तुम्हाला माहितेय का, जगातील सर्वाधिक महागडे फूड्स कोणते आहेत? खरंतर जगात अनेक महागडे फूड्स आहेत. पण काही दुर्मिळही असतात. या फूड्सची किंमत ऐकून तुम्ही हैराण व्हाल. कारण या फूड्सच्या किंमती पाहून करोडपतीही हैराण होतात. (Expensive Food in World)
अल्मास कॅवियार
अल्मास कॅवियार हे जगातील सर्वाधिक महागडे फूड आहे. युएसए टुडेच्या रिपोर्टनुसार कॅवियार स्टर्जन माशाच्या अंडाशयात असतात. या अंड्यांना अल्मास कॅवियार म्हटले जाते. अल्मास कॅवियारची किंमत 29 लाख रूपये प्रति किलोग्रॅम आहे. हे कॅवियार ईरानी बेलुगा स्टर्जन माशापासून मिळते. या माशाचे वय 100 वर्षापेक्षा अधिक असते.
केशर
केशरला ही सर्वाधिक महागड्या फूड्समध्ये येते. केशर खरंतर एक प्रकारे मसाल्याचा पदार्थ आहे. याची टेस्ट अनोखी असते. केशरचा वापर भारतीय पदार्थांमध्ये केले जाते. केशरचा सुगंध लोकांना फार पसंत पडतो. रिपोर्ट्सनुसार, एक ग्रॅम केशरची किंमत 1600 रूपये असते. या हिशोबाने एक किलो केशरची किंमत 16 लाख रूपये असते. केशर सर्वसामान्यपणे ईराणमध्ये उगवते आणि जगभरात याचा वापर केला जातो.
ब्लूफिन टूना
ब्लूफिन टूना मासा जगातील सर्वाधिक महागड्या फूड्सपैकी एक आहे. माशाची ही प्रजाती लुप्त होण्याच्या मार्गावर आहे. याच कारणास्तव याची किंमत फार अधिक असते. ब्लूफिन टूना जापानच्या सुशी आणि साशिमी फूड्सचा प्रमुख हिस्सा आहे. एक ब्लूफिन टूनाचे वजन जवळजवळ 200-250 किलोपर्यंत असते.
मीडिया रिपोर्ट्सनुसार एक ब्लूफिन टूनाची किंमत 5 लाख रूपये असते. पण लिलावात याची किंमत कोट्यावधींमध्ये जाते. यंदाच्या वर्षात जापानमध्ये एक 212 किलो ब्लूफिन टूनाचा लिलाव झाला त्याची किंमत 2.27 कोटी रूपये होती.
तुर्कीमधील स्पेशल मध
तुर्कीमध्ये एक अनोख्या प्रकारचे मध मिळते. खरंतर तुर्कीतील आर्टविन शहरात 1800 मीटर गुहेतून मध काढले जाते. या मधासाठी मधमाशाचे पोळे देखील नसते. एल्विश मध हे नैसर्गिक रूपात जंगली फुलांमधील मधापासून एकत्रित केले जाते. त्यानंतर गुहेत त्याचे द्रव पदार्थात रूपांतर होते. याची टेस्ट फार वेगळी असल्याने त्याची किंमत 4.44 लाख रूपये प्रति किलोग्रॅम असते. (Expensive Food in World)
इबेरिको हॅम
काळ्या डुक्करच्या पायाच्या भागाला इबेरिको हॅम असे म्हटले जाते. जे जगातील सर्वाधिक महागड्या फूड्सपैकी एक आहे. हॅमवर प्रक्रियाकरून ते तुरट बनवून तीन वर्षांपर्यंत सुकवले जाते. इबेरिको हॅमची किंमत 3.75 लाख रूपयांच्या आसपास असते.
हेही वाचा: सर्वाधिक महागडे लग्न, मुलीच्या लग्नासाठी वडिलांनी खर्च केले चक्क 500 कोटी