इजिप्तची भूमी ही संशोधकांसाठी नेहमी आव्हानात्मक राहिली आहे. गेल्या काही वर्षापासून याच इजिप्तमध्ये मोठ्या प्रमाणात खोदकाम सुरु असून त्यातून पुरातन वस्तू संपादन करण्यात येत आहेत. यातून हजारो वर्षापूर्वीचा समाज कसा होता, याचा अभ्यास करण्यात येत आहे. या संशोधनात संशोधकांच्या हाती मोठं घबाड लागलं आहे. हे घबाड म्हणजे, सोन्या-चांदीची नाणी किंवा हिरे, मोती नाहीत, तर मातीची मोठी भांडी आहेत. (Egypt)
आता या मातीच्या भांड्यांचे एवढे कौतुक कशाला, हा प्रश्न पडला असेल तर ही मातीची भांडी थोडीथोडकी नव्हे तर चक्क 5000 वर्ष जुनी आहेत, आणि या भांड्यामध्ये तेव्हाच्या वाइनचे अवशेष संशोधकांना मिळाले आहेत. इजिप्तमधील अबायडोस येथील राणी मेरेट नीथच्या थडग्यातून अशी वाइन असलेली शेकडो भांडी सापडली आहेत. या भांड्यामध्ये वाइनचे अंश सापडले असून ही भांडी सुरक्षित ठेवण्यासाठी लावलेले आवरणही संशोधकांसाठी महत्त्वाचे वाटत आहे. या सर्वात आणखी एका गोष्टीवर संशोधकांची नजर गेली आहे, ती म्हणजे, या सर्व भांड्यातील वाइनही द्राक्षांपासून बनवलेली होती. या द्राक्षांच्या बियाही या भांड्यांमध्ये आहेत. त्यामुळे सुमारे 5000 वर्षापूर्वीची द्राक्ष कशी होती यावरही आता अभ्यास करण्यात येणार आहे. एकूण इजिप्तची राणी मेरेट निथच्या थडग्यातून कुठल्याही सोन्यापेक्षा जीवनाचे अंश शोधण्याची वाट मिळाल्याचा दावा या संशोधकांनी केला आहे. (International News)
इजिप्तमधील पुरातत्वशास्त्रज्ञांनी 5000 वर्ष जुने वाइन जार शोधले आहेत. हे जार संशोधकांना मोठ्या खजिन्यासारखे वाटत आहेत. आश्चर्य म्हणजे, एवढ्या वर्षापूर्वीचे हे जार अजूनही सीलबंद आहेत, आणि त्यात वाइनचे अंश अस्तित्वात आहेत. इजिप्तमध्ये एकेकाळी आपले वर्चस्व प्रस्थापित करणा-या राणी मेरेट नीथ हिच्या थडग्यातून हे वाइनचे अनेक जार मिळाले आहेत. या वाइन जार ची माहिती घेण्यापूर्वी राणी मेरेट नीथबद्दल जाणून घेऊया. इजिप्तमध्ये या राणीला, राजा म्हणून ओळखले जायचे. कारण राणी मेरेट नीथचा पराक्रम मोठा आहे. राणी मेरेट-नीथ ही इजिप्तची पहिली महिला शासक होती. या राणीनं इजिप्तमध्ये आपल्या शासन काळात ठसा उमटवला आहे. त्यामुळेच या राणीचं निधन झाल्यावर तिचे जे थडगे बनवले गेले ते अतिशय भव्य असे आहे. या थडग्याचा शोध गेल्या काही वर्षापासून व्हिएन्ना विद्यापीठातील पुरातत्वशास्त्रज्ञ क्रिस्टियाना कोहलर यांच्या नेतृत्वाखालील एक टिम करीत आहे. 5000 वर्षापूर्वीचे हे राणी मेरेट नीथचे थडगे जेव्हा या संशोधकांना मिळाले तेव्हा त्यातील वस्तू बघून सर्वच संशोधक आश्चर्यकारक झाले. (Egypt)
राणी मेरेट नीथच्या या भव्य थडग्याच्या आसपास शेकडे वाइन जार लावण्यात आले होते. आकारानं चांगलेच मोठे असलेले हे वाइन जार सुव्यवस्थित असून ते सीलबंद करण्याची पद्धतही अनोखी आहे. तत्कालीन राजवंशात राजा किंवा राणीचे निधन झाले तर त्यांच्यासोबत वाइन देण्यात येत असे. राणी मेरेट नीथच्या अंतीम काळातही अशीच वाइन तिच्यासोबत देण्यात आली होती. हे हजारो वर्षापूर्वीचे जार अजूनही तशाच अवस्थेत सापडले आहेत. त्यातील अनेक जार सीलबंद आहेत. या सर्व जारमध्ये संशोधकांना हजारो वर्षापूर्वीची वाइन तयार करण्याची पद्धती दिसत आहे. या सर्व वाइन जारमध्ये असलेली वाइन ही द्राक्षापासून केल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे. या वाइनच्या भांड्यांना मातीत पुरल्यामुळे त्यातील वाइन सुरक्षित असल्याचेही संशोधक सांगत आहेत. यात द्राक्षांच्या बियाही आहेत. या द्राक्षांच्या बियांपासून हजारो वर्षापूर्वीच्या द्राक्षशेतीचा अभ्यास करण्यात येणार आहे. (International News)
==========
हे देखील वाचा : Vaishnavi Hagawane : वैष्णवी हगवणे प्रकरणात नाव आलेला निलेश चव्हाण आहे तरी कोण?
Taj Lake Palace : पुष्पबंता पॅलेस ते स्टार पुष्पबंता पॅलेस हॉटेल !
==========
शिवाय या द्राक्षाच्या बिया आधुनिक द्राक्षांच्या जातींशी अनुवांशिक संबंध शोधण्यास मदत करणार आहेत. या सर्व वाइन जारचा अभ्यास व्हिएन्ना विद्यापीठातील पुरातत्वशास्त्रज्ञ क्रिस्टियाना कोहलर या करत आहेत. या जारांच्या रासायनिक विश्लेषणातून त्या काळातील वाइनमध्ये कोणते घटक होते, कोणत्या प्रकारची द्राक्षे वापरली जात होती शिवाय त्यात आयुर्वेदिक आणि कुठले सुगंधी पदार्थ मिसळले गेले होते, याचा शोध करण्यात येणार आहे. या वाइनच्या जारांमुळे राणी मेरेटच्या काळात, वाइन हे फक्त पेय नव्हते तर त्याचा वापर धार्मिक कार्यातही होत होता का, याचाही शोध घेण्यात येणार आहे. एकूण 5000 वर्षापूर्वीची ही वाइन आता संशोधकांसाठी अनमोल ठरली आहे. (Egypt)
सई बने