Home » ‘ह्या’ अभिनेत्रीचा अमिताभ बच्चनसोबत बॉलिवूड डेब्यू फ्लॉप, आता आहे TV वरील सर्वाधिक महागडी अभिनेत्री

‘ह्या’ अभिनेत्रीचा अमिताभ बच्चनसोबत बॉलिवूड डेब्यू फ्लॉप, आता आहे TV वरील सर्वाधिक महागडी अभिनेत्री

काही अभिनेत्री अशा आहेत ज्यांनी करियरची सुरुवात रुपेरी पडद्यापासून केली. पण बॉलिवूडमध्ये त्यांची जादू चालली नाही.

by Team Gajawaja
0 comment
entertainment
Share

Entertainment : काही अभिनेत्री अशा आहेत ज्यांनी करियरची सुरुवात रुपेरी पडद्यापासून केली. पण बॉलिवूडमध्ये त्यांची जादू चालली नाही. अशातच अभिनेत्रींनी आपले नशीब टेलिव्हिजनवर आजमवण्याचा निर्णय घेतला. यापैकीच एक अभिनेत्री तिचे सिनेमे फ्लॉप ठरल्यानंतर आज टेलिव्हिजनची सर्वाधिक महागडी अभिनेत्री म्हणून ओखळली जाते.

बॉलिवूडमधील डेब्यू फ्लॉप
श्रद्धा आर्याने अमिताभ भच्चन, शाहिद कपूरसारख्या बॉलिवूडमधील काही कलाकारांसोबत काम केले आहे. पण आता टेलिव्हिजनवरील सर्वाधिक प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून श्रद्धा आर्या ओखळली जाते. श्रद्धाने आपल्या करियरची सुरुवात वर्ष 2009 मध्ये तमिळ सिनेमा कलवानिन कडाली येथून केली होती. यानंतर श्रद्धा आर्याने अमिताभ बच्चनचा सिनेमा निशब्द मधून बॉलिवूडमधून डेब्यू केला. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला.

यानंतर श्रद्धा आर्या शाहिद कपूरचा सिनेमा पाठशालामध्ये झळकली. दरम्यान, श्रद्धा आर्या बॉलिवूडसोबत तेलुगु इंडस्ट्रीमध्येही आपले नशीब आजमावून पाहत होती. यानंतर अभिनेत्रीने वर्ष 2011 मध्ये टेलिव्हिजनवरील शो ‘मैं लक्ष्मी तेरे आंगन की’ पासून करियरची सुरुवात केली. (Entertainment)

टेलिव्हिजनवरील सर्वाधिक कमाई करणारी अभिनेत्री
‘मैं लक्ष्मी तेरे आंगन की’ मालिकेतून श्रद्धा आर्याला प्रसिद्धी मिळाल्यानंतर अन्य काही मालिका देखील केल्या. श्रद्धा ड्रीम गर्ल, बॉक्स क्रिकेट लीग-2, मजाक मजाक मे आणि नच बलिए-9 मध्येही झळकली होती. आज श्रद्धा आर्या जेनिफर विंगेट, रुपाली गांगुलीसह काही प्रसिद्ध अभिनेत्रींच्या लिस्टमधील एक आहे.


आणखी वाचा :
शाहरुख खानसोबत काम करायला घाबरतो अनुराग कश्यप? मुलाखतीत सांगितले यामागील कारण
जून महिन्यात प्रदर्शित होणार ‘या’ धमाकेदार वेब सीरिज

Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.