रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची गणना जगातील शक्तिशाली नेत्यांमध्ये होते. पुतीन २००० सालापासून रशियाच्या अध्यक्षपदावर आहेत. गेल्या २४ वर्षापासून सर्वोच्च पदावर असलेल्या पुतिन यांनी आपण कितीही फिट असलो हे दाखवण्याचा प्रयत्न केला तरी त्यांच्या तब्बेतीच्या येणा-या बातम्या चिंताजनक आहेत.
त्यातूनच पुतिन यांचा उत्तराधिकारी कोण असा प्रश्न रशियात विचारला जाऊ लागला आहे. अर्थात पुतिन यांनी या प्रश्नावर आधीच विचार केला असल्याचे स्पष्ट झाले आहे. कारण एरवी आपल्या कुटुंबाला राजकारण आणि प्रसिद्धीपासून चार हात दूर ठेवणा-या पुतिन यांनी एका जाहीर कार्यक्रमात आपल्या दोन मुलींसह हजेरी लावली. त्यांनी फक्त हजेरीच लावली नाही, तर पुतिन यांच्या मुलींनी येथे भाषणही दिले. यावरुन पुतिन यांनी आपले उत्तराधिकारी कोण असणार याची चुणूक दिल्याची चर्चा सुरु झाली आहे. (Vladimir Putin)
रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) हे एक गुढ व्यक्तिमत्व आहे. त्यांच्या खाजगी जीवनाबद्दल फारशी माहिती उपलब्ध नाही. त्यांच्या कुटुंबियांचीही माहिती शक्यतो बाहेर येत नाही. अशातच पुतिन यांनी स्वतःहून आपल्या दोन्ही मुलींना मिडियासमोर आणले आहे. यातून त्यांना भावी उत्तराधिकारी कोण याची निवड करायची असल्याची चर्चा आहे.
पुतिन यांच्या कुटुंबात त्यांचे उत्तराधिकारी बनण्यासाठी तिघांची नावे आघाडीवर आहेत. यामध्ये त्यांच्या २ मुली आणि एका ९ वर्षीय मुलाचा समावेश आहे. आतापर्यंत पुतिन यांची ही तीनही मुले जगापासून लांब होती. मात्र अलिकडेच रशियन सरकारच्या एका कार्यक्रमत या दोन्हीही मुली सहभागी झाल्या होत्या. मारिया वोरोंत्सोवा, वय ३९ आणि कॅटरिना तिखोनोवा वय, ३७ असी या दोन मुलींची नावे आहेत. पुतिन यांच्या सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये दिसलेल्या दोन मुलींचा जन्म त्यांची पहिली पत्नी ल्युडमिला यांच्या पोटी झाला आहे. व्लादिमीर पुतिन यांनी १९८३ मध्ये ल्युडमिला ओचेर्तनायाशी लग्न केले. (Latest Marathi News)
पुतिन यांनी २०१३ मध्ये ल्युडमिलाला घटस्फोट दिला. पण त्यांचे मुलींसोबत नाते कायम होते. याच दोन मुली, मारिया आणि कॅटरिना या सेंट पीटर्सबर्ग इंटरनॅशनल इकॉनॉमिक फोरमच्या वार्षिक बिझनेस समिटमध्ये दिसल्या. पुतिन यांची मोठी मुलगी मारिया वोरोंत्सोवा रशियाच्या आरोग्य मंत्रालयाच्या एंडोक्रिनोलॉजी विभागातील संशोधक आहेत. एंडोक्रोनोलॉजीमध्ये हार्मोन्सबद्दल ती संशोधन करीत आहे. तिने आपल्या भाषणात वोरोंत्सोवा जैवतंत्रज्ञान आणि जैवउत्पादनाबद्दल माहिती सांगितली. (Vladimir Putin)
