Home » साडी नेसल्यानंतरही उंची कमी दिसते? ‘या’ टिप्स करा फॉलो

साडी नेसल्यानंतरही उंची कमी दिसते? ‘या’ टिप्स करा फॉलो

बहुतांश महिलांना साडी नेसणे अत्यंत आवडते. अशातच साडी नेसण्याचा ट्रेण्ड आजही कायम आहे. खरंतर साडी नेसण्याच्या सध्या वेगवेगळ्या पद्धती आणि डिझान्सही आल्या आहेत.

by Team Gajawaja
0 comment
Fashion Tips
Share

Fashion Tips : बहुतांश महिलांना साडी नेसणे अत्यंत आवडते. अशातच साडी नेसण्याचा ट्रेण्ड आजही कायम आहे. खरंतर साडी नेसण्याच्या सध्या वेगवेगळ्या पद्धती आणि डिझान्सही आल्या आहेत. सध्याच्या बदलत्या फॅशन इंडस्ट्रीमध्ये काहीजणी आपल्या शरिराच्या आकारानुसार कपडे खरेदी करतात. यामुळे तुमचे वजन अगदी वाढलेले न दिसता परफेक्ट शेपमध्ये दिसता. अशातच उंची कमीय आणि साडी नेसल्यानंतरही उंची अधिकच कमी दिसत असल्यास पुढील काही टिप्स फॉलो करू शकता.

अशा प्रकारच्या बॉर्डरच्या साडीची निवड करा
फॅशनच्या बदलत्या काळानुसार तुम्हाला साड्यांमध्ये वेगवेगळे पॅटर्न पाहायला मिळतील. तुम्हाला साडीत उंच दिसायचे असल्यास रुंद बॉर्डर असणाऱ्या साड्या नेसू नका. पातळ बॉर्डर असणाऱ्या साड्यांमध्ये तुम्ही निवडल्या पाहिदेत. रुंद बॉर्डर असणाऱ्या साडीत तुमचे वजन वाढलेले दिसते. अशातच तुमची उंचीही कमी दिसते.

Happy Birthday Neha Kakkar: 6 Times The Singer Aced Ethnic Style |  HerZindagi

अशा प्रकारची ज्वेलरी निवडा
साडीसोबत ज्वेलरी देखील परफेक्ट निवडणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी तुम्ही ब्लाऊजच्या नेकलाइननुसार ज्वेलरीची डिझाइन निवडता. याशिवाय तुम्हाला उंच दिसायचे असल्यास स्टेटमेंट नेकपीस सारखे राणी हार किंवा लेअर नेकलेसचा पर्याय निवडू शकताय. अशी ज्वेलरी फार सुंदर दिसते. (Fashion Tips)

साडीसह अशा प्रकारच्या नेकलाइनची निवड करा
सध्या मार्केटमध्ये तुम्हाला काही प्रकारच्या नेकलाइन डिझाइन्स मिळतील. तुम्हाला ऑनलाइनही नेकलाइन पाहायला मिळतात. तुम्हाला उंच दिसायचे असल्यास रुंद ऐवजी डीप नेकलाइनच्या ब्लाऊजची निवड करा. या प्रकारच्या ब्लाऊजला पातळ बॉर्डर असणारी लेसचा वापर करू शकता. यामुळे तुम्ही स्टाइलिशही दिसाल. डीप नेकलाइनमुळे तुम्ही उंच दिसता.


आणखी वाचा :
Bodycon Dress परिधान करताना या गोष्टी जरुर लक्षात ठेवा
मेकअप केल्यानंतर चेहऱ्यावर खाज येते? असू शकते हे कारण
लग्नसोहळ्यासाठी लेहंगा निवडताना या चुका करणे टाळा

Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.