दिवाळी म्हणजे सगळीकडे फक्त झगमगाट, आनंदी आनंद, प्रकाश, फराळाचा घमघमाट, फटाक्यांची आतिषबाजी. दिवाळीला फटाके फोडणे म्हणजे एक शास्त्रच बनले आहे. दिवाळी सुरु होण्याच्या आधीपासूनच फटाके फोडण्याची सुरुवात होते. मुलांमध्ये तर दिवाळीचा अर्थच फटाके असा होतो. दिवाळीच्या दिवसांमध्ये सगळीकडे फटाके फोडले जातात. या फटाक्यांशिवाय दिवाळी निव्वळ अपूर्णच वाटत असते.
मात्र फटाके फोडणे म्हणजे तसे पहिले तर नक्कीच जोखमीचे काम असते. कारण फटाके हे पेटवल्यानंतर ते अपेक्षित पद्धतीनेच फुटतील असे नाही. कधी कधी फटाके फोडताना तुमच्या हाता, पायाला तुम्हाला लहान – मोठी गंभीर इजा होऊ शकते त्यामुळे तुम्ही फटाके फोडताना नक्कीच काळजी घेणे आवश्यक असते. मात्र कधी देव ना करो फटाक्यांमुळे तुम्हाला इजा झाली, आणि तुम्ही भाजले गेलात तर काय करता येईल? प्रार्थमिक उपचार कोणते करावे हे आपण जाणून घेऊया.
थंड पाण्यात हात बुडवा
तुम्हाला भाजल्यानंतर जळजळ जाणवत असेल तर ते लगेच थंड पाणी भाजलेल्या ठिकाणी टाका. थंड पाणी जळजळ कमी करते आणि बर्न्समुळे होणारे नुकसान नियंत्रित करण्यास मदत होते. या उपायाने सूज आणि दुखण्यापासूनही आराम मिळतो.
कोरफड जेल
कोरफडमध्ये नैसर्गिक दाहक-विरोधी गुणधर्म असतात, जे जळजळ आणि सूज कमी करण्यास मदत करतात. थंड पाण्याने धुतल्यानंतर, जळजळ झालेल्या भागावर कोरफड जेल लावा. ते त्वचेला थंडपणा आणि आराम देते आणि जखमा लवकर बरे होण्यास मदत करते.
अँटीबायोटिक क्रीम
त्वचेवर फोड किंवा तीव्र जळजळ असल्यास अँटीबायोटिक क्रीम लावा. अँटीबायोटिक क्रीम संसर्गास प्रतिबंध करते आणि जखमा लवकर बरे होण्यास मदत होते.
हळद आणि मध यांचे मिश्रण
हळद आणि मध यांचे मिश्रण एक नैसर्गिक जंतुनाशक उपाय आहे. हळदीमध्ये बॅक्टेरियाविरोधी गुणधर्म असतात आणि मध त्वचेला आर्द्रता प्रदान करते. जळलेल्या जागेवर लावल्याने जखम लवकर बरी होते आणि संसर्गाचा धोकाही कमी होतो.
बर्फ वापरू नका
बर्न्सवर बर्फाचा वापर करू नये, कारण त्यामुळे त्वचेला आणखी नुकसान होऊ शकते. बर्फामुळे जळजळ तात्पुरती कमी होते, परंतु यामुळे त्वचेची सूज वाढू शकते आणि वेदना अधिक तीव्र होऊ शकते. नेहमी फक्त थंड पाणी वापरा.
खोबरेल तेल लावा
जखम झालेल्या ठिकाणी इतर कोणताही पदार्थ लावण्याऐवजी खोबरेल तेल लावावे. खोबरेल तेल लावल्यामुळे त्वचेवर थंडावा मिळतो. तसेच जखम थोड्या प्रमाणात बरी झाल्यानंतर खोबऱ्याच्या तेलाने मसाज करावे. जास्त वेळ मसाज करू नये.
दही
भाजल्यानंतर तुम्ही सदर जखमेवर दही लावावे. दह्यामुळे जखम थंड पडण्यास मदत मिळते आणि दही लावल्याने त्वचेवरची जळजळ कमी होते. मात्र भाजल्यावर त्वरीत यावर दही लावू नये, याची काळजी घ्या.
मध
भाजल्यावर जेव्हा प्रथमोपचार करण्याची वेळ येते तेव्हा मध लावावा. अनेक जणांना हे माहीत असते तर काही जणांना याबाबत माहिती नसते. मध लावल्यामुळे जखम बरी होते आणि त्यावर डाग कमी पडतो. मध हे अत्यंत चांगले अँटीसेप्टिक असल्याने जखम लवकर भरते.
=========
हे देखील वाचा : दिवाळी ट्रेंडिंगचा ६८ वर्षांचा मोठा इतिहास
=========
स्वच्छ आणि सुती कापड वापरा
जळलेली जागा स्वच्छ, कोरड्या आणि पातळ सुती कापडाने झाकून ठेवा. यामुळे संसर्गाचा धोका कमी होतो. हे कापड सैल ठेवण्याचा प्रयत्न करा जेणेकरून हवा देखील जखमेपर्यंत पोहोचू शकेल, ज्यामुळे जखम लवकर सुकते आणि बरी होते.
कोलगेट पेस्ट
फक्त कोलगेट टूथपेस्ट वापरा. यामध्ये असलेले कॅल्शियम जळजळ होण्यापासून आराम देण्यास मदत करते. जळलेल्या भागावर लावा आणि सोडा.
फटाके फोडतानाचे अंतर
लक्षात ठेवा नेहमी फटाके पेटवताना नेहमी किमान ४ मीटरचे अंतर ठेवा. फोडताना नेहमी चपला घाला जेणेकरुन तुमचे पाय सुरक्षित राहतील.