Home » चीनमध्ये पुन्हा एकदा महामारीचं संकट

चीनमध्ये पुन्हा एकदा महामारीचं संकट

by Team Gajawaja
0 comment
China
Share

चीनकडून जगभरात पसरलेल्या कोरोना या महामारीतून जग आता पूर्णपणे सावरले आहे.  काही देशात तर कोरोनाचे नाव पुसले गेले आहे.  पण अशात चीनमध्ये नवीन एका रोगानं हातपाय पसरायला सुरुवात केली आहे.  चीनमध्ये पसरणा-या या रोगानं चीनची (China) राजधानी बीजिंगमध्ये अवघी रुग्णालये हाऊसफुल्ल झाली आहेत.  कोरोनाच्या काळात चीनने जशी लपवाछपवी करण्याचा प्रयत्न केला, तसाच प्रयत्न चीन आत्ता पसरत असलेल्या या गुढ आजाराबाबतही करत आहे.  मात्र जागतिक आरोग्य संघटनेने चीनला यावेळी वेळीच इशारा देऊन, या नव्या विषाणूबाबत माहिती द्यावी, असा सज्जड दम दिला आहे.  अर्थात या सगळ्याला चीनने (China) नकार दिला आहे.  बीजिंगमध्ये ज्या रोगाला सर्वाधिक लहान मुले बळी पडली आहेत, तो साधा न्युमोनियाचा ताप असल्याचा दावा केला आहे.  

कोरोनानंतर चीन (China) पुन्हा एकदा एका रहस्यमय आजाराच्या विळख्यात सापडला आहे.  चीनमधील अनेक भागातील रुग्णालयात दाखल होणाऱ्या मुलांची संख्या झपाट्याने वाढत आहे. या आजाराचा वाढता प्रादुर्भाव पाहून जागतिक आरोग्य संघटनेनं चिंता व्यक्त केली आहे.  तसेच चीनकडे या आजाराबाबत अधिक माहिती मागितली आहे.  मात्र चीननं हा न्युमोनिया असल्याचे म्हटले आहे.   असे असले तरी चीनच्या बिजींगमधील सर्व रुग्णालये हाऊसफुल झाली आहेत.  यामध्ये लहान मुलांचे प्रमाण जास्त आहे.  या सर्व मुलांना उच्च ताप आणि फुफ्फुसात जळजळ, खोकला आणि सर्दी यांसारखी लक्षणे दिसून आली आहेत. बीजिंगसह 800 किमी दूरची रुग्णालये अशीच तक्रार असलेल्या रुग्णांनी भरलेली आहेत.  चीन याबाबत कितीही नकार देत असला तरी सोशल मिडियावर यासंदर्भात अनेकांनी व्हिडिओ शेअर केले आहेत.  त्यावर चीनपासून (China) पुन्हा सावधान राहण्याची गरज अशी कॅप्शन लिहिली गेली आहेत.  

जागतिक आरोग्य संघटना ऑक्टोबर पासून चीनमधील परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहे.  उत्तर चीनमधील लहान मुलांमध्ये श्वसनाचे आजार वाढत असल्याचे निरिक्षण पुढे आले.  यातून आरोग्य संघटनेनं चीनला आवश्यक ती काळजी घेण्याची सूचना केली आहे.  चीनमध्ये (China) पुन्हा मास्क सक्ती लागू करण्यात येत आहे.  तसेच सोशल डिस्टशनचा नियमही पाळण्यात येऊ लागला आहे.  शिवाय चीनमध्या ज्या भागात हा रोग पसरला आहे, तेथील शाळा पूर्णपणे बंद करण्यात आल्या आहेत.  

चीनमध्ये सोशल मिडियाबाबत कठोर नियम आहेत.  त्यामुळेच कोरोनासारखी घातक महामारी लपवून ठेवण्यात आली.  त्याचा परिणाम नंतर अवघ्या जगानं भोगला.  आताही चीनमध्ये (China) या नव्या रोगाबाबत गुप्तता पाळली आहे.  मात्र प्रो-मेड नावाच्या पाळत ठेवणाऱ्या प्लॅटफॉर्मने चीनमधील न्यूमोनियाबाबत जगभरातील अलर्ट जारी केला आहे. चीनमधील कोरोनाची घातक स्थिती प्रो-मेडने डिसेंबर 2019 मध्ये जागसमोर आणली होती.

चीन ज्याचा न्युमोनिया म्हणून उल्लेख करीत आहे, तो आजार सध्या फक्त लहान मुलांनाच झालेला आहे.  चीनमध्ये सद्य परिस्थितीत प्रचंड थंडी आहे. तापमान शून्य अंशांच्या जवळ जाण्याची शक्यता आहे.  त्याचा फटका बसून लहान मुलांना न्युमोनिया होत असल्याचा चीनचा दावा आहे.   असे असले तरी एका चिनी वृत्तवाहिनीनेच सरकारचा हा दावा फोल ठरवला आहे.  कारण मुलांच्या शरीराचे तपमान अचानक वाढत असल्याचे वृत्त त्यांनी दिले आहे.  शिवाय त्यांच्या फुफ्फुसात गाठी तयार होत असून मुले बोलताबोलता धापा टाकत आहेत.  या सर्वांमुळे चीनमध्ये (China) घबराट असून रुग्णालयांबाहेर मोठ्या रांगा आहेत.  दोन तास तरी अशा रांगामध्ये उभे रहावे लागत असल्याचे लहानमुलांच्या पालकांचे म्हणणे आहे.  चीनच्या वृत्तपत्रानेही कोरोनाची आठवण करुन देणारी परिस्थिती, असे वर्णन या घटनेचे केले आहे.  

============

हे देखील वाचा : नागालॅंडच्या सौदर्यापुढे परदेशही फिक्के

============

या सर्वांबाबत काळजी करण्यासारखी अन्य घटना म्हणजे, चीनपाठोपाठ नेपाळमध्येही तापाच्या रुग्णांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे.  चीनमध्ये (China) न्युमोनिया झाल्यावर जी लक्षणे दिसून आली आहेत.  तशीच लक्षणे नेपाळमधील रुग्णांध्येही दिसून आली आहेत.  यामुळे नेपाळमधील आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.  इन्फ्लूएंझा A, इन्फ्लूएंझा B च्या रुग्णांची संख्या नेपाळमध्ये वाढली आहे.  चीनपाठोपाठ नेपाळमध्येही तापाचे रुग्ण वाढल्यानं आरोग्य संघटना अधिक सतर्क झाल्या आहेत.  

सई बने

 


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.