Home » Health : दररोज केळी खाल्ल्याने होतील ‘हे’ चमत्कारिक फायदे

Health : दररोज केळी खाल्ल्याने होतील ‘हे’ चमत्कारिक फायदे

by Jyotsna Kulkarni
0 comment
Health
Share

कायम आपल्या आहारात आपण फळांचा समावेश केला पाहिजे, असे डॉक्टर आणि तज्ज्ञ लोकं नेहमी सांगतात. कारण फळांमुळे आपले आरोग्य अधिक उत्तम आणि सुदृढ राहण्यास मदत होते. आरोग्याच्या लहान मोठ्या सर्वच तक्रारी फळांच्या सेवनामुळे दूर होतात. फळं मनुष्याच्या आरोग्यासाठी कोणत्याही अमृतापेक्षा कमी नाहीये. याच फळांमधील एक लोकप्रिय फळ म्हणजे ‘केळी’. केळी अनेकांना बऱ्यापैकी आवडते. बाराही महिने मिळणारे फळ म्हणून केळीची ओळख आहे. (Health)

शिवाय केळी हे भारतातील सर्वाधिक लोकप्रिय आणि पौष्टिक फळांपैकी एक आहे. यामध्ये असलेले नैसर्गिक पोषक घटक शरीरासाठी अत्यंत फायदेशीर असतात, यामुळं याला ‘सुपरफूड’ देखील म्हणतात. केळीमध्ये अनेक आरोग्यदायी पोषक घटक आहेत. ज्यामुळे आरोग्याविषयक अनेक समस्यांपासून आराम मिळतो. केळी म्हणजे पटकन एनर्जी देणारे सहज उपलब्ध होणारे फळ आहे. केळीमध्ये अनेक पोषक घटक असतात. पोटॅशियम, जस्त, लोह यांसारख्या खनिजांसोबतच केळी हे ऊर्जेचा एक मजबूत स्त्रोत आहे, ज्यामध्ये अ, ब, क आणि ई जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात असतात. (Banana Benefits)

दररोज दोन केळी खाण्यास सुरुवात केली तर त्याचे अनेक सकारात्मक आरोग्य फायदे मिळू शकतात. मुख्य म्हणजे भारतासोबतच केळी हे जगात सर्वात जास्त खाल्लं जाणारे फळ आहे. यात अनेक आवश्यक जीवनसत्त्वं आणि खनिजं असतात. सहज मिळणारं आणि पटकन खाता येणारं हे फळ आहे. दररोज जर तुम्ही न चुकता केळीचे सेवन केले तर तुम्हाला खूपच कमी वेळात अनेक चांगले परिणाम दिसून येतील. केळी खाल्ल्याने कोणते फायदे होतात चला जाणून घेऊया. (Health Care Tips)

बद्धकोष्ठतेसाठी फायदेशीर
केळी पोटॅशियम आणि लोहाचा स्रोत आहे. याशिवाय, हे व्हिटॅमिन-सी, बी-6 आणि फायबरने समृद्ध फळ आहे. केळी बद्धकोष्ठतेपासून तणाव दूर करण्यास आणि आयुर्वेदाची कमतरता भरून काढण्यास मदत करते. त्यामुळे गरोदरपणात दररोज केळी खावी. केळीमध्ये स्टार्च, फायबर, व्हिटॅमिन सी आणि ए, थायामिन, रिबोफ्लेविन, फॉस्फरस, पोटॅशियम, कॅल्शियम आणि लोह भरपूर प्रमाणात असते. जे शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. (Marathi Top News)

Health

ऊर्जेचा उत्कृष्ट स्रोत
अनेकदा ज्यांना पोटाचा त्रास असतो त्यांना केळी खाण्याचा सल्ला दिला जातो. तसेच केळी हे नैसर्गिक साखर आणि फायबरचे उत्तम मिश्रण आहे. ते त्वरित ऊर्जा प्रदान करतात. ज्यामुळे नक्कीच ऊर्जा मिळते. म्हणूनच खेळाडू आणि जिममध्ये जाणारे लोक व्यायामापूर्वी आणि नंतर केळी खातात. (Marathi Health News)

किडनीचे आरोग्य सुधारते
केळी खाल्ल्याने किडनीचं आरोग्य सुधारण्यास मदत होते. यामध्ये पोटॅशियम मुबलक प्रमाणात असते. त्यामुळे नियमत सेवन केल्यास किडनीचे आरोग्य सुधारते. तसंच केळी रक्तदाब नियंत्रित करण्यास आणि किडनीचा दाब कमी करण्यास देखील मदत करते. (Todays Marathi Headline)

पचनसंस्था मजबूत होते
केळी पचनासाठी खूप फायदेशीर असते. केळीमधील आहारातील फायबर अन्न पचवण्यास मदत करते. त्यामध्ये प्रीबायोटिक्स देखील असतात , जे आतड्यांमध्ये चांगल्या बॅक्टेरियाच्या वाढीस प्रोत्साहन देतात. केळीचे सेवन करणे बद्धकोष्ठतेसाठी खूप प्रभावी मानले जाते. (Top Marathi Stories)

