फेसबुक जगातील सर्वाधिक लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्मपैकी एक आहे. हे एक असे प्लॅटफॉर्म आहे जेथे तुम्ही जगातील कोणत्याही व्यक्तीसोबत जोडले जाऊ शकता. फेसबुकवर कोणालाही तुम्ही मित्र बनवू शकता. आपले विचार खुप जणांपर्यंत पोहचवण्यासाठी अधिकाधिक मित्र जमवणे हे सुद्धा फार महत्वाचे आहेच. पण गेल्या काही काळापासून फेसबुकच्या माध्यमातून सुद्धा ऑनलाईन फसवणूकीचे प्रकार वाढले आहेत. काही युजर्सला तर यामुळे फार मोठा फटका बसला आहे. अशातच जर तुम्ही सुद्धा फेसबुक वापरत असाल तर सावध व्हा. कारण आम्ही तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहोत त्या कधीच दुर्लक्षित करु नका. (Facebook Fraud)
फेसबुकच्या माध्यमातून तुम्हाला एखादी लिंक मिळाली तर त्यावर लगेच क्लिक करु नका. सर्वसामान्यपणे या लिंक्सला आकर्षक ऑफर्सच्या नावाखाली पाठवले जाते. कोणत्याही लिंकच्या माध्यमातून तुमचे बँक खाते हॅक होऊ शकते किंवा तुमची खासगी माहिती चुकीच्या वापरासाठी वापरली जाऊ शकते. या व्यतिरिक्त काही वेळेस तुमचे बँक खाते सुद्धा रिकामे होऊ शकते.
या प्लॅटफॉर्मवर फ्री गोष्टी आणि अत्यंत स्वस्त दरातील वस्तू देण्याची जाहिरात करणाऱ्या गोष्टींपासून दूर रहा. त्यांच्या जाळ्यात कधीच अडकू नका. अशी बहुतांश प्रकरणे समोर आली आहेत ज्यामध्ये युजर्स जाहिरात पाहून ऑनलाईन ट्रांजेक्शनच्या माध्यमातून आपले पैसे गमावून बसले आहेत. त्याचसोबत आपली खासगी माहिती कोणाला ही शेअर करु नका.
फेसबुकवर आपल्या फ्रेंड लिस्टमध्ये त्याच व्यक्तींना अॅड करा ज्यांना तुम्ही ओळखता. तसेच फ्रेंड रिक्वेस्ट पाठवण्यावेळी किंवा स्विकार करताना खात्री करुन घ्या की, ते प्रोफाइल फेक तर नाही ना. असे करणे गरेजेचे आहे कारण कोणत्याही अज्ञात व्यक्तीला अॅड केल्याने तुमच्या खात्याची माहिती मिळवत फसवणूक करु शकतात. (Facebook Fraud)
हे देखील वाचा- आपल्या शरिरात सुद्धा असते का घड्याळ? जे आपल्याला वेळ सांगत राहते
जर तुमच्या एखाद्या मित्राने नाव बदलून पुन्हा फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली असेल तर ती एक्सेप्ट करु नका. कारण ड्युप्लीकेट फेसबुक आयडी तयार करुन सायबर क्रिमिनल लोकांना धमक्या देऊन फसवणूक करु शकतात. त्याचसोबत तुमच्याकडे एखादा व्यक्ती बँक खात्याची माहिती किंवा पैसे मागत असेल तर त्यासाठी नकार द्या. असे होऊ शकते की, तुमच्या मित्राचे फेसबुक अकाउंट हॅक करुन त्याच्या नावे तुमच्याकडून पैसे मागितले जात आहेत. किंवा एखादी लिंक पाठवून तुमचे बँक खाते रिकामे करण्याचा प्रयत्न ही केला जाऊ शकतो.