Home » Millet : हिवाळ्यातील सुपरफूड अशी ओळख असलेल्या बाजरीचे जाणून घ्या फायदे

Millet : हिवाळ्यातील सुपरफूड अशी ओळख असलेल्या बाजरीचे जाणून घ्या फायदे

by Jyotsna Kulkarni
0 comment
Millet
Share

आजच्या धकाधकीच्या जीवनात बऱ्याच प्रमाणात लोकं आपल्या आरोग्याच्या बाबतीत सजग होताना दिसत आहे. खूप जास्त शक्य नसले तरी आपल्या खाण्यापिण्यात थोड्याफार प्रमाणात बदल करून प्रत्येक जण आपला फिटनेस जपत आहे. अशातच आहारात बदल करताना सर्वात आधी प्रत्येक जण पोळी खाणे बंद करतो. याच पोळीला पर्याय म्हणून तज्ज्ञ सल्ला देतात तो भाकरी खाण्याचा. भाकरी खाणे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने अतिशय उत्तम आणि लाभदायक समजले जाते. (Millets)

आता जेव्हा भाकरीचा विषय येतो तेव्हा ज्वारी, नाचणी, तांदूळ, बाजरी यांच्या भाकरी खाल्ल्या जातात. यात बहुतकरून नाचणी आणि तांदुळाच्या भाकरी सर्वात जास्त खाल्ल्या जातात. मात्र यासोबतच बाजरीची भाकरी आपल्या तब्येतीसाठी खूपच फायदेशीर आहे. त्यामुळे बाजरीचे आपल्या आहारात सेवन करणे खूपच आवश्यक आहे. खासकरून सध्याच्या हिवाळ्यात बाजरी खूपच उत्तम आहे. यामध्ये फायबर, प्रथिने, जीवनसत्वे आणि खनिजे भरपूर प्रमाणात असतात. बाजरीत असलेले फायबर पचन संस्थेला निरोगी ठेवण्यास मदत करते आणि वजन कमी करण्यासही मदत करते. हिवाळ्यात बाजरी खाल्ल्याने आपल्या शरीराला अनेक लाभ होतात बाजरी आरोग्याच्या दृष्टीने सुपरफूड समजली जाते. हिवाळ्यात ही बाजरी खाल्ल्याने नक्की कोणते फायदे होतात चला जाणून घेऊया. (Winter Health)

बाजरीमध्ये आयर्न, मॅग्नेशियम, झिंक यांसारखी पोषकद्रव्ये भरपूर प्रमाणात असतात. यामुळे हाडे मजबूत होतात आणि हृदयाचे आरोग्य सुधारते. बाजरीच्या नियमित सेवनाने कोलेस्ट्रॉल कमी होतो, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो. बाजरी पचनास हलकी असते. बाजरीची भाकरी खाल्ल्यानंतर दीर्घकाळ पोट भरल्यासारखे वाटते, त्यामुळे वारंवार भूक लागत नाही आणि वजन नियंत्रणात राहते. बद्धकोष्ठता, पोटफुगी यांसारख्या त्रासांवरही बाजरीचा सकारात्मक परिणाम होतो. (Marathi News)

हिवाळ्यात शरीराला उर्जा आणि उबदारपणाची जास्त गरज असते. बाजरी ही नैसर्गिक उष्णता निर्माण करणारी अन्नपदार्थ आहे, जी शरीरात उष्णता निर्माण करते. याच्या सेवनाने हिवाळ्यात शरीर आतून उबदार राहते आणि सर्दी-खोकल्यासारख्या समस्यांपासूनही बचाव होतो. बाजरी ही ग्लुटेन फ्री असल्यामुळे ही इतर आरोग्यासाठी कधीही चांगली आहे. बाजरीत भरपूर प्रमाणात कॅल्शियम तसंच व्हिटॅमिन बी, फायबर, प्रथिने, कार्ब्स, लोह, खनिजे आणि फायटेट, फिनॉल आणि टॅनिनसारखे अँटीऑक्सिडंट् असतात. बाजरीही उष्ण असल्याने हिवाळ्यात खाल्ल्याने शरीरात आतून उबदार बनवते. तसंच ही पचन्यास हलकी असते. (Todays Marathi Headline)

