या आठवड्यात कुठल्या राशींचा भाग्योदय होणार? कुठल्या राशींना परदेश प्रवास घडणार? कुठल्या राशींना त्रास होणार, पाहूया या आठवड्याचे राशिभविष्य (Weekly Horoscope – 14 November to 20 November)
मेष – आठवड्याच्या सुरुवातीला आपल्या राशीच्या सुखस्थानातून चंद्राचे भ्रमण होत आहे. घरात खेळीमेळीचे वातावरण राहील. कुटुंबासाठी वेळ द्याल. आप्तस्वकीयांच्या गाठीभेटीतून आनंद मिळेल. आपले हीच साध्य करताना कोणाचे मन दुखवणार नाही याकडेे लक्ष द्यावे. संततीसंबंधी सुवार्ता कानी येतील. अनेकांचे सहकार्य लाभेल. आपल्या इच्छेनुसार सर्व कामे सहज गतीने पार पडल्यामुळे मानसिक शांतता लाभेल. नवीन काम हाती घ्याल. नोकरी व्यवसायातील कामांमध्ये चर्चेतून नवीन मार्ग मिळतील. नवीन उपक्रम राबवण्यात यश मिळेल. कामाचा व्याप वाढल्यामुळे दगदग होणार आहे. प्रकृतीच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका.
शुभ दिनांक -16 ते 18
वृषभ – आपल्या राशीतून मंगळाचे तर पराक्रमस्थानातून चंद्राचे भ्रमण होत आहे. धाडसी निर्णय घेतले जातील, आत्मविश्वास वाढेल. अतिस्पष्टपणा कामाचा घात करू शकतो तेव्हा आपले काम करताना शब्द जपून वापरावेत. घरात पाहुण्यांची वर्दळ वाढेल. आपल्या माणसांसाठी जी ओतून काम कराल. घरासाठी इलेक्ट्रॉनिकच्या अत्याधुनिक वस्तूंची खरेदी केली जाईल. मन प्रसन्न राहील अशा घटना घडतील. संतती बाबतचा एखादा महत्त्वाचा निर्णय घेतला जाईल. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षातून यश प्राप्ती लाभेल. आठवड्याच्या उत्तरार्धात आपल्या इच्छापूर्ती होईल. जून्या मैत्रीला उजाळा मिळेल.
शुभ दिनांक -16, 17.
मिथुन – नुकताच आपल्या राशीतून व्ययस्थानात वृषभ राशीत मंगळ आणि प्रवेश केला आहे. व्यवसाय उद्योगाच्या निमित्ताने प्रवास घडतील. व्यवसाय वृद्धिंगत करण्याच्या दृष्टीने अनेक लोकांशी चर्चा कराल. कामानिमित्त प्रवास घडतील. भावंडांचे सहकार्य लाभेल. जुनी व्यावसायिक येणी वसूल होतील. कुटुंबात आपल्या मतांचा आदर केला जाईल. कौटुंबिक शुभसमारंभात सहभागी व्हाल. घरात खेळीमेळीचे वातावरण राहील. मनस्वस्थथ्य लाभेल. सामाजिक राजकीय क्षेत्रात सक्रिय सहभाग घ्याल. आपणास गृहस्थिती अनुकूलल असल्याकारणाने चांगल्या संधी लाभतील. वडीलधाऱ्या व्यक्तीं बाबतची कर्तव्ये पार पाडाल.
शुभ दिनांक- 19, 20.
कर्क – आपल्या राशीतूनच चंद्राचे तर लाभस्थानातून मंगळाचे भ्रमण होत आहे. आठवड्याच्या सुरुवातीलाच मन प्रसंग राहणाऱ्या घटना घडणार आहेत. जुनी व्यावसायिक येणी वसूल होतील. कुटुंबात आपल्या मतांचा आदर केला जाईल. कौटुंबिक शुभ कार्यात सहभागी व्हाल. मित्र परिवाराचे सहकार्य लाभेल. नवीन जबाबदाऱ्या स्वीकाराल. मनोरंजनाच्या कार्यक्रमातून आनंद घेता येईल. आपल्या अंगभूत कलागुणांना चांगला वाव मिळेल. अनेकांना सहकार्य कराल. परंतु कोणालाही स्वतःहून सल्ला देऊ नका, कारण तुमचा हेतू चांगला असला तरी मनस्ताप सहन करावा लागेल. महत्त्वाची कागदपत्रे आठवड्याच्या उत्तरार्धात हाती लागतील.
