Facebook-Instagram tips- फेसबुक आणि इंस्टाग्राम सध्या भारतात मोठ्या प्रमाणात वापरले जाते. या सोशल मीडियावरील अॅपचा वापर शहरातील लोकच नव्हे तर गावागावातील लोक सुद्धा आता वापर करु लागली आहेत. अशातच मेटाने युजर्ससाठी इंग्रजी भाषेसह अन्य भाषांचा सुद्धा सपोर्ट दिला आहे. जेणेकरुन प्रत्येकाला आपल्या मातृभाषेत अॅपचा वापर करता येईल. त्यामुळे जर तुम्हाला सुद्धा तुमच्या मातृभाषेत या अॅपचा वापर करायचा असेल तर तुम्हाला काही स्टेप्स फॉलो कराव्या लागणार आहेत. तसेच अॅपमध्ये भाषा कशी बदलायची आणि त्याचा वापर कसा करायचा याबद्दलच आज अधिक जाणून घेऊयात.
अॅन्ड्रॉइड डिवाइसमध्ये फेसबुकवरील भाषा कशी बदलाल?
सर्वात प्रथम तुम्हाला फेसबुकचे अॅप तुमच्या डिवाइसमध्ये सुरु करायचे आहे. त्यानंतर वरच्या बाजूला डावीकडे असलेल्या मेन्यू आयकॉनवर क्लिक करा. येथे स्क्रोल करुन खाली आल्यानंतर Setting and privacy ऑप्शनवर क्लिक करा. आता सेटिंग्स ऑप्शनवर जा. येथे तुम्हाला खाली Language and region चे ऑप्शन दिसेल. त्यावर क्लिक करा. या ऑप्शनवर गेल्यानंतर तुम्हाला काही भाषा दाखवल्या जातील. यामधील तुम्हाला हवी ती भाषा निवडून सेव्ह करा.
आयफोनमध्ये फेसबुकवरील भाषा कशी बदलाल?
आयफोनमध्ये फेसबुकची भाषा बदलण्यासाठी सर्वात प्रथम अॅप सुरु करा. येथे खालील बाजूस कॉर्नरला मेन्यू आयकॉन दिसेल त्यावर क्लिक करा. आता स्क्रोल खाली करत Setting and privacy ऑप्शनवर क्लिक करा. येथे तुम्हाला खाली Language and region दिसेल. यावर क्लिक करा. या ऑप्शनवर गेल्यावर तुम्हाला काही भाषा दाखवल्या जातील. त्यानुसार तुम्हाला हवी ती भाषा निवडून सेव्ह करा.
हे देखील वाचा- पेमेंट करण्यासाठी QR कोड स्कॅन करण्यापूर्वी ‘या’ गोष्टींकडे लक्ष द्या, अन्यथा होईल फसवणूक
अॅन्ड्रॉइड डिवाइसवर इंस्टाग्रामवरील भाषा कशी बदलता येते?
सर्वात प्रथम तुमच्या अॅन्ड्रॉइड डिवाइसवर इंस्टाग्राम अॅप सुरु करा. आता खाली दिसत असलेल्या आपल्या प्रोफाइल फोटोवर जा. त्यानंतर वरती असलेल्या मेन्यू ऑप्शनवर जा. आता Setting ऑप्शनवर क्किल करा. येथे अकाउंटवर टॅप करा. येथे तुम्हाला Language चा ऑप्शन दिसेल. येथे तुम्हाला जी भाषा हवी आहे ती निवडता येणार आहे.(Facebook-Instagram tips)
आयफोन डिवाइसवर इंस्टाग्रामची भाषा कशी बदलाल?
यासाठी तुमच्या डिवाइसवर इंस्टाग्रामचे अॅप सुरु करा. आता खाली असलेल्या आपल्या प्रोफाइलवर क्लिक करा. त्यानंतर वरती असलेल्या मेन्यू ऑप्शनवर जा. येथे Setting ऑप्शनवर क्लिक करा. आता अकाउंट ऑप्शन निवडा. येथे Language चे ऑप्शन दिसेल. येथे जी तुम्हाला भाषा निवडायची आहे ती निवडा.