अंड्याचे सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. कारण यामध्ये काही पोषक तत्व असतात. यामध्ये मुख्य रुपाने प्रोटीन, एसेंशियल अनसॅच्युरेटेड फॅटी अॅसिड, लोहन, विटामीन ए, बी ६ आणि बी १२, फोलेट, एमिनो अॅसिड, फॉस्फरस आणि सेलेनियम असतात. परंतु अंड हे पोषक जरी मानले जात असले तरीही असे फूड खाण्यासाठी सुद्धा काही मर्यादा घालून दिलेली असते. जर तुम्ही याचे अधिक सेवन करत असाल तर यामुळे शरिराला काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो. अशातच थंडीचे दिवस सुरु झाले असून तुम्ही अंडी खात असाल तर थोडी काळजी घ्यावी लागणार आहे. (Egg Eat Tips)
-लूज मोशन
अंड्याच्या पिवळ्या हिस्स्यामध्ये कोलेस्ट्रॉल अधिक असते. जर एका दिवसात अधिक अंड्यांचे सेवन केले तर त्या स्थितीत लूज मोशन सुद्धा होऊ शकते. जिम करणारी लोक सुद्धा अंड्याचा सफेद हिस्सा खातात.
-हार्ट अटॅकचा धोका
पबमेडमध्ये छापून आलेल्या रिपोर्ट्सनुसार, अंड्याचे अधिक सेवन केल्याने शरिरातील कोलेस्ट्रॉलचा स्तर वाढतो. बॅड कोलेस्ट्रॉल वाढल्यास त्याकडे दुर्लक्ष केल्यास हार्ट अटॅकचा धोका वाढू शकतो.
-गॅसची समस्या
अंड्यामुळे अशी एक समस्या येऊ शकते की, त्यामुळे शरिरात गॅस होऊ शकतो. ट्रेंडला फॉलो करण्याच्या नादात तीन ते चार अंड्यांचे ऑम्लेट लोक आनंदाने खातात. मात्र नंतर डोक आणि अन्य हिस्स्यांमध्ये दुखण्यास सुरुवात होते.
-रक्तातील साखरेचे प्रमाण
तुम्हाला माहिती आहे का, सुपरफूड मानले जाणारे अंड शरिरात इंन्सुलिनला डिस्टर्ब करु शकतात. अशातच रक्तातील साखरेचे प्रमाण वाढू शकते. जर ही समस्या सातत्याने होत असेल तर मधुमेह होण्याची शक्यता असते.
दरम्यान, अंडे उत्तम पद्धतीने शिजवले नाही तर तुम्हाला उलटी होऊ शकते. त्याचसोबत ज्यांना मधुमेह किंवा हृदयरोगाची समस्या असते त्यांनी अंड्याचे अधिक सेवन करण्यापासून दूर रहावे.(Egg Eat Tips)
हे देखील वाचा- मधुमेह असलेल्या रुग्णांच्या ‘या’ चुकांमुळे होते रक्तातील साखर नियंत्रणाबाहेर जाते
अंडी खरेदी करताना कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे?
-अंडी खरेदी करताना ते सामान्य आकाराचे असावे
-अंडी दुकानात दीर्घकाळ ठेवली असतील तर ती खरेदी करु नका. काही वेळेस अंडी दीर्घकाळ ठेवली गेली असतील तर ती खराब होऊ शकतात.
-अंड ताजं आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी तुम्ही ते पाण्यात टाकून पाहू शकता. जर अंड पाण्यात बुडले की, समजून जा ते अंड ताजं आहे.