घर सजवाताना आपण घरात विविध गोष्टी आणतो. काहींना विटेंज लूकमध्ये घराचे इंटिरियर असावे असे वाटते. प्रत्येकाची आवड ही वेगवेगळी असते. अशातच बहुतांश घरात फिश टँक ही ठेवला जातो. यामध्ये असणारे मासे पाहून फार आनंद होतो. परंतु तुम्हाला माहितेय का, घरात फिश टँक असण्याचे काही फायदे सुद्धा आहेत. वास्तु ते फेंगशुई मध्ये याचे फायदे दिले गेले आहेत. अशातच घरात फिश अॅक्वेरियम ठेवल्याने खरंच सुख-समृद्धी वाढते का याच बद्दल सविस्तर जाणून घेऊयात. (Fish Aquarium)
घरात जर तुम्हाला सुख-समृद्धी हवी असेल तर असे मासे ठेवले पाहिजेत जे शुभ आहेत. विविध फेंगशुई तज्ञ असे म्हणतात घरात मासे ठेवणे शुभ आहे. यामध्ये तुम्ही एरोवाना, ब्लॅक मूर, गोल्ड फिश, फ्लावर हॉर्न फिश, गप्पी मासे, टेट्रास, रासबोरा, क्लाउन फिश, रेनबो फिश असे काही मासे ठेवले पाहिजेत. या माशांव्यतिरक्त अन्य मासे शुभ मानले जात नाहीत. त्यामुळे मासे खरेदी करताना या गोष्टीकडे सर्वात प्रथम लक्ष द्या.
घरात अॅक्वेरियम ठेवण्याचे फायदे
-घरातील धोके आपल्यावर घेतात मासे
फेंगशुई विद्वान असे मानतात की, घरात मासे पाळल्यानंतर जर एखादे संकट येणार असेल तर ते मासे स्वत:वर घेतात. अशातच घरातील सदस्य सुरक्षित राहतात. त्यामुळे जर तुम्ही मासे पाळत असाल आणि त्यामधील एखादा मासा जीवंत राहिला नाही तर हे सुद्धा एक त्यामागील कारण असू शकते. यावेळी दु:ख व्यक्त करण्याऐवजी त्याच प्रकारचा आणखी एक मासा घरी आणा.
-घरात सुख-समृद्धी वाढते
जर तुम्ही माशांची व्यवस्थितीत काळजी घेतल्यास तर शुभ गोष्टी घरात घडतात. असे मानले जाते की,ज्या घरात फिश
टँकमधील माशांना वेळोवेळी खाद्यपदार्थ दिल्याने घरात सुख-समृद्धी वाढते. काही मासे तुमच्यासाठी गुड लक ही ठरु शकतात. (Fish Aquarium)
-शनि संबंधित दोष दूर होतात
काही लोकांच्या कुंडलित शनि दोष असतो. अशातच जर तुम्हाला शनि दोष असेल आणि साढे साती सुरु असेल तर घरात फिश टँक जरुर ठेवा. त्यांना वेळोवेळी खाद्यपदार्थ देत रहा. यामुळे शनि दोषापासून तुम्ही दूर व्हाल. त्याचसोबत घरात मासे ठेवणे म्हणजे आर्थिक वृद्धी सुद्धा होते.
-मनाची शांती
जर घरात फिश अॅक्वेरियम असेल तर तुमच्या आयुष्यात अलौकिक शांती येऊ शकते. जेव्हा कधी तुमचे मन विचलित होईल तेव्हा रंगीत मासे पाहून तुम्ही शांत व्हाल. अशातच तुमचा ताण आणि चिंता दूर होईल. मनाच्या शांतीसाठी घरात फिश एक्वेरिम ठेवणे फायदेशीर मानले जाते.
हेही वाचा- अरे बापरे! अमेरिकेला हे काय मिळालं…
या व्यतिरिक्त सर्वात महत्वाचे म्हणजे फिश एक्वेरिय घरात पूर्व, उत्तर किंवा उत्तर-पूर्व दिशेव्यतिरिक्त अन्य दिशेला ठेवणे शुभ मानले जात नाही. खरंतर वास्तू शास्रानुसार अन्य दिशेला ते ठेवणे अधिक धोकादायक ठरु शकते. असे म्हटले जाते की, उत्तर, पूर्व आणि उत्तर पूर्व दिशेला एक्वेरियम ठेवल्यास पॉझिटिव्ह एनर्जी वाढते.