Millet

बाजरीत प्री-बायोटिक असल्याने मधुमेहाच्या रुग्णांनाही डॉक्टर जेवण्यात बाजरी भाकरी खायला सांगतात. ओमेगा 3 फॅटी अॅसिड हे शरीरासाठी आवश्यक असून पेशी दुरुस्त महत्त्वाची भूमिका बजावतो. हे पॉलीअनसॅच्युरेटेड फॅट्स असून ते फक्त अन्नपदार्थांमधून आपण्यास मिळते त्यामुळे बाजरीची भाकरी खाल्ल्यामुळे तुमच्या शरीराला ओमेगा ३ मिळते. इतर धान्यांपेक्षा बाजरीच्या पिठात सर्वात जास्त ओमेगा ३ फॅटी अॅसिड आढळते. बाजरी अनेक गुणांनी समृद्ध असून या पिठाचं सेवन केल्यास तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. महत्त्वाचे म्हणजे बाजरीमुळे तुमच्या शरीरात जमा झालेले विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत होते. त्यामुळे याचा फायदा किडनी आणि यकृताला होतो. (Latest Marathi News)

बाजरीत अँटिऑक्सिडंट्सचा चांगला डोस असतो, जो शरीराला हानिकारक फ्री रॅडिकल्सपासून वाचवतो. कॅन्सरसारख्या आजारांपासून संरक्षण मिळण्यास मदत होते. याव्यतिरिक्त, बाजरीत फायटोकेमिकल्स असतात जे कर्करोगाच्या पेशींच्या वाढीस प्रतिबंध करू शकतात. ज्या महिलांना पीसीओडीची समस्या आहे त्या महिलांसाठी बाजरीची भाकरी नक्कीच वरदान ठरते. मासिक पाळीच्या दिवसात अथवा नियमित याचे सेवन केल्यामुळे पोटातील दुखणे कमी होते. याशिवाय बाजरीचा फायदा पीसीओडीची समस्या कमी करण्यासाठीही होतो. (Top Marathi News)

बाजारीच्या भाकरीचे नियमित सेवन केल्यामुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रणात येते. कोलेस्ट्रॉलची पातळी घटविण्याचे काम बाजरीतील पोषक तत्व करतात. त्यामुळे हृदयाशी संबंधित आजार कमी होतात. याशिवाय बाजरी हा मॅग्नेशियम आणि पोटॅशियमचा चांगला स्रोत असल्याने रक्तदाब नियंत्रित करून कोलेस्ट्रॉल घटवते. बाजरी उष्ण गुणधर्माची आहे. त्यामुळे तिच्या सेवनामुळे जळजळ होण्याची शक्यता असते असे अनेकांना वाटते. पण थंडीत तुम्हाला जळजळ कमी करण्यासाठी नक्कीच बाजरीची उपयोग करून घेता येतो. मात्र प्रमाणात याचे सेवन करा. याबरोबर लोणी अथवा तूप नक्की खा. (Latest Marathi Headline)

बाजरीची भाकरी चवीला उत्तम असते आणि शरीरासाठी पौष्टिक असते. लहान मुलांनी आणि अगदी मोठ्या माणसांनीही बाजरीची भाकरी दुधात कुस्करून खाल्ली तर शरीराला अधिक चांगले पोषण मिळते आणि लहान मुलांची तब्बेतही सुधारते. बाजरीचे नियमित सेवन केल्याने हाडांना चांगली मजबूती मिळते आणि तुम्ही अनेक आजारांपासूनही दूर राहता. विशेषतः थंडीच्या दिवसात तुम्ही बाजरी खायला हवी. बाजरी खाण्याचे फायदे अनेक आहेत. तसंच केवळ भाकरीच नाही तर बाजरीचे अनेक पदार्थ तुम्हाला घरच्या घरी तयार करता येतात. पण जेवणात याचा समावेश करून घेणे गरजेचे आहे. (Top Trending News)

=======

Millets : विंटर स्पेशल बाजरीच्या चविष्ट रेसिपी

Winter : चविष्ट आणि चटपटीत हिवाळा स्पेशल लोणच्यांच्या रेसिपी

=======

बाळंतीण झालेल्या महिलांसाठी तर बाजरी हे धान्य वरदान आहे. महिलांना भरपूर दूध येण्यासाठी आणि पोटातील वातामुळे येणाऱ्या कळा घालविण्यासाठी बाजरी लाभदायक ठरते. जेवणात बाजरीची भाकरी आणि सकाळी उपाशीपोटी जर बाजरीच्या पिठाचा घाटा घेणे फायदेशीर असते. बाळंत झाल्यानंतर शरीराला ऊर्जेची आवश्यकता असते आणि ही ऊर्जा बाजरीतून मिळते. बाजरीत अँटिऑक्सिडंट असतात जे त्वचा निरोगी ठेवण्यास मदत करतात. अँटिऑक्सिडंट केसांना चमकदार बनवण्यासाठी सुद्धा मदत करतात. (Social News)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.