Home » जगातील सर्वाधिक महागडी शहरे, भारतातील ‘या’ ठिकाणाचाही समावेश

जगातील सर्वाधिक महागडी शहरे, भारतातील ‘या’ ठिकाणाचाही समावेश

सध्या महानगरांमध्ये घराच्या किंमती आणि दररोजच्या सामानाच्या किंमती गगनाला भिडत चालल्या आहेत. यामुळेच एका सर्वसामान्य कर्मचाऱ्याला काही समस्यांचा आयुष्यात सामना करावा लागत आहे.

by Team Gajawaja
0 comment
travel
Share

Expensive Cities in World : कामाच्या शोधात बहुतांशजण एका ठिकाणाहून दुसरीकडे स्थलांतर करतात. काहींना असेही वाटते की, परदेशात उत्तम नोकरी आणि पैशासह सर्व सुख-सोयी मिळत असतील. पण विदेशातील चित्र फार वेगळे असून तेथील नागरिक अत्यंत कठीण स्थितीत जगतायत. त्यांना महागडी घरे आणि सामान खरेदी करावे लागते. डॉलर आणि पाउंडमध्ये मिळणारी कमीही तेथे राहण्यासाठी कमी पडतेय. अशातच जाणून घेऊया अशी काही शहरे जी सर्वाधिक महागडी म्हणून ओखळली जातात. हाँगकाँग आणि सिंगापुर या लिस्टमध्ये टॉपवर आहेत.

स्विस शहरांमध्ये राहणारे सर्वाधिक महाग
मर्सरच्या कॉस्ट ऑफ लिव्हिंग रिपोर्ट 2024 नुसार, स्विस शहरांमध्ये राहणे जगातील सर्वाधिक महागडी गोष्ट असल्याचे समोर आले आहे. या लिस्टमध्ये न्यूयॉर्क आणि लंडननेही टॉप-10 मध्ये आपले स्थान मिळवले आहे. याशिवाय बहामासच्या नसाऊचाही समावेश आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत या शहरांमध्ये कॉस्ट ऑफ लिव्हिंगमध्ये फार मोठी वाढ झाली आहे.

मर्सरच्या रिपोर्ट्सनुसार, घराच्या वाढत्या किंमती आणि वाढती महागाई यामुळे बाहेरुन कामासाठी येणाऱ्यांवर दबाव पडत आहे. टॉप-20 मध्ये अमेरिकेतील लॉस एंजेल्स, होनोलुलु आणि सॅन फ्रॅन्सिस्कोचा समावेश आहे.

खासगी कंपन्या आणि कर्मचाऱ्यांच्या समस्येत वाढ
मर्सरच्या युवॉन ट्रेबरच्या मते, या मोठ्या शहरांमध्ये वाढत्या कॉस्ट ऑफ लिव्हिंगमुळे खासगी कंपन्यांसह तेथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या समस्येत वाढ झाली आहे. याशिवाय लाइफस्टाइलवरही त्याचा परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. लोकांना आपले खर्च कमी करावा लागत आहे. याशिवाय दररोजच्या गरजा भागवण्यासाठी त्यांना संघर्ष करावा लागतोय. कर्मचाऱ्यांना या दबावापासून दूर ठेवण्यासाठी कंपन्या त्यांना हाउस अलाउंसेससह अन्य प्रकारच्या सुविधाही देत आहे. (Expensive Cities in World)

भारतातील सर्वाधिक महागडे शहर
या लिस्टमध्ये पॅसिफिक रिजनमध्ये सिडनी सर्वाधिक महागडे शहर ठरले आहे. कॅनेडामध्ये सर्वाधिक महागड्या शहरांमध्ये टोरांटो, भारतातील मुंबई आणि नायजेरियातील लागोसचा या लिस्टमध्ये समावेश आहे. मर्सरने हाउसिंग, ट्रान्सपोर्ट, फूड, कपडे आणि घरगुती सामानाच्या किंमतीच्या आधारावर ही लिस्ट तयार केली आहे.


आणखी वाचा :
TATA चा नवा अ‍ॅप, घरबसल्या स्वस्तात बुकिंग करता येणार विमानाचे तिकीट
ॲमेझॉन जंगलात सोशल मिडियाचा बोलबाला

 


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.