निरोगी आयुष्य हे प्रत्येकालाच हवं असतं. सध्या आपली जीवनशैली बदलली आहे. या धकाधकीच्या जीवनात कित्येकजण आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. परिणामी अनेकांना अगदी लहान वयातच नाना प्रकारच्या व्याधींनी ग्रासलं आहे. त्यामुळे सध्याच्या आधुनिक युगात जगत असताना, वर्षात किमान एकदा तरी शरीराचे मॉनिटरिंग करणं खूप गरजेचे आहे. त्यामुळे आपल्याला होणाऱ्या आजारांची वेळीच सूचना मिळते. परंतु, आता चिंता करू नका, तुम्हाला घरीच काही व्यायाम करून आपले शरीर रोगी आहे की निरोगी हे ओळखता येणार आहे. ते कसे ओळखायचे? चला, तर मग जाणून घेऊया.
आपलं शरीर रोगी की निरोगी हे ओळखण्यासाठी तुम्हाला तीन प्रकारचे व्यायाम करून बघायचे आहेत. हे अत्यंत सोपे व साधे प्रकार असून घरच्या घरी सहज करता येतील.
व्यायाम पहिला-
या व्यायामासाठी जमीनीवर सरळ झोपा. नंतर आपले हात शरीराच्या रेषेत सरळ आणा आणि दोन्ही पाय हळूहळू वर उचला. या पोझिशनमध्ये शरीर सुमारे ३० सेकंद ठेवण्याचा प्रयत्न करा.
जर असे करण्यात तुम्हाला अडचण येत असेल तर, कण्याच्या खालील भाग किंवा पोटाशी संबंधीत तक्रार असू शकते.
व्यायाम दुसरा-
आपल्या दोन्ही हातांची बोटे तळव्यात दाबून मुठ बनवा. हातांना सुमारे ३० सेकंदपर्यंत या स्थितीत ठेवा. जेव्हा हात उघडाल तेव्हा हात थोडे पांढरे पडतील. असे ब्लड फ्लो कमी असल्याने होते. यानंतर पहा की, हातांचा रंग किती वेळाने पहिल्याप्रमाणे सामान्य होत आहे.
हा व्यायाम करत असताना, हातांना मुंग्या आल्यासारखं होऊ शकतं किंवा तळव्यांपर्यंत रक्त पोहचण्यास उशीर लागू शकतो. हा आर्टेरिया सोरोसिसचा संकेत असू शकतो. यामध्ये हृदयातून शरीराच्या उर्वरित भागात ऑक्सीजन आणि आवश्यक पोषकतत्व घेऊन जाणार्या रक्त वाहिन्या जाड आणि कठिण होतात.
व्यायाम तिसरा-
या टेस्टमध्ये नखाच्या मुळाला ५ सेकंदपर्यंत दाबून ठेवून हेल्थबाबत जाणून घेवू शकता. यामध्ये हाताचे नख ५ सेकंद दाबून सोडले जाते. त्यामुळे नख काही काळासाठी पांढरे पडते. नखात ब्लड फ्लो परत येण्यास ३ सेकंदपेक्षा जास्त वेळ लागू नये. लक्षात ठेवा, ब्लड फ्लोची हालचाल प्रत्येक बोटावर वेगळ्या आजाराचे संकेत देते.
हे ही वाचा: Omicron – या ‘पाच’ गोष्टींचा दररोजच्या जेवणात समावेश करून ओमायक्रॉन व्हेरिएंटवर करा घरच्याघरी मात!
तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण पेरू खाण्याचे ‘एवढे’ आहेत फायदे!
जर अंगठ्यात वेदना जाणवत असेल, तर हा रेस्पिरेटरी संबंधी समस्येचा संकेत असू शकतो. अंगठ्याच्या शेजारील बोट मोठे आतडे किंवा किंवा डायजेस्टिव्ह सिस्टम खराब असल्याचे संकेत देऊ शकते. मीडल आणि रिंग फिंगर कार्डियोव्हॅस्क्यूलर डिसीजची सूचना देते. हाताच्या सर्वात छोट्या बोटात समस्या छोट्या आतड्यांमध्ये झालेल्या बिघाडाची सूचना असू शकते.
-निवास उद्धव गायकवाड