शुभ दिनांक -14 ते 16
सिंह – आठवड्याच्या सुरुवातीला आपल्या राशीच्या व्ययस्थानातून चंद्राचे तर दशम स्थानातून मंगळाचे भ्रमण होत आहे. व्यवसाय उद्योगातील कामाचा मोठ्या प्रमाणावर विस्तार केला जाईल. आपल्या कामाची प्रशंसा केली जाईल. कोणतीही गोष्ट मनात न ठेवता मोकळेपणाने मनातील विचारांना वाट करून द्याल. श्रमाने मेहनतीने आपले हित गाठण्यात यश लाभेल. नोकरीत वरिष्ठ आपल्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपवतील. बढती बदलीचे योग संभवतात. विरोधकांच्या कारवाया सुरू राहतील पण आपण त्यांना पुरून उराल. आठवड्याच्या उत्तरार्धात कुटुंबीयांच्या सहवासात वेळ मजेत जाईल. प्रकृतीच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका.
शुभ दिनांक -17, 18.
कन्या – पराक्रमस्थानाच्या अधिपती मंगळाने नुकताच वक्री होऊन आपल्या राशीच्या भाग्यस्थानात प्रवेश केला आहे. तर लाभेश चंद्राचे लाभस्थानातूनच भ्रमण होत असल्यामुळे आपल्या कर्तृत्वाला चांगली झळाळी येणार आहे. नवनवीन उपक्रम यशस्वीपणे राबवली जातील. गुंतवणुकीतून, शेअर्स मधून तसेच स्थावर मालमत्तेच्या व्यवहारातून लाभ होतील. तुमचा सौम्यपणा आणि हसून वेळ मारून नेण्याची चतुराई बरीच कामे करून जाईल. कामानिमित्त प्रवास घडतील. शक्ती आणि युक्ती दोन्हीचा योग्य तळमळ व्यवहारात घालाल. आपल्या आवडीनिवडीमध्ये बदल घडून आलेले दिसतील. उत्तरार्धात धार्मिक स्थळांना भेटी द्याल.
शुभ दिनांक 19, 20.
तूळ – आपल्या राशीतील केतू वरून आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण होत आहे. अध्यात्मिक क्षेत्रात प्रगती होईल. धनस्थानातील रवी, बुध आणि शुक्र आपला आर्थिक आलेख उंचावणार आहेत. आनंदी आणि मित्र प्रिय अशी आपली रास असल्याने मित्रांसोबत आनंदी वातावरणात आठवड्याची सुरुवात होईल. स्वतःबरोबर दुसऱ्याचाही फायदा करून दिल्यामुळे सामाजिक पत उंचावणार आहे. घरासाठी आकर्षक, शोभेच्या वस्तूंची खरेदी केली जाईल. आपल्या संभाषण चातुर्याच्या जोरावर रेंगाळलेली कामे मार्गी लागतील. उत्तरार्धात कामानिमित्त प्रवास घडणार आहेत. भावंडांच्या गाठीभेटीतून आनंद मिळेल. राजकारण, समाजकारण यासारख्या क्षेत्रात सक्रिय सहभाग घ्याल. आपल्या मतांचा आदर केला जाईल
शुभ दिनांक – 21, 22
वृश्चिक – आपल्या राशीच्या वेळेस स्थानातील केतूवरून चंद्राचे भ्रमण होत आहे तर सप्तम स्थानात मंगळाने प्रवेश केला आहे. तर राशीतील रवी, बुध, शुक्र आपले कर्तृत्व उजळून टाकणार आहेत. कामाचा मोठा आवाका पार पाडाल. कोणत्याही अडचणींना न जुमानता यश खेचून आणाल. आपल्या निर्णयाची इतरांकडून अंमलबजावणी करून घ्याल. सामाजिक पतप्रतिष्ठा उंचावेल. उंची वस्त्रालंकारांची खरेदी केली जाईल. भागीदारी व्यवसायातून नवीन कार्यारंभ केले जातील. जोडीदाराचे चांगले सहकार्य लाभेल. आठवड्याच्या उत्तरार्धात पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून लाभ होतील. कोर्ट कचेरीच्या कामातून यश लाभेल.
शुभ दिनांक – 23, 24.
