Home » महिलांमध्ये Egg Freezing चा ट्रेंन्ड का वाढतोय?

महिलांमध्ये Egg Freezing चा ट्रेंन्ड का वाढतोय?

by Team Gajawaja
0 comment
Egg Freezing
Share

प्रियंका चोपडाने नुकत्याच एका प्रसिद्ध अमेरिकन अॅक्टर डॅक्स शेफर्ड पॉडकास्ट आर्मचेअर एक्सपर्ट शो मध्ये आपल्या खासगी आयुष्यातील काही निर्णयांबद्दल चर्च केली. त्यावेळी तिने असे म्हटले की, आईच्या सल्ल्यानुसार आपले एज फ्रिज केले होते. ३० व्या वर्षात घेण्यात आलेल्या या निर्णयमुळे तिला आयुष्यात आपण मुक्तपणे काही गोष्टी करु शकतो असे वाटत आहे. प्रियंका आता ४० वर्षाची असून तिने गायक निक जोनस याच्यासोबत विवाह केल्यानंतर आनंदाने वैवाहिक आयुष्य जगत आहे. एग फ्रिजिंगच्या तंत्रज्ञानामळे तिला मुलगी झाली आणि मालती मेरी चोपडा जोनस असे तिचे नाव ठेवले गेले आहे.(Egg Freezing)

मेडिकल न्यूज टुडे यांच्या मते एग फ्रिजिंग एक मेडिकल प्रक्रिया आहे. ज्यामध्ये एका महिलेकडे हा ऑप्शन असतो की, मुल जन्माला घालण्याचे वय निघून गेल्यानंतर सुद्धा सरोगेसीच्या माध्यमातून बाळाला जन्म देता येतो. खरंतर जसे वय वाढते तेव्हा महिलांमधील अंडाशयाची गुणवत्ता कमी होते. अशातच महिलांना बाळाला जन्म देण्यासाठी काही वेळेस अमर्थ ठरु शकते अथवा काही समस्या उद्भवतात. अशातच एग फ्रिजिंग हा ऑप्शन निवडला जातो.

एग फ्रिजिंगचा ट्रेंड का वाढतोय?
-करियर आणि शिक्षण प्लॅनमध्ये सुविधा
ज्या महिलांना अॅडवान्स अथवा हायर एज्युकेशनची डिग्री मिळवू इच्छितात अथवा करियरच्या कारणास्तव त्यांना प्रेग्नेंसीची संधी मिळत नाही. अशातच महिला तरुणाव्यस्थेतच आपल्या भविष्याचा प्लॅन करण्यासाठी एग फ्रिज करु शकतात. असे केल्याने महिलांकडे एक स्वातंत्र्य असते की, त्या त्यांचे शिक्षण असो किंवा करियर पूर्ण करु शकतात.

-व्यतिगत परिस्थिती
ज्या महिलांना मुलं जन्माला घालायचे असते पण तो पर्यंत त्यांना परफेक्ट लाइफ पार्टनर मिळत नाही अशातच भविष्यात त्याचा वापर करण्यासाठी त्या आपले एग फ्रिज करु शकतात. समलैंगिक संबंधांमधअये राहणाऱ्या महिलांमध्ये सुद्धा कालांतराने मुलं जन्माला घालण्याची इच्छा होऊ शकते.(Egg Freezing)

-कॅन्सर पीडित महिलांसाठी ऑप्शन
जर महिलेला कॅन्सर झाला असेल तर किमोथेरपी अथवा अन्य कॅन्सर उपचाराच्या रुपात त्यांची प्रजनन क्षमता कमी होते आणि काही वेळेस तर प्रजनन क्षमता पूर्णपणे संपते. अशा महिला आपले एग अधीच फ्रिज करु शकतात आणि उपचारानंतर फॅमिली प्लॅनिंग करु शकतात.

हे देखील वाचा- दात दुखणे आणि कॅविटीमुळे त्रस्त असाल तर ‘या’ घरगुती उपायांनी दूर करा समस्या

-आरोग्यासंबंधित समस्या झाल्यास होतो फायदा
काही महिलांमध्ये आरोग्यासंबंधित समस्यांमुळे प्रजनन क्षमता कमी होऊ शकते. अंड्यांची गुणवत्ता आणि प्रजनन क्षमतेला कोणतेही नुकसान होऊ नये म्हणून त्या एग फ्रिज करु शकतात. एंडोमेट्रियोसिस, एक अशी स्थिती असते ज्याच्या कारणास्तव गर्भाकातील उतर गर्भ बाहेर वाढू लागतात आणि समस्या होते. अशातच फ्रिजिंग अंड त्या महिलांना अशी अपेक्षा देते ज्या काही गंभीर आजारावर उपचार करत आहेत आणि त्यांची प्रजनन क्षमता कमी झाली आहे तरीही तुम्ही मुलं जन्माला घालू शकता.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.