)
फ्रेडीचा जन्म तसा टांझानियामधल्या झांझीबारमध्ये झाला होता. पण ते मूळचे भारतीय पारशी होते. आईचं नाव जेर आणि वडिलांचं नाव बोमी बुलसारा… त्याची एक बहीणसुद्धा होती जिचं नाव काश्मीरा होतं. त्याचं मूळ गाव गुजरातमधलं वलसाड… पण वडिलांच्या जॉबमुळे ते टांझानियाला शिफ्ट झाले होते. मात्र फ्रेडीच्या जन्मानंतर त्यांना भारतात पाठवण्यात आल. आणि भारतातच त्याच्या संगीताचा खरा प्रवास सुरू झाला. वयाच्या सातव्या वर्षी फ्रेडी पियानो वाजवायला शिकला. यानंतर १९५४ साली फ्रेडीला साताऱ्यातील पाचगणीमधल्या सेंट पिटर्स स्कूलमध्ये धाडण्यात आलं. म्युझिकसोबत त्याला स्टँप गोळा करण्याचीही आवड होती. शाळेत वयाच्या अवघ्या १२व्या वर्षी त्याने ‘द हेक्टिक्स’ हा रॉक बँड तयार केला. शाळेतच तो स्वतःला फ्रेडी म्हणवून घ्यायचा. फ्रेडीची एक विशेष गोष्ट म्हणजे तो फोर ऑक्टेव्ह मध्ये गायचा. ही गळ्यातली सर्वात हाय व्होकल रेंज असते. एकंदरीत संगीताची आवड फ्रेडीला भारतातच लागली होती. (Freddie Mercury)
यानंतर १९६४ दरम्यान त्याचं कुटुंब इंग्लंडला निघालं. थोडेफार पैसे काढण्यासाठी फ्रेडी हिथ्रो एअरपोर्टला काम करायला लागला. इथेच त्याची भेट ड्रमर रॉजर टेलरसोबत झाली. रॉजरला रॉक म्युझिकची प्रचंड आवड… त्यामुळे दोघांनी १९६९ मध्ये दोघेही व्रेकेज नावाच्या बँडमध्ये सामील झाले. आणि नंतर त्यांच्या जोडीला गिटारिस्ट ब्रायन मे आणि बेस गिटारिस्ट जॉन डीकन आला आणि त्यांनी एक नवीन बँड सुरू केलं ज्याचं नाव होत स्माईल ! पण स्माईल नावसुद्धा जास्त काळ टिकू शकलं नाही आणि अखेर फ्रेडीने आपल्या बँडचं नाव क्वीन करून घेतलं. यासोबत त्याने स्वतःच अधिकृत असलेलं फारुख बुलसारा हे नाव बदलून फ्रेडी मर्क्युरी करून घेतलं. (History)
८० च्याच दशकात त्यांचा पहिला अल्बम आला. यानंतर त्यांचा बँड यूरोपमध्ये चांगलाच गाजायला लागला. मोठाले साउंड सिस्टम, लाईट्स, पायरोटेक्निक्स, आगळे वेगळे कॉन्सच्यूम्स एखादा थिएट्रीकल एक्सपिरियन्स देणारे असायचे. त्यांची ‘bohemian Rhapsody’, किलर क्वीन, वी विल रॉक यू, समबॉडी टू लव्ह, डोंट स्टॉप मी नाऊ, वी आर द चँपियन्स, व्हू वाँट्स टू बी लिव्ह फॉरेव्हर ही गाणी तर इतकी गाजली की आजही सर्वांच्या मुखात आहेत. फ्रेडीने लिहिलेलं आणि गायलेलं ‘बोहेमियन ऱ्हेप्सडी’ (Bohemian Rhapsody) हे गाणं म्युझिक इंडस्ट्रीमधलं आजपर्यंत चं सर्वोत्कृष्ट गाणं म्हणून गणलं जातं. त्यांची क्रेझ प्रचंड वाढली होती. कोट्यावधीच्या संख्येने त्यांचे अल्बम विकले जात होते. क्वीन बँड एक ब्रँड म्युझिक सेंसेशन झालं होतं. (History)
=================
हे देखील वाचा : Saudi Arabia : सौदीत आणखी एक स्वप्नातील शहर
=================
पण असंही सांगितलं जातं की, फ्रेडी मर्क्युरी समलैंगिक होता. त्याची मेरी ऑस्टिन नावाची गर्लफ्रेंड होती. पण तिच्यासोबत बिनसल्यामुळे तो त्याचा हेअरड्रेसर जिम हटनसोबत रिलेशनशिपमध्ये आला आणि आपण समलैंगिक असल्याचं जगजाहीर केल. पण याव्यतिरिक्त त्याचे अजूनही रिलेशनशिप होते. परिणामी १९८७ साली फ्रेडी मर्क्युरीला एड्सचं निदान झालं. यानंतर तो आजारी राहायला लागला आणि इतर बँड मेंबर्स कॉन्सर्ट सुरू ठेऊन होते. ऑक्टोबर १९८६ ला त्याने बँडसोबत मॅजिक टूर वरचा शेवटचा शो केला होता. अशातच २४ नोव्हेंबर १९९१ रोजी केन्सिंगटन इथल्या राहत्या घरी त्याचं निधन झालं. आपल्या निधनापर्यंत त्याने ८ मिलियन युरो डोनेट केले होते. यानंतर त्याच्या बँड मेंबर्सनी एड्सबाबत जनजागृतीसाठी द मर्क्युरी फिनिक्स ट्रस्ट सुरू केलं यासोबतच फ्रेडी मर्क्युरी ट्रिब्यूट कॉन्सर्टदेखील केल्या. (Freddie Mercury)
मुळात फ्रेडी भारतीय होता, हे आजपर्यंत फार लोकांना माहीत नाही. आपलं करिअर करण्यासाठी त्याला ब्रिटिश व्हावं लागलं, पण तरीही इतिहास भविष्यातही त्याच्या रेकॉर्डस आणि गाण्यांचा गौरव करेल, तेव्हा त्यात भारताचंही योगदान असेल. कारण याच भारताने त्याला रॉक म्युझिकचा अनिभीषिक्त सम्राट बनवलं होतं.