सध्या संपूर्ण जगाचं लक्ष एकाच गोष्टीकडे लागलं आहे, ते म्हणजे प्रयागमधला महाकुंभमेळा ! फक्त भारतातूनच नाही तर जगभरातून भाविक आणि विदेशी पर्यटक या धार्मिक मेळ्याला येत आहेत. पण हा मेळा एका गोष्टीमुळेच सर्वात जास्त प्रसिद्ध असतो, ते म्हणजे इथे येणारे साधू आणि बाबा… तसं तर साधूंचा पोशाख भगव्या वस्त्रांचा असतो, केसांमध्ये जटा असतात, दाढी वाढलेली असते, गळ्यात रुद्राक्षमाळा असतात, त्यामुळे ते एकसारखेच असतात. असं आपल्याला वाटत… पण प्रत्येक साधूची आपली एक वेगळी ओळख असते. ज्यामुळे देशभर त्यांची चर्चा होत असते. यंदाच्या महाकुंभमेळ्यातही असे युनिक बाबा आले आहेत, ज्यांची सगळीकडेच चर्चा होत आहे. हे बाबा कोण आहेत आणि त्यांची विशेषता काय आहे, जाणून घ्या…. (Mahakumbh)

अनेक लोकं साधू बनतात, ते मोक्षप्राप्तीसाठी… सगळ्या गोष्टी त्याग करून केवळ ध्यान आणि संन्यास हा मार्ग ते स्वीकारतात. आपल्याला वाटत असेल, म्हातारपणात आल्यावर अनेक जण साधू बनत असतील. पण अशीही लोकं आहेत जे मोठमोठ्या हुद्द्यावर पोहोचूनही कुंभ मेळ्यात येऊन साधू झाले आहेत. सध्या अशाच एका बाबाची जास्त चर्चा आहे, ते म्हणजे IITअन बाबा… एरोस्पेस इंजिनिअरिंग ते अध्यात्म असा प्रवास करणाऱ्या या IITअन बाबाचं नाव आहे अभय सिंग ! IIT बॉम्बेमधून ग्रेज्यूएट असलेला अभय सिंग हा चक्क एरोस्पेस इंजिनिअर होता. लाखो रुपयांची नोकरी सोडून तो आता अध्यात्माच्या मार्गावर आला आहे. अभय सिंग हा मुळचा हरयाणाचा असून यंदा तो पहिल्यांदाच कुंभ मेळ्यात आला आहे. तो म्हणतो, मला साधू-संत वगेरे म्हणू नका, पण मला वैरागी म्हटलं तर नक्कीच आवडेल. बी.टेक करताना अभय सिंगने फिलोसोफीचा अभ्यास केला होता आणि इथेच तो हिंदू धर्म आणि इतर गोष्टींपासून प्रभावित झाला. कॅनडामध्ये असताना त्याला चक्क तीन लाख रुपये महिना पगार होता. त्यातच दीड वर्षांपासून तो कुटुंबियांशी बोलला नाही. (Social News)
आता दुसरे अनोखे बाबा बघुया, ते म्हणजे IAS बाबा किंवा चायवाले बाबा… या बाबांचं खर नाव दिनेश स्वरूप ब्रम्हचारी आहे. गेल्या काही वर्षांपासून ते विद्यार्थ्यांना IAS चं प्रशिक्षण देत आहेत. पण ही गोष्ट ऐकून तुम्ही चक्रावून जाल की, ते गेल्या ४० वर्षांपासून मौन आहेत. आणि विद्यार्थ्यांना ते हावभावाच्या माध्यमातून शिकवत आहेत. पण त्यांचं मार्गदर्शन उपयुक्त ठरत असल्याचं त्यांचा एक विद्यार्थी राजेश सिंगने सांगितलं आहे. यासोबतच त्यांची एक चहाची टपरीसुद्धा होती, जिथून त्यांचा उदरनिर्वाह चालत होता. मात्र हे सगळ सोडून ते आता अध्यात्माकडे वळले आहेत. पण तरीही WHATSAPP च्या माध्यमातून ते विद्यार्थ्यांना UPSC च्या अभ्यासाचे धडे देत असतात आणि ते मोफतदेखील आहे. (Mahakumbh)
