देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे पती फिरोज गांधी (Feroze Gandhi) यांची आज पुण्यतिथी. फिरोज गांधी हे गांधी परिवारातील असे एक सदस्य आहेत ज्यांच्या संदर्भात सोशल मीडियात खुप चुकीची तथ्य व्हायरल केली जातात. फिरोज गांधी यांच्या निधनानंतर त्यांच्यावर अंत्यंसंस्कार कशा पद्धतीने करण्यात आले आणि ते कोणत्या धर्माला मानायचे याबद्दलच्या गोष्टी शेअर केल्या जातात. अशातच आम्ही तुम्हाला अखेर सोशल मीडियात करण्यात येणारे त्यांच्याबद्दलचे दावे हे किती खरे आहेत त्यासंदर्भात अधिक सांगणार आहोत.
खरंतर सोशल मीडियात करण्यात येणाऱ्या दाव्यांमध्ये असे म्हटले जाते की, फिरोज गांधी हे मुस्लिम होते आणि त्यांना मृत्यूनंतर दफन करण्यात आले. अशातच हे जाणून घेणे फार महत्वाचे आहे की, या दाव्यांमध्ये किती खरेपण आहे आणि त्यांच्या आयुष्यासंदर्भातील काही गोष्टी ही पाहूयात.
फिरोज गांधी मुस्लिम होते?
फिरोज गांधी (Feroze Gandhi) यांनी ८ सप्टेंबर १९६० मध्ये वेलिंग्टच्या रुग्णालयात सकाळच्या वेळेस अखेर श्वास घेतला होता. त्यानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले गेले. त्याबद्दल मात्र सोशल मीडियात विविध दावे केले जातात. सर्वात प्रथम तुम्ही जाणून घ्या की, फिरोज गांधी हे पारसी धर्म मानायचे. त्यामुळे त्यांना मुस्लिम बोलणे चुकीचे आहे. आता प्रश्न असा उपस्थितीत राहतो की, अखेर त्यांना मुस्लिम का मानले जाते. यामागे असा तर्क लावला जातो की, त्यांच्यासाठी कबर बनवण्यात आली होती.

कसे झाले होते अंत्यसंस्कार?
फिरोज गांधी पारसी असले तरीही त्यांना दफन करु नये आणि हिंदू पद्धतीने त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात यावे असे त्यांना वाटायचे. मात्र त्यांच्या निधनानंतर तसे झाले नाही. बीबीसीच्या एका रिपोर्टनुसार, बर्टिल फाक यांचे पुस्तक फिरोज- द फॉरगॉटन गांधी यांच्या हवाल्याने असे म्हटले होते की, त्यांचे शव हे तीन मुर्ती भवनात ठेवण्यात आले होते. त्याचसोबत त्यावेळी सर्व धर्मग्रंथांचा पाठ वाचला गेला. तर अंत्यसंस्कार हिंदू पद्धतीने केले गेले. त्यावेळी राजीव गांधी १६ वर्षाचे होते आणि त्यांनी फिरोज गांधी यांना मुखाग्नि दिला होता.
हे देखील वाचा- राजीव गांधी ….. पायलट ते पंतप्रधान
काही पारसी परंपरांचे सुद्धा केले होते पालन
रिपोर्ट्सनुसार, या पुस्तकात असे म्हटले आहे की त्यांच्या निधनानंतर काही पारसी परंपरा सुद्धा फॉलो करण्यात आल्या होत्या. मात्र अंत्यसंस्कार हिंदू पद्धतीने करण्यात आले होते. फिरोज गांधी यांच्या पार्थिवावर फक्त चेहऱ्यावर कापडाचा एक तुकडा ठेवून अहनावेतिचा संपूर्ण पहिला अध्याय वाचला गेला होता.
कबर का खोदली गेली होती?
फिरोज गांधी यांच्यावर अंत्यसंस्कार केल्यानंतर त्यांच्या अस्थी नदीत सोडण्यात आल्या होत्या. दरम्यान, काही अस्थी सुद्धा अंत्यसंस्कारानंतर विसर्जिक केल्या होत्या. तर काही अस्थी दफन करण्यात आल्या होत्या. ज्या ठिकाणी या अस्थी दफन करण्यात आल्या तेथे कबर तयार करण्यात आली. या कबरी संदर्भात असे म्हटले जाते की, ते मुस्लिम होते. मात्र याची कथा ही भलतीच आहे.