Home » अन्यथा न्युयॉर्कला जलसमाधी मिळणार…

अन्यथा न्युयॉर्कला जलसमाधी मिळणार…

by Team Gajawaja
0 comment
New York
Share

कदाचित हॉलिवूडमधील चित्रपटातील एका दृष्याची आठवण होईल.  मात्र आता हेच चित्रपटातील दृष्य खरे होणार अशी भविष्यवाणी हवामानतज्ञांनीजगातील न्युयॉर्कसारखी ती मोठी शहरे काही वर्षातच पाण्याखाली जाणार आहेत, असे सांगितले तर कोणाला खरं वाटेल का?   केली असून जग या नव्या संकटाच्या चक्रात सापडल्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे.  यामागे त्यांनी कारण दिले आहे, तेही भीतीदायक आहे. (New York)

अंटार्क्टिक द्वीपकल्पाच्या उत्तरेकडील टोकापासून जगातील सर्वात मोठा हिमखंड वितळण्यास सुरुवात झाली आहे.  परिणामी या हिमखंडानं आपली जागा सोडली आहे.  हा हिमखंड एवढा मोठा आहे, की तो पाण्यात वितळण्यास सुरुवात झाली की समुद्राच्या पाण्याची पातळी अचानक वाढणार आहे.  यामुळे समुद्रकाठावर असलेल्या शहरांना मोठा धोका आहे.  यात पहिले नाव अमेरिकेच्या न्युयॉर्कचे आहे.  हा हिमखंड हिमखंड न्यूयॉर्क शहराच्या जवळपास तिप्पट आणि ग्रेटर लंडनच्या दुप्पट आहे.  त्यामुळे भविष्यात येणा-या या संकटापासून सांभाळण्यासाठी आत्तापासूनच तयारी करायला हवी, असे तज्ञांचे मत आहे.  असे न झाल्यास अवघी शहरेच्या शहरे पाण्याखाली जाण्याची शक्यताही या तज्ञांनी वर्तवली आहे.  

गेल्या अनेक वर्षापासून जागतिक हवामानात बदल होत असल्याची चर्चा आहे.  वाढत्या प्रदुषणामुळे भविष्यात मानवाच्या जीवनात मोठी संकटे येण्याची शक्यता आहे.  याची सुरुवातच झाली आहे, असे सांगितल्यास वावगे ठरणार नाही.  कारण अलिकडेच हवामान बदलाचा एक मोठा परिणाम समोर आला आहे.  न्युयॉर्क शहरापेक्षा जवळपास तिप्पट मोठा असलेला जगातील सर्वात मोठा हिमखंड तब्बल 37 वर्षांनंतर समुद्रात घसरत पुढे चालला आहे.  ब्रिटीश अंटार्क्टिक सर्वेक्षणानुसार, आणि उपग्रहावरुन आलेल्या फोटोवरुन हवामान तज्ञांनी याबाबत पुष्टी केली आहे. (New York)

या हिम प्रतिमांनी हे स्पष्ट केले आहे की A23a या नावाचा हिमखंड समुद्रात पुढे चालला असून त्याचे तुकडे होण्याची शक्यता आहे.  हा A23a हिमखंड अंटार्क्टिक द्वीपकल्पाच्या उत्तरेकडील टोकापासून पुढे सरकत असून हिमखंड दक्षिण महासागराच्या दिशेनं जात आहे.  4000 स्क्वेअर किलोमीटर म्हणजेच 1500 स्क्वेअर मैल क्षेत्रात पसरलेला हा हिमखंड 1986 मध्ये अंटार्क्टिक किनारपट्टीपासून वेगळा झाला.  त्यानंतर गेली काही वर्ष हा A23a हिमखंड वेडेल समुद्रात आला.  तिथे स्थिरावल्यानंतर  काही वर्षांनी या हिमखंडानं वेग पकडल्याचे स्पष्ट झाले आहे.  त्यामुळेच सर्व शास्त्रज्ञ चिंतीत झाले आहेत.  (New York)

1986 पासून या हिमखंडावर ब्रिटीश अंटार्क्टिक टिमतर्फे लक्ष ठेवण्यात येत आहे.  यासाठी उपग्रहांचीही मदत घेण्यात येते. तेव्हापासून दिवसादिवसाला या हिमखंडाच्या हालचालींचा रिपोर्ट संबंधित विभागाकडे दिला जातो आणि त्याचा अभ्यास केला जातो.  यावरुनच हा A23a  हिमखंड किती महत्त्वाचा आहे, याचा अंदाज येतो. 

पहिल्यांदाच या हिमखंडाची मोठी हालचाल दिसून आली आहे.  वेडेल समुद्राच्या तळाशी मोठ्या प्रमाणात अडकल्यामुळे हिमखंड स्थिर होता.  मात्र अलीकडील उपग्रहांवरुन आलेल्या फोटोवरुन हिमखंडाची हालचाल सुरु झाली असल्याची भीती शास्त्रज्ञांना आहे.  एक ट्रिलियन मेट्रिक टन वजनाचा हा खडक जोरदार वारा आणि समुद्राच्या प्रवाहांच्या मदतीने अंटार्क्टिक द्वीपकल्पाच्या उत्तरेकडील टोकाकडे वेगाने सरकत आहे. एक वर्षापासून या हालचाली होत होत्या,  मात्र त्यांनी आता वेग घेतल्याचे ब्रिटिश अंटार्क्टिक सर्व्हेचे रिमोट सेन्सिंग तज्ज्ञ अँड्र्यू फ्लेमिंग यांनी सांगितले. (New York)

हा हिमखंड म्हणजे, एका मोठ्या शहरासारखाच आहे.  एवढा मोठा हिमखंड बघणे हेच एका दुर्मिळ अनुभवासारखे आहे.  पण या दुर्मिळ अनुभवामागची भीती शास्त्रज्ञांना आहे.  कारण एवढी वर्ष समुद्रात राहिल्यानंतर हिमखंडावरील बर्फही मोकळा होत आहे.  त्याचे वजन कमी झाल्यानं हिमखंड समुद्रसपाटीपासून वर आला आहे.  तसेच समुद्राचे प्रवाह आणि वारे हिमखंडास पुढे नेत आहे.  आता हा A23a हिमखंड जॉर्जिया बेटाच्या आजूबाजूला असल्याचे शास्त्रज्ञांनी सांगितले. (New York)

=============

हे देखील वाचा : उत्तरकाशीचा बोगदा आणि बौखनाग बाबांची चर्चा…

=============

हिमखंडाचे लहान तुकडे होण्याचीही शक्यता आहे.  हे तुकडेही काही छोटे नसून एका लहान शहराएवढे असणार आहेत.  ते दक्षिण आफ्रिकेकडे सरकण्याचीही शक्यता आहे.  याचा सर्वात जास्त फटका समुद्रावर चालू असलेल्या वाहतुकीला बसणार आहे.  एखाद्या जहाजाच्या मार्गावर हे हिमखंडाचे तुकडे आल्यास जहाजाला मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे.  शिवाय हिमखंडामुळे स्थानिक समुद्रातील पाणी थंड होणार आहे.  यामुळे सील, पेंग्विन आणि सागरी पक्ष्यांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.  मात्र जसजसा हा हिमखंड वितळू लागेल आणि त्याची विभागणी होत जाईल, तसे त्याच्यापासून समुद्रकिना-यावर वसलेल्या मोठ्या शहरांना धोका निर्माण होईल, अशी भीती शास्त्रज्ञांना आहे.  

सई बने

 


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.