बहुतांशवेळा आपण जेव्हा रेस्टॉरंटमध्ये जेवायला जातो तेव्हा तेथील मेन्यू पाहून आपली भूक अधिक वाढली जाते. त्यामुळे आपण अधिक पदार्थ ऑर्डर करतो. मात्र जेव्हा ते पदार्थ समोर येतात आणि संपत नाही तेव्हा नाराज होते. अशातच जेवणासह पैसे ही जातात. या व्यतिरिक्त सर्वात मोठी गोष्ट अशी की, जेव्हा आपण बिल पाहतो तेव्हा वाटते विचार करून काही पदार्थ मागवायला हवे होते. अशातच आम्ही तु्म्हाला अशा काही टीप्स सांगणार आहोत ज्या रेस्टॉरंटमध्ये फूड ऑर्डर करण्यापूर्वी जरूर लक्षात घेतल्या पाहिजेत. (food order tips)
-मेन्यू चेक करा
पदार्थ ऑर्डर करण्यापूर्वी तुम्ही मेन्यू कार्ड व्यवस्थितीत पहा की, रेस्टॉरंटमध्ये जेवणासाठी कोणते पदार्थ आहेत. तुम्हाला काय खावेसे वाटते आहे हे सुद्धा पहा. त्याचसोबत यासाठी तुम्ही तेथील वेटरची मदत घेऊ शकता. त्याला तुम्ही एखाद्या मेन्यू बद्दल विचारू शकता. जेणेकरून एखादा पदार्थ मागवताना तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही.
-एकाच वेळी खुप पदार्थ मागवणे टाळा
जेव्हा आपण बाहेर खायला जातो तेव्हा अशी चुक जरूर करतो की, एकाच वेळी खुप जेवण ऑर्डरकरतो. मात्र अशी चुक करू नका. कारण रेस्टॉरंटमधील संपूर्ण जेवण कधीकधी पूर्ण संपले जात नाही. जर ऑर्डर करायचे असेल तर सुरुवातीला स्टार्टरस मेन कोर्स आणि नंतर स्वीट अशा क्रमाने पदार्थ ऑर्डर करू शकता. जेणेकरून तुमचे पैसे ही वाचले जातील.
-शिल्लक राहिलेले जेवण पार्सल घेऊन जा
जेव्हा तुम्ही रेस्टॉरंटमध्ये जेवण ऑर्डर करता तेव्हा आपल्या प्लेटमध्ये एकाच वेळी खुप पदार्थ घेता. मात्र असे करू नका. प्लेटमध्ये थोडं-थोडं घ्या आणि खा. जेणेकरुन अन्न फुकट जाणार नाही. या व्यतिरिक्त पदार्थ शिल्लक राहिले तर ते घरी घेऊन जा. (food order tips)
-मेन्यू प्राइज पहा
काही रेस्टॉरंटमध्ये सिग्नेचर डिशेज अत्यंत फेमस असतात. मात्र त्याच्या किंमती पाहिल्या की त्या खाल्ल्या पाहिजेत की नाही असा विचार केला जातो. त्यामुळे तुमचे बजेट किती आहे हे आधी ठरवा आणि त्यानुसार पदार्थ ऑर्डर करा.
-रेस्टॉरंटचा रिव्यू तपासून पहा
कोणत्याही रेस्टॉरंटमध्ये जाण्यापूर्वी किंवा तेथे फूड ऑर्डर करण्यापूर्वी त्याचा रेव्यू जरूर तपासून पहा. जेणेकरुन तुम्हाला तेथील फूड बद्दल लोक काय म्हणतायत याचा अंदाज येईल.
हेही वाचा- जगातील सर्वाधिक घातक फूड डिश
-रेस्टॉरंटचे फोटो पहा
सध्या ऑनलाईन प्रत्येक रेस्टॉरंटचे फोटो आणि व्हिडिओ उपलब्ध असतात. तेथील डाइनिंग एरिया ते रिलेप्शन एरिया कसा आहे हे सुद्धा दाखवले जाते. या व्यतिरिक्त ते फॅमिली फ्रेंन्डली आहे का हे सुद्धा तुम्हाला फोटो पाहून नक्कीच कळेल.