Home » महाराष्ट्रात सौर कृषी वाहिनी

महाराष्ट्रात सौर कृषी वाहिनी

by Team Gajawaja
0 comment
First Solar Agriculture In Maharashtra
Share

सौरउर्जा हा भविष्यातील प्रगतीचा मार्ग आहे. सूर्याच्या ऊर्जेचे विद्युत ऊर्जेत रूपांतर करणे याला प्रामुख्याने सौरऊर्जा असे म्हणतात. याच सौरउर्जेच्या माध्यमातून शेतीला सुजलाम सुफलाम करण्याचा उद्देश ठेवत महाराष्ट्रातही हा सौर उर्जेचा प्रकल्प राबवण्यात येत आहे. महाराष्ट्रातील पहिल्या सौर कृषी वाहिनीचे नुकतेच लोकार्पण करण्यात आले. शेतीसाठी हा प्रकल्प म्हणजे, सोनेरी खाण ठरणार आहे. ग्रामिण भागात शेतीची सर्व कामे ही विद्युत पुरवठ्यावर अवलंबून असतात. शेताला पाणी देण्यासाठी विजेचे मोटर लावण्यात येतात. मात्र अद्यापही मोठ्या शेती भागाला चोवीस तास वीज पुरवठा करणे शक्य होत नाही. अशावेळी शेतकरी शेतीला पाणी देण्यासाठी रात्री बेरात्री शेतावर जातात. शेतपिक जगवण्यासाठी ते प्रयत्नांची पराकाष्ठा करतात. अशाच शेतक-यांसाठी सौर कृषी वाहिनी हा प्रकल्प वरदान ठरणार आहे. (First Solar Agriculture In Maharashtra)

छत्रपती संभाजीनगरमध्ये पहिला सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला आहे. हा प्रकल्प अन्य भागासाठी मार्गदर्शक ठरणार असून महाराष्ट्रभर असेच सौर वाहिनी प्रकल्प उभारण्याचा महाराष्ट्र शासनाचा निर्धार आहे. सौरऊर्जेचा वापर करून वीज निर्मिती आणि त्याच्या आधारे कृषी पंप चालवण्याची ही योजना आहे. त्यासाठी राज्यात ठिकठिकाणी विकेंद्रित सौरऊर्जा निर्मिती केंद्रांची स्थापना करण्यात येणार आहे. याचा सर्वाधिक फायदा शेतक-यांना होणार असून शेतीमध्ये दुबार शेतपिक घेणेही सुलभ होणार आहे. शिवाय शेती पुरक व्यवसायासाठीही हा प्रकल्प महत्त्वकांक्षी ठरणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना दररोज पुरेशा प्रमाणात वीज पुरवठा होणार आहे. मुख्य म्हणजे, ही वीज शेतक-यांना मोफत मिळणार आहे. महाराष्ट्र शासनाचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी 2.0 असे याचे नाव आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील धोंदलगाव येथे 3 मेगावॅट क्षमतेचा पहिला सौरऊर्जा प्रकल्प सुरू करण्यात आला. (First Solar Agriculture In Maharashtra)

यातून 9200 मेगावॅट सौरऊर्जा निर्मितीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या प्रकल्पाचा विस्तार झाल्यावर महाराष्ट्राच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा पाया अधिक भक्कम होण्यास मदत होणार आहे. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 अंतर्गत पहिला 3 मेगावॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील धोंडलगाव येथे राबवण्यात येत आहे. या प्रकल्पामुळे 1753 शेतकऱ्यांना दररोज वीजपुरवठा होणार आहे.
धोंदलगाव प्रकल्प ही केवळ सुरुवात असल्याचे महाराष्ट्र सरकारकडून सांगण्यात आले आहे. डिसेंबर 2025 पर्यंत या प्रकल्पाअंतर्गत सौर उर्जा निर्मितीची संपूर्ण क्षमता टप्प्याटप्प्याने कार्यान्वित केली जाणार आहे. धोंडलगाव येथील महावितरण उपकेंद्रापासून साडेतीन किलोमीटर अंतरावर 13 एकर सरकारी जमिनीवर हा प्रकल्प उभारण्यात आला आहे. हा प्रकल्प पूर्णपणे चालू झाल्यावर या भागातील विजेचा मोठा भार कमी होणार आहे. शिवाय शेतक-यांना हवी तेव्हा हक्काची वीज उपलब्ध रहाणार आहे. (First Solar Agriculture In Maharashtra)

अर्थातच यामुळे शेती उत्पादनात वाढ होणार आहे. शेतीपुरक व्यवसायही यामुळे वाढणार असून महाराष्ट्र सरकार शेतीवर आधारीत व्यवसाय करण्यासाठीही मदत करणार आहे. हा प्रकल्प महावितरणच्या धोंदलगाव 33 केव्ही सबस्टेशनला जोडण्यात आला आहे. त्यामुळे उपकेंद्रातून येणाऱ्या 5 वीज वाहिन्यांद्वारे 1 हजार 753 शेतकऱ्यांना दररोज वीज पुरवठा होणार असून धोंदलगाव, नालेगाव, अमानतपूरवाडी व संजरपूरवाडी येथीलगावातील शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे. देशभारातील अनेक राज्यात असे सौर उर्जा प्रकल्प कार्यान्वयित आहेत. त्यामध्ये राजस्थान पहिल्या क्रमांकावर आहे. 17.8 GW एवढी सौरऊर्जा क्षमता असलेले राजस्थान भारतातील सौर ऊर्जा उत्पादनात आघाडीवर असे राज्य आहे. सौर उर्जा प्रकल्प उभारणीत सर्वात मोठा अडसर हा जागेचा असतो. (First Solar Agriculture In Maharashtra)

====================

हे देखील वाचा : महाराष्ट्राचा कोहिनूर हिरा कसा हिरावला गेला?

====================

मात्र राजस्थानमधील विस्तीर्ण कोरडवाहू जमिनीमुळे या राज्यात भरपूर जागा उपलब्ध झाली आहे. त्यात जोधपूर जिल्ह्यात भाडला सोलर पार्क, 2,245 मेगावॅट क्षमतेचा असून भारतातील सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प म्हणून त्याचे नाव घेण्यात येते. हा सौर प्रकल्प 1400 एकरमध्ये पसरलेला आहे. त्यानंतर गुजरात राज्याचे नाव घेण्यात येते. गुजरातमध्ये 10,133 मेगावॅट सौरऊर्जेची निर्मिती होते. त्यामुळे गुजरात दुसऱ्या क्रमांकावर आहे. गुजरात सोलर पार्क 1 हे देशातील सर्वात जुने आणि सर्वात मोठे सौर प्रकल्प आहे. कर्नाटक त्यापाठोपाठ येते. कर्नाटकात 9,050 मेगावॅट क्षमतेच्या सौरऊर्जेची निर्मिती होते. तामिळनाडू मध्ये 6,892 मेगावॅट सौरउर्जा निर्मिती होते. (First Solar Agriculture In Maharashtra)

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.