जगभरातील करोडो लोक मधुमेहाचा सामना करत आहेत. मधुमेह असा आजार आहे ज्यामध्ये शरिरातील इंन्सुलिनचे कार्य बिघडले जाते आणि रक्तातील साखरेचे प्रमाण वेगाने वाढू लागते. मधुमेह असलेल्या व्यक्तीची रोगप्रतिकारक शक्ती कमजोर होऊ लागते आणि अन्य आजार मागे लागण्याची अधिक शक्यता असते. आतापर्यंत तुम्ही ऐकले असे की, व्यायाम केल्याने मधुमेहाचा धोका कमी होऊ शकतो. अशातच आता एका अभ्यासातून सुद्धा हेच खरं झाले आहे. पण तुम्हाला माहिती आहे का हे कसे होते? या संदर्भातील एका नव्या अभ्यासात काही गोष्टी समोर आल्या आहेत ज्यामुळे तुम्हाला अधिक स्पष्टता येईल की, नक्की मधुमेहाचा धोका व्यायामामुळे कमी होतो का? (Exercise & Diabetes )
व्यायायामुळे इंन्सुलिन सेसिटिव्हिटी सुधारते
मेडिकल न्यूज टुडेच्या रिपोर्टनुसार, एका नव्या अभ्यासात ही बाब समोर आली आहे की, व्यायाम केल्याने मेंदुत इंन्सुलिन सेंसिटिव्हिटी रिस्टोर करता येऊ शकते. यामध्ये टाइप २ मधुमेहाचा धोका कमी होऊ शकतो. जेव्हा लोकांच्या मेंदुतील इंन्सुलिनची सेंसिटिव्हिटी कमी होते तेव्हा भुक वाढते आणि मेटाबॉलिज्मला समस्या येतात. इंन्सुलिन सेंसिटिव्हिटी कमी झाल्याने मधुमेहाचा धोका वाढतो. आपल्या रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी इंन्सुलिनची फार गरज असते. हा एक हार्मोन असून ज्याचे कार्य सुरळीत चालणे फार महत्वाचे असते.

जर्मनीत करण्यात आला होता रिसर्च
हा रिसर्च जर्मनीतील टुबिंगन युनिव्हर्सिटी हॉस्पिटल आणि हेम्होल्टेज म्युनिखच्या संशोधकांनी केला होता. या अभ्यासामागील मुख्य उद्देश व्यायामामुळे मेंदूतील इंन्सुलिन सेंसिटिव्हिटीवर होणारा परिणाम पाहिला गेला. त्यामध्ये असे दिसून आले की, जर प्रत्येक आठवड्यातील ३ दिवस एक तास व्यायाम केल्यास इंन्सुलिन सेंसिटिव्हिटीचा स्तर संतुलित ठेवला जाऊ शकतो. अभ्यास करणाऱ्या संशोधकांनी म्हटले की, लठ्ठपणा, प्री-डायबिटीज आणि मेटाबॉलिज्म संबंधित आजारांपासून बचाव करण्यासाठी शारिरीक हालचाल करणे अत्यंत गरजेचे आहे. व्यायामाच्या माध्यमातून काही आजारांपासून दूर राहता येते. (Exercise & Diabetes )
हे देखील वाचा- निक जोनासला वयाच्या १३ व्या वर्षांपासून मधुमेहाची लागण…
कधी करावा व्यायाम?
आता पर्यंत करण्यात आलेल्या अभ्यासानुसार असे समोर आले आहे की, प्रत्येक दिवशी व्यायाम केल्याने मधुमेहाचा धोका कमी होतो. मधुमेहाशी झुंजत असलेले रुग्ण यामुळे रक्त्तातील साखर संतुलित ठेवू शकतात. गेल्या काही दिवसांपूर्वीच्या अभ्यासात असे समोर आले की, मधुमेह असलेल्या रुग्णांनी रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी दुपारी किंवा संध्याकाळच्या वेळेस व्यायाम करावा. व्यायाम केल्याने तुमचे शरिर आणि मानसिक आरोग्य सुद्धा सुधारते.