Financial issue in relationship : सध्याच्या काळात नाते दीर्घकाळ टिकवणे मुश्किल झाले आहे. प्रेमाला कमी आणि पैशाला सध्या अधिक महत्त्व दिले जात आहे. प्रत्येक सुख-दु:खात एकमेकांच्या सोबत असणाऱ्या नवरा-बायकोमध्येही पैशांमुळे वाद निर्माण होताना दिसून येत आहेत. काहीवेळेस वाद ऐवढे टोकाला जातात ही नाते मोडले जाते. अशा स्थितीत रिलेशनशिपवर याचा परिणाम होऊ न देण्यासाठी काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे.
भले नवरा किंवा बायको या दोघांमधील एकजण आर्थिक समस्यांचा सामना करत असेल तर त्यावेळी पार्टनरने त्याची साथ दिली पाहिजे. या समस्येवर एकत्रितपणे तोडगा काढला पाहिजे. पुढील काही टिप्स नक्कीच तुमचे नाते आर्थिक समस्या असली तरीही वाचवू शकते.
पैशांच्या खर्चावर लक्ष देणे
लग्नानंतर जबाबदाऱ्या आणि खर्चही वाढला जातो. जसा परिवार वाढतो तेव्हा खर्चही दुप्पट होतो. यामध्ये स्वत:सह परिवाराच्या गरजेच्या गोष्टी सांभाळून घेणे एक मोठे आव्हान असते. यामुळे पैशांच्या खर्चावर लक्ष देण्यासह नियंत्रण ठेवणेही अत्यंत महत्त्वाचे आहे. पैसे अशाच ठिकाणी गुंतवा जेथे तुम्हाला गरज आहे.
नात्यात दूरावा येण्यामागील कारण जाणून घ्या
आर्थिक समस्येमुळे नात्यात वाद होत असल्यास त्याचे कारण वेळीच ओळखा. स्थिती नियंत्रणात कशी ठेवता येईल याचा विचार करा. पार्टनरला वेळोवेळी त्याच्या प्रत्येक स्थितीत साथ द्या. जेणेकरून आर्थिक समस्यांचा ताण नात्यावर परिणाम करणार नाही. (Financial issue in relationship)
बजेट ठरवा
प्रत्येक महिन्यासाठी एक बजेट ठरवले पाहिजे. पण तुम्ही एखाद्या कारणास्तव आर्थिक तंगीचा सामना करत असाल तर एका डायरीमध्ये महिन्याभराचे बजेट लिहून ठेवा. त्यानुसारच पैसे खर्च करा. काही पैसे बचतही करा. जेणेकरून एखादी आपत्कालीन स्थिती उद्भवल्यास तुमच्या कामी येतील.