आता मी जे सांगणार आहे ते युनिक बाबा चक्क अमेरिकेचे माजी सैनिक आहेत… सेना ते सनातन धर्म असा प्रवास करणारे बाबा मोक्षपुरी यांचं खर नाव मायकल होत. ते मुळचे मेक्सिकोचे आणि युएस आर्मीमध्ये होते. रिटायर्ड झाल्यानंतर त्यांना सनातन धर्माच्या मार्गावर चालण्याचं ठरवलं आणि थेट प्रयाग गाठलं. काही लोकं त्यांना अमेरिकेचे संत असंही बोलत आहेत. सध्या ते जुना अखाडाचे सदस्य आहेत. विदेशी बाबांच्या बाबत सर्वात जास्त चर्चा या मोक्षपुरी बाबांचीच होत आहे. ते सांगतात की माझ्या मुलाच्या मृत्यूनंतर मला योग, ध्यान आणि अध्यात्मानेच सावरलं, त्यामुळेच मी आता आपलं संपूर्ण आयुष्य एक सनातन परंपरेचा साधू म्हणून व्यतीत करण्याचा निर्णय घेतला आहे. २००० साली ते पहिल्यांदा भारतात आले होते आणि ते तेव्हाच भारताच्या प्रेमात पडले. (Social News)

अजून एक बाबा असे आहेत, जे चक्क सोशल मिडीया सेन्सेशन ठरले आहेत. ते म्हणजे लिलीपुट बाबा… मूर्ती लहान पण कीर्ती महान अशीच या लिलीपुट बाबांची ख्याती आहे. उंची फक्त ३ फुट ८ इंच… पण त्यांची एक गोष्ट इतकी अजब आहे की त्यांनी सगळ्यांना तोंडात बोट घालण्याला भाग पाडलं आहे. लिलीपुट बाबांचं मूळ नाव गंगा गिरी आणि यांनी गेल्या ३२ वर्षांपासून अंघोळच केलेली नाहीये. सध्या ते 57 वर्षांचे असून ते जुना अखाडाचेच बाबा आहेत. अंघोळ न करण्याचं कारण म्हणजे दीक्षा घेताना त्यांनी गुरुजींनी कधीही अंघोळ न करण्याची अट ठेवली होती. यानंतर त्यांनी ३२ वर्षांपासून अजूनही अंघोळ केली नसून हा त्यांच्या साधनेचा भाग आहे, असे म्हणतात. म्हणजे विचार करा, कुंभ मेळा हा शाहीस्नानासाठी प्रसिद्ध आहे, पण हे एकमेव बाबा असतील, जे हे पवित्र स्नान करतच नसतील. (Mahakumbh)
नंतर येतात…अनाजवाले बाबा… कवी ग्रेस यांच्या कवितेच्या काही ओळी आहेत… झाडांशी निजलो आपण, झाडात पुन्हा उगवाया… पण या बाबांनी आपल्या डोक्यावरच झाड उगवले आहेत. झाड म्हणजेच त्यांनी गहू, बाजरी, हरभरा यांचे रोपटे उगवले आहेत. ते या झाडांना सतत पाणीसुद्धा देत असतात. या रोपट्यातून जे दाणे मिळतात, त्याचाच प्रसाद बनवून ते भाविकांमध्ये वाटतात. त्यांचं म्हणण आहे की, माझा एकच संकल्प आहे. जसं माझ डोकं हिरवगार आहे, तशीच आपली पृथ्वी हरित आहे. आणि भविष्यात आपला देशसुद्धा हिरवागार झाला पाहिजे. लोकांनी वृक्षतोड थांबवली पाहिजे. झाड लावली तरच आपल्या खायला भोजन मिळेल. त्यामुळे मला झाडे लावा झाडे जगवा, हाच संदेश सर्वांना द्यायचा आहे. त्यांचा एक केसांमध्ये झाड उगवलेला खरा व्हिडिओदेखील व्हायरल झाला आहे. (Social News)
शाळेत हात वर करून उभं राहण्याची शिक्षा अनेकांना केव्हा ना केव्हा तरी झालीच असेल. त्यावेळी जास्तीत जास्त १० मिनिट आपण हात वर करून उभं राहू शकत होतो. पण तुम्हाला जर कोणी १४ वर्ष हात वर करून ठेवण्याची शिक्षा दिली, तर तुम्ही काय कराल ? काहीच करू शकत नाही. पण प्रयागच्या महाकुंभमेळ्यात एक असे बाबा आले आहेत, ज्यांनी गेल्या १४ वर्षांपासून आपला हात वरच ठेवला आहे. या बाबांचं नाव राधे पुरी बाबा असून हात वर करून ठेवण ही त्यांची साधना आहे. २०११ पासून त्यांचा उजवा हात वरच असून तो जवळपास अर्धमेला झाला आहे. पण तरीही त्यांनी आपली ही कठोर तपस्या सुरूच ठेवली आहे. त्यांची नखं मात्र वाढतात आणि अचानक गळून पडतात. (Mahakumbh)