धनु – राशीच्या लाभ स्थानातील केतूवरून चंद्राचेे भ्रमण होत आहे. अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवून कोणतेही काम करू नका. गुंतवणूक करताना योग्य व्यक्तीचे मार्गदर्शन घ्यावे. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून लाभ होतील. अविचाराने कोणतेही निर्णय घेऊ नका. धार्मिक स्थळांना भेटी द्याल. अध्यात्मिक प्रगती होईल. आपल्या आचार विचारात अस्थिरता ठेवू नका. हाती घेतलेले काम जबाबदारीने पार पाडावे. सामाजिक पत उंचावेल अशी खरेदी केली जाईल. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा व्यवसायात वापर करणे सहज शक्य होईल. धाडस आणि उत्तम कर्तृत्व या आपल्या गुणांचा या आठवड्यात आपल्याला फायदा होणार आहे.
शुभ दिनांक -26, 27.
मकर – आपल्या राशीच्या दशम स्थानातील केतूवरून चंद्राचे भ्रमण होत आहे. नोकरी व्यवसाय कोणावरही विश्वास न ठेवता आपले काम स्वतःच पूर्ण करावे. द्विधा मनस्थिती झाल्यामुळे एखादा निर्णय स्पष्टपणे घेता येणार नाही. लाभस्थानातील रवी, बुध, शुक्र आपणास अनुकूल फलदायी आहेत. आपल्या अंगभूत कलागुणांना चांगला वाव मिळेल. लेखकांच्या हातून दर्जेदार लिखाण होईल. कवी, कलाकार, गायक यांना श्रोत्यांची वाहवा मिळेल. आपल्या दीर्घोद्योगी आणि व्यवहारी स्वभावामुळे व्यवसाय उद्योगातील कामाचा चांगला मोबदला मिळेल. नवीन संधी चालून येतील. उत्तरार्धात कामानिमित्त प्रवास घडतील.
शुभ दिनांक – 24, 25.
कुंभ – भाग्यस्थानातील केतूवरून होणारेे चंद्राचे भ्रमण आपल्या आध्यात्मिक प्रगती वाढवणारे राहील आवडत्या लोकांचा सहवास लाभेल. बुद्धीचातुर्याने व तर्कशुद्ध विचार पद्धतीने आपण इतरांची मने जिंकून घ्याल. नाविन्यपूर्ण गोष्टी करण्याकडे आपला कल राहील. राजकीय सामाजिक क्षेत्रातून आपले वर्चस्व वाढणार आहे. कर्मस्थानातील रवी, शुक्र, बुध आणि चंद्र आपल्या व्यावसायिक उत्कर्ष पूरक राहतील. नवनवीन मोठे प्रकल्प हाती घेतले जातील. राजकारणी लोकांसाठी सत्ता गाजवून प्रतिष्ठा मिळवणे यासाठी पूरक ग्रहमान राहील. लेखक, कलाकारांना त्यांच्या कार्याबद्दल पारितोषिक मिळेल. अनेकांचे सहकार्य लाभेल. इच्छापूर्ती होईल.
शुभ दिनांक – 25, 26.
मीन – प्रवासात आपले खिसा पाकीट सांभाळावे. कोणत्याही भूलथापांना बळी पडू नका. प्रकृतीच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. समाजात बोलताना शब्द जपून वापरा अथवा एखाद्या प्रकरणात शाब्दिक चकमकीतून मनस्ताप होण्याची शक्यता राहते. कामानिमित्त प्रवास घडतील. सकारात्मक विचारांमुळे वातावरण आनंदी राहील. सरकारी कामात यश लाभेल. महत्त्वाची कागदपत्रे हाती लागतील. आपला संगीताचा शौक पूर्ण करता येईल. जुन्या गाण्यांचा आनंद घेता येईल. तरुणांना नोकरी व्यवसायासाठी चांगल्या संधी चालून येतील. उच्च शिक्षणासाठी परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रयत्नांना यश येईल.
शुभ दिनांक – 23 ते 25.
- श्री बालाजी ज्योतिषालय आणि वास्तू कन्सल्टन्सी, पुणे
9011149780 / 8668293104
टीप : या लेखातील माहिती आणि मते ही सर्वस्वी लेखकाची आहेत. क फॅक्टस टीम याची पुष्टी करत नाही. तसेच लेखकाच्या मतांशी आम्ही सहमत असू असेही नाही.