तणाव दूर करण्यासाठी फायदेशीर
आजकाल ताणतणाव ही एक सामान्य समस्या बनली आहे.केळी देखील यामध्ये मदत करू शकतात. त्यामध्ये ट्रिप्टोफॅन असते, जे शरीराला “फील-गुड” हार्मोन सेरोटोनिनच्या निर्मितीसाठी आवश्यक असते. सेरोटोनिन मूड सुधारण्यास, तणाव कमी करण्यास आणि चांगली झोप घेण्यास मदत करते. (Health Care)

हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर
केळीमध्ये पोटॅशियम भरपूर प्रमाणात असते. जे हृदयाच्या आरोग्यासाठी आवश्यक असलेले खनिज आहे. पोटॅशियम शरीरातील सोडियमच्या परिणामांचे संतुलन राखून रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करते. ज्यामुळे उच्च रक्तदाब आणि हृदयरोगाचा धोका कमी होतो. दररोज दोन केळी खाल्ल्याने शरीराला भरपूर पोटॅशियम मिळते, ज्यामुळे हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा धोका कमी होऊ शकतो. (Latest Marathi Headline)

Health

त्वचेचे आरोग्य सुधारते​
​केळी हे व्हिटॅमिन ए, सी आणि ई चा चांगला स्रोत आहे, जे त्यांच्या त्वचेच्या फायद्यांसाठी ओळखले जाते. हे पोषक घटक निरोगी त्वचा राखण्यात, वृद्धत्वाची चिन्हे कमी करण्यात आणि त्वचेचा पोत आणि हायड्रेशन सुधारण्यात मदत करतात.​ (Social Updates) 

हाडांचे आरोग्य सुधारते
​केळीमध्ये अत्यावश्यक जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात, ज्यात व्हिटॅमिन सी आणि मँगनीज यांचा समावेश असतो, जे हाडांच्या आरोग्यासाठी आवश्यक असतात. ते कोलेजनचे उत्पादन आणि हाडांच्या मजबूतीमध्ये मदत करतात, संभाव्यत: ऑस्टियोपोरोसिस आणि फ्रॅक्चरचा धोका कमी करतात. ​ (Top Stories)

मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर
​केळीमधील फायबर, विशेषतः पेक्टिन, रक्तप्रवाहात साखरेचे शोषण कमी करण्यास मदत करते. हे रक्तातील साखरेची पातळी स्थिर ठेवण्यास मदत करू शकते, मधुमेह असलेल्या व्यक्तींसाठी किंवा त्यांच्या रक्तातील साखरेचे व्यवस्थापन करू पाहणाऱ्यांसाठी केळी हे एक योग्य फळ आहे.​ (Latest Marathi News)

शरीरातील रक्ताची पातळी टिकवते
शरीरात लोहाच्या कमतरतेमुळे अशक्तपणा किंवा रक्ताची कमतरता होते. केळीमध्ये लोहाचे प्रमाण चांगले असते, जे हिमोग्लोबिन तयार करण्यास मदत करते. याव्यतिरिक्त, त्यामध्ये असलेले व्हिटॅमिन बी 6 शरीरात हिमोग्लोबिन उत्पादनासाठी जबाबदार असते. (Top Marathi Headline )

रक्तदाबावर नियंत्रण
केळीमध्ये पोटॅशियम असते जे शरीरासाठी आवश्यक खनिज आहे. पोटॅशियम एक व्हॅसोडिलेशन एजंट म्हणून कार्य करते जे चिंता कमी करण्यास मदत करते आणि रक्तवाहिन्यांवरील दबाव कमी करते. हे रक्तदाब नियंत्रित करते आणि हृदयरोग आणि पक्षाघाताचा धोका कमी करते. (Marathi News)

वजन कमी करण्यास उपयुक्त
केळीमध्ये कॅलरीज कमी आणि फायबर जास्त असते. त्यामुळे ते खाल्ल्याने तुम्हाला जास्त काळ पोट भरलेले राहण्यास मदत होते, ज्यामुळे जास्त खाणे टाळले जाते. (Top Trending Headline)

पुरळ कमी होण्यास मदत
केळीमध्ये अनेक पोषक घटक असतात, उदाहरणार्थ, व्हिटॅमिन ए, जस्त आणि मॅंगनीज, ज्यात दाहक-विरोधी गुणधर्म असतात. केळीची साल चेहऱ्यावर चोळल्याने मुरुमांपासून सुटका मिळण्यास मदत होते तसेच मुरुमांचे डाग कमी होण्यासही मदत होते. (Top Trending News)

========

World Mental Health Day 2025 : स्वतःचे मानसिक आरोग्य हेल्दी राहण्यासाठी दैनंदिन जीवनात कोणते नियम फॉलो करावे?

Healthy Meal Ideas : निरोगी आणि हेल्दी राहण्यासाठी आहारात करा या गोष्टींचा समावेश

========

चांगली झोप लागते
संध्याकाळी केळी खाणे ही चांगली सवय आहे. पोटॅशियमयुक्त केळी दिवसभराच्या मेहनतीनंतर स्नायूंना आराम देण्यास मदत करतात. संध्याकाळी उशिरा एक-दोन केळी खाल्ल्याने थकवा कमी होतो आणि झोप चांगली लागते. (Social News)

(टीप: ही माहिती केवळ सामान्य ज्ञानासाठी दिली आहे. आम्ही या माहितीची हमी देत नाही. आरोग्यविषयक कोणतेही उपाय करण्यापूर्वी तज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.