Electric Vehicles Tips : बाइकला आग लागण्याचे प्रकरण एक मोठी घटना म्हणून समोर येऊ शकते. आग लागण्यामागे काही कारणे असू शकतात. देशातील बहुतांश ठिकाणी उन्हाळ्याच्या काळात अत्याधिक तापमानामुळे आग लागल्याच्या घटना समोर आल्या होत्या. अशातच आग लागण्यामागे काही तांत्रिक कारणेही आहेत.
बाइकला आग लागण्याचे कारण
भारतात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढत चालली आहे. अशातच ई-बाइक्सच्या सेफ्टीबद्दल चिंता वाढली जात आहे. जाणून घेऊया इलेक्ट्रिक बाइकला आग लागण्यामागील काय कारण असू शकते याबद्दल सविस्तर…
लिथियम बॅटरी वेगाने गरम होणे
मार्केटमध्ये बहुतांश बाइकसाठी लिथिअम आयन बॅटरीचा वापर केला जातो. ज्यामध्ये ज्वलनशील इलेक्ट्रोलाइड फ्लूड भरला जातो. जर ही बॅटरी अत्याधिक प्रमाणात गरम झाल्यास फुटण्याची शक्यता वाढली जाते. अशातच वाहनाला आग लागू शकते.
खराब पार्ट्सचा वापर
तुम्ही बाइकसाठी खराब पार्ट्सचा वापर वारंवार करत असाल तर तुमच्या बाइकमधील लिथिअम आयन बॅटवर वाईट परिणाम होऊ शकतो. यामुळे बॅटरी खराब होण्याची शक्यता अधिक वाढली जाते.
बाइकला आग लागण्यापासून कसे दूर रहाल?
ई-बाइकला आग लागण्याच्या घटनेपासून दूर राहण्यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. जर तुम्ही पुढील काही सेफ्टी टिप्स फॉलो केल्यात तर नक्कीच वाहनाला आग लागण्याचा धोका कमी होऊ शकतो.
योग्य ठिकाणाहून वाहन खरेदी करा
जर तुम्ही ई-बाइक खरेदी करण्याचा विचार करत असाल तर विश्वासू डीलरकडून खरेदी करा. याशिवाय बॅटरीसाठी दिल्या जाणाऱ्या गॅरेंटीबद्दलही माहिती विचारून घ्या.
मूळ पार्ट्सचा वापर
बाइकमध्ये नेहमीच अशा कंपोनंट्सचा वापर करावा ज्यामध्ये निर्माता कंपनीकडून दिले गेले आहेत. बाइकसाठी दुसऱ्या अन्य सोर्ससाठी चार्जर अथवा बॅटरीचा अजिबात वापर करू नये. असे करणे धोकादायक ठरू शकते. डुप्लिकेट्स पार्ट्सचा वापर बाइकसह तुम्हालाही धोक्यात घालू शकतो. (Electric Vehicles Tips)
चार्जिंग पॉइंट निवडताना घ्या काळजी
इ-बाइक्स नेहमीच मान्यताप्राप्त चार्जिंग पॉइंट येथूनच चार्ज करावी. बाइक चार्ज करण्याआधी जाणून घ्या ज्या चार्जिंग स्टेशनजवळ इ-बाइक चार्ज करत आहे ते स्थानक सरकार मान्य आहे की नाही.