कुंभ मेळ्यात आलेल्या प्रत्येक साधू-संतांना कसल ना कसलं आकर्षण असतच… त्याचाच वापर ते ध्यान आणि स्वतःवर नियंत्रण ठेवण्यासाठी वापरत असतात. असेच एक बाबा आहेत जे आपली ३५ वर्ष जुनी Ambassador कार घेऊन कुंभ मेळ्यात फेरफटका मारत आहेत. यावरूनच या बाबांचं नाव Ambassador बाबा असं पडलं आहे. त्यांचा हा मॉडेल १९७३ चा असून बाबांनी कारला भगवा रंग मारला आहे. आणि अजूनही ही कार चांगल्या वर्किंग कंडिशनमध्ये आहे. या बाबांचं खरं नाव महंत राजगिरी बाबा आहे. ते सर्वत्र आपल्या Ambassador कारनेच प्रवास करतात. वयाच्या १५व्या वर्षांपासून हे बाबा ध्यान करून असून अध्यात्माकडे वळले आहेत. ते म्हणतात ना शौक बडी चीज है…हे बाबासुद्धा आपला शौक पूर्ण करत आहेत. (Social News)
रुद्राक्ष ही साधू-संतांची ओळखच म्हणावी लागेल. त्यांच्या हातात किंवा गळ्यात रुद्राक्षाची माळ असतेच… मात्र आपल्या संपूर्ण शरीरभर रुद्राक्ष घालून फिरणाऱ्या बाबांना युनिकच म्हणावं लागेल. असेच एक बाबा यंदाच्या महाकुंभ मेळ्यात प्रमुख आकर्षण ठरले आहेत, ते म्हणजे रुद्राक्षवाले बाबा…त्यांचं मूळ नाव गीतानंद गिरी बाबा… त्यांच्या अंगावर तब्बल २ लाखांपेक्षा जास्त रुद्राक्ष असून त्यांनी डोक्यावर चक्क रुद्राक्षाच जटामुकुटच उभारलं आहे. यांचं नाव महंत वशिष्ठ गिरी असून हे मूळचे केदारनाथचे…लहानपणीच घर सोडलेल्या या बाबांना रुद्राक्षाची प्रचंड आवड…त्यामुळे संपून शरीरावर ते रुद्राक्ष घालूनच फिरत असतात आणि यामुळेच यांचं नाव रुद्राक्ष वाले बाबा असं पडलं आहे. (Mahakumbh)
============
हे देखील वाचा : Mahakhumbh : स्वामी रामभद्राचार्य ,मोरारी बापूंनां बघण्यासाठी लाखों भाविक
=============
बाबा किंवा साधु बनण्याला वयाचं बंधन नसत, याची प्रचिती या छोट्या बाबांकडे पाहून आली. वय वर्ष अवघं साडे तीन… पण याच वयात श्रवण पुरी नावाचं छोटं बाळ हे साधू झालं आहे. कुंभ मेळ्याचा चर्चेचा विषय ठरतोय. श्रवण हा जुना अखाद्याचा सदस्य असून सर्व महंत त्यांचा सांभाळ करतात. त्याचे आईवडील हरयाणाचे असून २०२१ साली श्रवणचा जन्म झाला होता. मात्र आपलं एक नवस पूर्ण झाल्यामुळे त्यांनी श्रवण केवळ ३ महिन्यांचा असतानाच त्याला आश्रमाला दान केलं होतं. सध्या तो गुरू अष्टकौशल महाराज यांच्यासोबत आश्रमातच असतो. एवढ्या कमी वयात तो पूर्णपणे अध्यात्मिक झाला असून अनेक मंत्रदेखील म्हणतो. यंदाचा महाकुंभमेळा कोट्यवधी साधू-संतांच्या उपस्थितीने सजला आहे. त्यातच या आगळ्या-वेगळ्या बाबांमुळे अनेक लोकं कुंभ मेळ्याकडे आकर्षित होत आहेत. महाकुंभमध्ये जाण्याचा प्लॅन असेल, तर नक्कीच या बाबांची भेट घेऊन आशीर्वाद घ्या. (Mahakumbh)
