Foot Care Tips : पायांना भेगा पडणे ही अनेक जणांना भेडसावणारी सामान्य पण त्रासदायक समस्या आहे. विशेषतः हिवाळ्यात ही समस्या अधिक वाढते, मात्र काही लोकांना वर्षभर याचा त्रास जाणवतो. भेगा पडलेल्या पायांमुळे केवळ सौंदर्याचाच प्रश्न निर्माण होत नाही, तर चालताना वेदना, जळजळ आणि कधी कधी रक्तस्रावही होऊ शकतो. त्यामुळे वेळीच कारणे ओळखून योग्य उपाय करणे अत्यंत गरजेचे आहे.
पायांना भेगा पडण्याची प्रमुख कारणे
पायांच्या टाचांवरील त्वचा नैसर्गिकरित्या जाड असते. मात्र त्वचेतील ओलावा कमी झाला की ती कोरडी होते आणि तडे जाऊ लागतात. जास्त वेळ उघड्या पायाने चालणे, कठीण चपला किंवा स्लीपर वापरणे हे भेगा पडण्याचे मुख्य कारण ठरते. याशिवाय, साबण किंवा केमिकलयुक्त क्लिन्झरचा अति वापर, पाण्यात जास्त वेळ पाय ठेवणे, तसेच वाढते वय यामुळेही त्वचेची लवचिकता कमी होते.

Foot Care Tips
आरोग्याशी संबंधित कारणे
काही वेळा पायांना भेगा पडणे हे केवळ बाह्य कारणांमुळे होत नाही, तर त्यामागे आरोग्यविषयक कारणेही असू शकतात. मधुमेह, थायरॉईड, सोरायसिस, एक्झिमा यांसारख्या त्वचारोगांमुळे टाचांवर खोल भेगा पडतात. शरीरात व्हिटॅमिन A, E, झिंक किंवा ओमेगा-3 फॅटी अॅसिड्सची कमतरता असल्यास त्वचा कोरडी होते. लठ्ठपणा आणि जास्त वेळ उभं राहून काम करणं हेही भेगांचं कारण ठरू शकतं.
पायांच्या भेगांवर घरगुती उपाय
पायांच्या भेगांवर घरच्या घरी काही सोपे उपाय केल्यास आराम मिळू शकतो. रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाण्यात पाय भिजवून सौम्य पुमिस स्टोनने मृत त्वचा काढावी. त्यानंतर नारळ तेल, तूप किंवा बदाम तेलाने टाचांना मसाज करून कॉटनचे मोजे घालावेत. आठवड्यातून दोनदा मध आणि ग्लिसरीनचा लेप लावल्यास त्वचा मऊ होते. अॅलोवेरा जेलचा नियमित वापरही फायदेशीर ठरतो.
======
हे देखील वाचा :
Hair Care : थंडीत केसांच्या वाढीसाठी लावा Castor Oil, मिळतील हे प्रभावी फायदे
Skin Care: लटकणारी त्वचा टाईट करण्यासाठी करा ‘हे’ सोपे घरगुती उपाय
Natural Brow Care : नारळ की ऐरंडाचे तेल, जाड भुवयांसाठी बेस्ट ऑइल कोणते?
========
भेगा टाळण्यासाठी काळजी
पायांना भेगा पडू नयेत यासाठी रोज पाय स्वच्छ करून मॉइश्चरायझर लावणे आवश्यक आहे. शक्यतो बंद आणि मऊ तळाच्या चपला वापराव्यात. पाणी भरपूर पिणे आणि संतुलित आहार घेणे त्वचेसाठी उपयुक्त ठरते. जर भेगा खूप खोल असतील, रक्त येत असेल किंवा वारंवार होत असतील तर त्वचारोग तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. योग्य काळजी घेतल्यास ही समस्या सहज नियंत्रणात येऊ शकते.(Foot Care Tips)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