पुतीन यांची धाकटी मुलगी कॅटरिना तिखोनोव्हा ही व्यवसायाने तंत्रज्ञान तज्ञ आहे. कॅटरिना ही उत्तम वक्ताही आहे. तिने संरक्षण उद्योगात रशियन तंत्रज्ञानाला हायटेक बनवण्यावर आणि त्याच्या सार्वभौमत्वाला चालना देण्यावर भर दिला. तिची बोलण्याची पद्धत ही आपल्या वडिलांसारखीच आहे. कॅटरिना रशियाच्या संरक्षण क्षेत्रासाठी टेक सपोर्टमध्ये कामही करत आहे. तिने लष्करी तंत्रज्ञान बळकट करण्यावर जोर देत तंत्रज्ञानाची आयात बंद करण्यावर भर दिला. कॅटरिनाची रशियातील सर्वात श्रीमंत मुलगी म्हणून उल्लेख होतो. (Latest International News)
पुतिन यांच्या या मुली राष्ट्रपती निवासामध्ये काम करत असल्या तरी त्याप्रथमच जाहीर कार्यक्रमात आल्या. त्यामुळे त्यांच्या पुढील जबाबदा-यांबद्दल चर्चा सुरु झाली. पुतिन यांच्या निकटवर्तींयांच्या मते पुतिन आपल्या दोन मुलींपैकी एकीला उत्तराधिकारी म्हणून तयार करीत आहेत. मात्र काहींच्या मते पुतिन हे आपल्या मुलाला उत्तराधिकारी करणार आहेत. त्यांना इवान नावाचा ९ वर्षाचा मुलगा आहे. इवान जेव्हा १८ वर्षाचा होईल, तेव्हा पुतिन त्याला राजकारणात आणतील, असाही अंदाज व्यक्त होत आहे. (Vladimir Putin)
रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर पुतिन यांच्या या दोन्ही मुलींवर अमेरिकेने बंदी घातली होती. पुतिन यांनी त्यांच्या मुलांच्या नावावर परदेशात संपत्ती जमा केली आहे. त्यामुळे मुलींवर बंदी लादल्यामुळे पुतिन यांची आर्थिक नाकाबंदी होईल, असा अमेरिकेचा अंदाज होता. यापूर्वीही पुतिन यांच्या मुली चर्चेत आल्या आहेत. रशियामध्ये पुतिन यांचे विरोधी पक्षनेते अलेक्सी नवलनी यांचा तुरुंगात मृत्यू झाला.(International News)
==============
हे देखील वाचा : इराणची सत्ता या महिलेच्या हातात जाणार का ?
==============
मृत्यूपूर्वी, त्यांनी दावा केला होता की, पुतिन यांची मोठी मुलगी मारिया वोरोंत्सोवा हिने वैद्यकीय कंपनीत कर्मचारी म्हणून १० दशलक्ष डॉलर्सपेक्षा जास्त कमाई केली आहे. शिवाय पुतिन यांची धाकटी मुलगी कॅटरिना ही पुतिन यांची निवडणुकीची भाषणे लिहित असल्याचीही माहिती आहे. कॅटरिना ही रॉक-एन-रोल डान्सर आहे. तिचे काही व्हिडिओ युट्यूबवरही होते. २०१३ मध्ये, तिने पुतिनचा कट्टर शत्रू निकोलाई शामलोव्हचा मुलगा क्रिल शमालोव्ह बरोबर लग्न केले. निकोलाई हे रशियातील सर्वात मोठ्या बँक रोसिया बँकेचे सह-मालक आहेत.
मात्र या दोघांचा २०१८ मध्ये घटस्फोट झाल्याची माहिती आहे. पुतिन यांच्या विरोधामुळे हे नाते तुटले आहे. कॅटरिनाचे नाव प्रख्यात डान्सर इगोर झेलेन्स्की बरोबरही जोडले जाते. त्याच्यापासून तिला एक मुलगी असल्याची चर्चा आहे. इगोर हा जर्मनीत रहात असून कॅटरिना म्युनिकला सर्वाधिक वेळा भेट देते. आता या मारिया आणि कॅटरिना या दोन मुलींपैकी एकीच्या हातात पुतिन रशियाचे अध्यक्षपद देणार असल्याचा दावा रशियन वृत्तपत्रातून करण्यात येत आहे.
सई बने