टेस्ला कंपनीचे मालक एलन मस्क (Elon Musk) आता ट्विटरचे नवे मालक झाले आहेत. त्यांनी ट्विटरची कमान आपल्याकडे घेतल्यानंतर ट्विटरचे सीईओ पराग अग्रवाल आणि सीएफओ नेड सेगल यांची कंपनीतून हकालपट्टी केली आहे. मस्क यांनी कंपनीच्या ४ प्रमुख कार्यकारी अधिकाऱ्यांना हटवले आहे. ऐवढेच नव्हे तर पराग यांच्यासह काढण्यात आलेल्या बड्या अधिकाऱ्यांना सॅन फ्रांसिस्को हेडक्वार्टर मधून ही काढून टाकले आहे
न्यूयॉर्क टाइम्सनुसार, एलन मस्क यांनी ट्विटर खरेदी करण्यासाठी ४४ अरब अमेरिकन डॉलरचा करार केला होता. कंपनीची सुत्र हातात घेतल्यानंतर एलन मस्क यांनी आधीच चार बड्या अधिकाऱ्यांना काढून टाकले.यामध्ये पराग अग्रवाल, सीएफओ नेड सेगल यांच्यासह जनरल काउंसिल सियान एजेट यांचा समावेश आहे. पराग अग्रवाल यांना गेल्या वर्षात नोव्हेंबर महिन्यात कंपनीच्या सह-संस्थापक जॅक डोर्सी यांच्या राजीनाम्यानंतर ट्विटरचे सीईओ पद दिले गेले होते.
सुत्रांच्या मते, जेव्हा ट्विटरसोबत मस्क (Elon Musk) यांनी करार पूर्ण केला तेव्हा पराग अग्रवाल कार्यालयातच होते. त्यानंतर त्यांना ऑफिसच्या बाहेर काढण्यात आले. मात्र यावर एलन मस्क किंवा कोणत्याही अधिकाऱ्याकडून काही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. दरम्यान, १३ एप्रिलला एलन मस्क यांनी ट्विटर खरेदी करण्याची घोषणा केली होती. त्यांनी या प्लॅटफॉर्मला ५४.२ डॉलर प्रति शेयरच्या रेटने ४४ अरब डॉलरमध्ये खरेदी करण्याची ऑफर दिली होती.
हे देखील वाचा- ISRO ने खरी साजरी केली दिवाळी, बाहुबली रॉकेट LVM3 ने पुन्हा रचला इतिहास
मस्क आणि पराग अग्रवाल यांच्यामध्ये झाले होते वाद
आयआयटी बॉम्बे आणि स्टॅनफॉर्ड युनिव्हर्सिटीतून शिक्षण घेतलेले पराग अग्रवाल यांनी एका दशकपेक्षा अधिक काळ ट्विटरमध्ये नोकरी केली. त्यावेळी कंपनीत १ हजारांहून फार कमी कर्मचारी होते. गेल्या वर्षात ट्विटरचे सीईओ म्हणून नियुक्त करण्यात आलेले अग्रवाल यांचे मस्क यांच्यासोबत सार्वजनिक आणि खासगी रुपात वाद झाले. मस्क यांनी कंटेंट मॉडरेशन प्रकरणी आडकाठी करत सार्वजनिक रुपात टीका केली होती.
दरम्यान, ट्विटरच्या कराराला त्यांनी २७ ऑक्टोंबरला अंतिम रुप दिले. जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती एलन मस्क यांना आधी ४४ अरब डॉलरच्या डीलमध्ये आपल्या गुंतवणूकीला १५ अरब डॉलरपेक्षा अधिक मर्यादित ठेवायचे होते. अशी अपेक्षा केली जात होती की, टेस्ला मधील त्यांचे स्टेक जवळजवळ १२.५ बिलियन डॉलरचे कर्जाची मदत मिळेल. त्यासाठी मस्क यांनी टेस्लाचे शेअर्स विक्री करण्यासाठी टाळले असेल. दक्षिण अफ्रिकेत जन्मलेले मस्क यांच्याकडे एकूण संपत्ती २२० बिलियन डॉलर आहे. मस्क यांची याआधी ट्विटर मध्ये ९.६ टक्के मार्केट हिस्सेदारी होती.