इंटरनेटचा वापर तर आपण सर्वजण वेळोवेळी करत असतो. परंतु आपण ज्या काही गोष्टी त्यावर सर्च करतो किंवा एखादे सोशल मीडियाच्या अकाउंटचे लॉग इन तेथे करतो तेव्हा तुमचा डेटाचा रेकॉर्ड हा ठेवला जातो. मात्र अशातच प्रायव्हसीची किती सुरक्षितता असते हे कोणालाही माहिती नसते. त्यामुळेच हॅकर्स हे तुमचा खासगी डेटा सुद्धा अगदी सहज चोरू शकतात. सध्या सोशल मीडियातील प्लॅटफॉर्मसाठी एक नवा वायरस आला असून त्याबद्दल अॅन्ड्रॉइड युजर्सला अलर्ट मेसेज सुद्धा पाठवण्यात आला आहे.(Facebook privacy)
सोशल मीडियात आपली प्रत्येक खासगी माहिती देणे काहीवेळेस अंगलट येऊ शकते. कारण तुम्ही जी माहिती तेथे देता ती जगभरातील लोकांना सुद्धा दिसत असते. अशातच तुमचा डेटा सुद्धा चोरी झाल्यास तुम्ही काहीही करु शकत नाही. हॅकर्सकडून तुम्हाला त्रास दिला जाऊ शकतो. त्यामुळे प्रायव्हसी संदर्भात तुम्ही टेंन्शनमध्ये असाल तर काही गोष्टी जरुर लक्षात ठेवा.
फेसबुकवरील खासगी डेटासंदर्भात महत्वाच्या टीप्स
-तुमच्या फेसबुक प्रोफाइलवर लॉग इन करा. आता पेजच्या वरती उजव्या बाजूच्या कोपऱ्यातील एक अॅरो दिसेल त्यावर क्लिक करा. आता सेटिंगवर क्लिक करा.
-आता डाव्या बाजूला मेन्यूमध्ये प्रायव्हेसीवर क्लिक करा. येथे प्रायव्हेसी सेटिंग अॅन्ड टूल्सवर जा.
-युअर अॅक्टिव्हिटी मध्ये कोण पोस्ट पाहू शकतो यावर क्लिक करा. ओनली मी वर क्लिक करा. आता तुमच्या सर्व आधीच्या पोस्टसाठी सुद्धा ओनली फ्रेंड्स वर क्लिक करा आणि लिमिट पास्ट पोस्ट लिंकवर क्लिक करा.
-आता तुमच्यानुसार कोण कोण पोस्ट पाहू शकता त्यासंदर्भातील ऑप्शन निवडा.(Facebook privacy)
हे देखील वाचा- Android फोन वापरणाऱ्यांनी व्हा सावध! युट्युब सारख्या App मध्ये ‘या’ वायरसचा धोका

त्याचसोबत आपला फेसबुकचा पासवर्ज हा वेळोवेळी बदलत राहण्याची गरज असते. जेणेकरुन तुमचे अकाउंट हॅक होण्याची शक्यता फार कमी होते. शक्य असल्यास महिन्यामहिन्याला पासवर्ड बदलत रहा. पासवर्ड सुद्धा अगदी सोप्पा ठेवू नका. जसे की, १-९ क्रमांक किंवा ए टू झेड अक्षरामधील एकामागोमाग येणारी अक्षरे. हे पासवर्ड अगदी सहज क्रॅक करता येणासारखे असतात. अशातच तुम्ही सुद्धा तशाच प्रकारचा पासवर्ड ठेवला असेल तर तो बदलून स्ट्राँग पासवर्ड ठेवा.
सर्वाधिक महत्वाचे म्हणजे हॅकर्स काहीवेळेस तुमच्या अकाउंटसोबत छेडछाड करुन तुम्हाला त्यांच्या अकाउंटवरुन लिंक्स पाठवतात. अशा लिंक्सवर क्लिक केल्याने तुमची सर्व माहिती ही हॅकर्सकडे जाते. त्यामुळे कोणत्याही लिंकवर क्लिक करण्यापूर्वी विचार करा. कारण बनावट लिंक तुम्हाला वाटत असेल तर त्यावर अजिबात क्लिक करु नका. तसेच खरंच तुमच्या मित्राने एखादी लिंक पाठवली आहे का याबद्दल ही तुम्ही त्याच्याशी संपर्क करुन विचारु शकता.