सध्या दाक्षिणात्य चित्रपट संपूर्ण देशात जोरदार व्यवसाय करत बॉलिवूड चित्रपटांना मागे टाकताना दिसत आहे. बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करत नवनवीन रेकॉर्ड रचणाऱ्या साऊथ चित्रपटांचा चांगलाच बोलबाला दिसत असून, या चित्रपटांना प्रेक्षकांची देखील चांगलीच पसंती मिळताना दिसत आहे. एकीकडे हे सुखावणारे चित्र असले तरी दुसरीकडे तर साऊथ इंडस्ट्रीमधील अनेक नामचीन कलाकार कायद्याच्या कचाट्यात अडकताना दिसत आहे. विविध आरोपांखाली हे कलाकार सध्या गाजत असताना अजून एका मोठ्या दाक्षिणात्य कलाकाराला अशाच प्रकारच्या घटनेतून जावे लागत आहे. (Jai Bhim)
झाले असे की, साऊथ सुपरस्टार असलेला सूर्या, त्याची पत्नी ज्योतीक आणि जय भीम (Jai Bhim) सिनेमाचे दिग्दर्शक असलेल्या टीजे ज्ञानवेल यांच्या विरोधात सैदापेट कोर्टाने चेन्नई पोलिसांना तक्रार दाखल करण्याचे आदेश दिले आहे. दरम्यान रुद्र वन्नियार सेना नावाच्या एका वन्नियार समूहाने तक्रार दाखल केली आहे. त्यांनी दाखल केलेली याचिकेमध्ये म्हटले आहे की, जय भीम सिनेमातील अनेक दृश्य वन्नियार समूहाची प्रतिमा खराब करणारी दाखवण्यात आली आहे. या समूहाने जय भीम सिनेमाच्या प्रदर्शनाच्या वेळी देखील सिनेमा प्रदर्शित न होण्याची मागणी केली होती. यासोबतच त्यांनी मागणी केली आहे की, चित्रपटातील आपत्तीजनक दृश्य काढून टाकण्यात यावी, आणि चित्रपटाच्या टीमने ५ कोटी रुपये आणि माफी मागावी असे देखील सांगितले आहे. (Jai Bhim)
हा सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर हिंदी भाषिक लोकांनी देखील एका सीनवर नाराजी दर्शवली होती. या सिनेमातील एका सीनमध्ये प्रकाश राज हिंदी बोलणाऱ्या एका व्यक्तीला थोबाडीत मारतो. त्यानंतर या सीनवरून तुफान हंगामा झाला होता. तत्पूर्वी ‘जय भीम’ सिनेमाला २ नोव्हेंबर २०२१ रोजी अमेझॉन प्राइमवर प्रदर्शित करण्यात आले होते. या सिनेमाला प्रेक्षकांनी आणि समीक्षकांनी खूपच चांगला प्रतिसाद दिला. या सिनेमाला ऑस्करसाठी देखील पाठवण्यात आले होते. सिनेमात इरूलर समूहाची कहाणी दाखवण्यात आली आहे. (Jai Bhim)
=======
हे देखील वाचा – ए.आर. रहमान यांच्या मुलीचा निकाह संपन्न, रहमान यांनी फोटो शेअर करत जावयाचे केले कुटुंबात स्वागत
=======
आता निर्माण झालेल्या या वादानंतर वन्नियार समाजाने सूर्या, ज्योतिका, जय भीम सिनेमाचे दिग्दर्शक टीजे ज्ञानवेल आणि अमेझॉन प्राइम यांना नोटीस पाठवली आहे. जय भीम हा सिनेमा आणि यातील सर्वच कलाकारांचा अभिनय प्रेक्षकांनी कौतुकास पात्र ठरला. अतिशय भीषण सत्य मांडणाऱ्या या सिनेमाने अनेक पुरस्कारांवर आपली मोहोर उमटवली आहे. याशिवाय अभिनेता सूर्याच्या करिअरमधील हा सिनेमा सर्वात जास्त उत्तम असल्याचे अनेकांनी सांगितले आहे. (Jai Bhim)