कॉफी आणि बरंच काही… असे म्हण्यापूर्वी आज गुगलने एक्सप्रेसो मशीनचे गॉडफादर असलेल्या एंजेलो मोरियोनडो यांना त्यांच्या १७१ व्या जयंती निमित्त खास डुडल तयार करुन श्रद्धांजली वाहिली आहे. मोरियोनडो यांनी १८८४ मध्ये एक्सप्रेसो मशीनचा आविष्कार आणि पेटंट घेण्याचे श्रेय त्यांना मिळाले आहे.मोरियोनडो यांच्याबद्दल अधिक सांगायचे झाल्यास, त्यांचा जन्म ५ जून १८५१ मध्ये इटलीतील ट्युरिन येथे झाला होता. आधीपासूनच घराण्यात व्यावसायिक लोक असल्याने त्यांनी सुद्धा यामध्ये सहभाग घेतला. त्यांच्या आजोबांनी दारु निर्माण करणाऱ्या व्यवसायाची स्थापना केली होती. जी एंजेलो यांच्या वडिलांकडे सोपिवली आणि त्यांनी ती सांभाळली. आपल्या कुटुंबाची परंपरा पुढे घेऊन जात मेरियोनडो यांनी त्यांच्या भाऊ आणि चुलत भाऊ यांच्यासोबत मिळून मोरिओन्डो आणि गॅरिग्लिओ ही लोकप्रिय चॉकलेटच्या कंपनीची उभारणी केली. (Espresso machine godfather)
मोरियोनडो यांनी सिटी सेंटर पिझ्झा कार्लो फेलिस मध्ये ग्रँड हॉटेल लिगुर आणि व्हिया रोमावरील गॅलेरिया नाझिओनाले येथे अमेरिकन बार ही दुकाने त्यांनी विकत घेतली. एंजोलो मोरियोनडो यांच्या काळात कॉफी पिणे हे लोकांना प्रचंड आवडायचे. परंतु कॉफी तयार होण्याकरिता काही वेळ वाट पहावी लागयची.मोरियोनडो यांनी सिटी सेंटर पिझ्झा कार्लो फेलिस मध्ये ग्रँड हॉटेल लिगुर आणि व्हिया रोमावरील गॅलेरिया नाझिओनाले येथे अमेरिकन बार ही दुकाने त्यांनी विकत घेतली. एंजोलो मोरियोनडो यांच्या काळात कॉफी पिणे हे लोकांना प्रचंड आवडायचे. परंतु कॉफी तयार होण्याकरिता काही वेळ वाट पहावी लागयची. त्यामुळेच मोरियोनडो यांनी एकाच वेळी अनेक कपमध्ये कॉफी कशाप्रकारे दिली जाईल आणि त्यामुळे अधिक ग्राहक कसे आपल्याकडे येतील त्यावर तोडगा काढला. ऐवढेच नव्हे तर आपल्या प्रतिस्पर्ध्याला सुद्धा आपण आपल्या डोक्यातील विचार सत्यात उतरवण्याचे ठरविले.
हे देखील वाचा- जागतिक पर्यावरण दिन: पन्नास वर्षांपूर्वीची थीम या वर्षी पुन्हा ठेवली कारण…
एक्सप्रेसो मशीनचे गॉडफादर (Espresso machine godfather) मोरियोनडो यांनी १८८४ मध्ये ट्युरिन मधील जनरल एक्स्पोमध्ये आपले एक्सप्रेसो मशीनचे सादरीकरण केले. त्यानंतर ते मशीन मॅकेनिकच्या देखरेखाली सुद्धा ठेवण्यात आले होते. त्यानंतर २३ ऑक्टोंबरला १८८५ रोजी पॅरिसमध्ये नोंदणी केल्यानंतर आंतरराष्ट्रीय पेटंटद्वारे या शोधाची अखेर पुष्टी झाली. असा हा मोरियोनडो यांचा एक्सप्रेसो मशीनचा प्रवास आहे. एक्सप्रेसो मशीनमध्ये एक बॉयर होता जो गरम पाण्यासोबत एकाच वेळी अनेकांना कॉफी करुन देत असे. अशापद्धतीने मोरियोनडो यांच्या एक्सप्रेसो मशीनला प्रसिद्धी मिळवून दिली. त्यामुळेच आपण सध्या विविध कॅफे मध्ये जाऊन आम्हाला अमूक प्रकारची एक्सप्रेसो कॉफी द्या असे बिंधास्तपणे बोलू शकतो.