बऱ्याच महिन्यांपासून पावसामुळे कंटाळलेले लोकं आता आनंदाची दिसत आहे. पाऊसाने आता निरोप घेतला असून थंडीची देखील चाहूल लागली आहे. हिवाळा म्हणजे सगळ्याचाच आवडता ऋतू. या काळात उत्तम खाऊन उत्तम स्वास्थ बनवता येत असल्याने या काळात अतिशय पौष्टिक खाण्यावर भर दिला जातो. थंडीच्या दिवसांमधे शरीराची रोगप्रतिकारशक्ती काहीशी कमकुवत होते. याशिवाय वातावरणात थंडावा वाढतो आणि शरीरात देखील याच वाढलेल्या थंडाव्यामुळे प्रकृतीला नुकसान होते. (Winter Special)
थंडीच्या दिवसात विविध आजार डोके वर काढतात. त्यामुळेच या ऋतूमध्ये सतत आपल्या आहारात उष्ण आणि पौष्टिक पदार्थांचे सेवन केलेले चांगले मानले जाते. यासाठी थंडीची चाहूल लागली की, घरांमध्ये थंडीचे पौष्टिक लाडू बनवण्याचे काम सुरु होते. फार पूर्वीपासून थंडीमध्ये खाल्ले जाणारे खास लाडू बनवण्याची प्रथा प्रचलित आहे. प्रत्येक घरामध्ये हे लाडू विविध प्रकारे बनवले जातात. आज आपण याच थंडीमध्ये खाल्ले जाणाऱ्या लाडूंची विविध प्रकारची रेसिपी जाणून घेऊया. (Winter ladoo)
ड्रायफ्रूट लाडू
साहित्य
तूप, काजू, बदाम, खोबरा किस, मनुका, खजूर, आवडीनुसार अजून इतर ड्रायफ्रूट
कृती
सर्वात आधी खजूर आणि खोबरा किस सोडून सर्व ड्रायफ्रूट काजू, बदाम, मनुका हे तुपामध्ये तळून घ्यायचे. छान भाजून घेतल्यानंतर ते मिक्सर मधून थोडे जाडसर वाटून घ्यायचे आहे. सर्व वाटून झाल्यानंतर त्यात खजूर आणि खोबरं किस टाकावा. आता सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचं. त्यात दूध, पाणी काहीही टाकायची गरज नाही. गरज पडल्यास त्यात तुम्ही आवश्यकतेनुसार तुप टाकून शकता. सर्व झाल्यानंतर लाडू वळावे. आपले ड्रायफ्रूट लाडू तयार. (Marathi News)

=========
India : भारतीय संघाच्या जर्सीचा रंग निळाच का असतो?
=========
डिंकाचे लाडू
साहित्य
१/२ किलो बारीक डिंक, १/४ किलो खारीक, १/४ किलो आळीव, १/४ किलो खसखस, १ किलो सुकं खोबरे, १/४ किलो गूळ, साजूक तूप, वेलची पूड, जायफळ पूड
कृती
सर्वप्रथम डिंक तुपात फुलवून घ्यावा. त्यानंतर खसखस, आळीव, खारीक आणि सुकं खोबरं हे सर्व साहित्य भाजून घ्यावे. नंतर तळलेला डिंक खलबत्यात थोडासा कुटून घ्यावा. तसेच खमंगपणा येण्यासाठी खसखस मिक्सरवर वाटून घ्यावी. खारीकसुध्दा मिक्सरवर जराशी जाडसर वाटून घ्यावी. हे सर्व मिश्रण एकत्र करून घ्यावे. त्यात वेलची पूड, जायफळ पूड, गूळ घालून त्यानंतर हे सर्व मिश्रण हातानेच बारीक करावे. गरज भासल्यास अजून थोडे तूप गरम करून पातळ करून घाला व परत चांगले मिक्स करून त्याचे लाडू वळून घ्या. (Todays Marathi Headline)
अळीव लाडू
साहित्य
अळीव – अर्धी वाटी, गूळ – १.५ वाटी, ओलं खोबरं – २ ते ३ वाट्या, तूप – १ चमचा, नारळाचे पाणी
कृती
रात्रभर अळीव नारळाच्या पाण्यात भिजत घाला. सकाळी हे अळीव तिपटीने फुगतात. कढईमध्ये तूप घालून त्यात अळीव आणि खोबरं घालायचं. हे दोन्ही चांगले एकजीव करावे. मग यामध्ये गूळ घालून हे मिश्रण सतत हलवत राहायचे. साधारणपणे १५ ते २० मिनीटे एकजीव झाले की गॅस बंद करा.थोडे गार झाले की याचे एकसारखे लाडू बनवा ते नंतर खाण्यासाठी तयार. (Top Marathi News)
गूळ ड्रायफ्रूट्स लाडू
साहित्य
१ वाटी चिरलेला गूळ, १/२ वाटी बदाम, १/२ वाटी काजू, १/४ वाटी पिस्ता, २ चमचे खसखस, १/२ चमचा वेलची पावडर, १-२ चमचे तूप, ४-५ खजूर बी काढून बारीक चिरलेले
कृती
एका कढईत १ चमचा तूप गरम करा. त्यात बदाम, काजू आणि पिस्ता घालून मध्यम आचेवर २-३ मिनिटे हलके भाजून घ्या. भाजले की बाजूला काढून थंड होऊ द्या. खसखस देखील हलकी भाजून घ्या. त्याच कढईत उरलेले तूप घालून चिरलेला गूळ घाला. कमी आचेवर वितळवा. सतत हलवत राहा जेणेकरून गूळ एकसारखा वितळेल आणि चिकट होणार नाही. (जर खजूर वापरत असाल तर तेही याच वेळी घालून मॅश करा.) गूळ पूर्ण वितळून चिकट सर झाला की गॅस बंद करा. वितळलेल्या गुळात भाजलेले ड्रायफ्रूट्स, खसखस आणि वेलची पावडर घालून लगेचच चांगले मिक्स करा. मिश्रण गरम असतानाच छोट्या लाडूच्या आकारात वळा. थंड झाल्यावर ते घट्ट होतील. (Latest Marathi News)

मेथी लाडू
साहित्य
१ कप मेथीचे दाणे, १ कप गव्हाचे पीठ, १ कप डिंक, १/२ कप गूळ, १/२ कप तूप, १/२ चमचा आले पावडर, १/२ चमचा वेलची पावडर, १/२ कप बदाम, १/२ कप दूध
कृती
एका कढईत मेथीचे दाणे भाजा. त्यात तूप किंवा तेल टाकण्याची आवश्यकता नाही. मेथीचे दाणे साधारण 2 ते 3 मिनिटे मध्यम आचेवर भाजून घ्या, जेणेकरून त्यांचा कच्चा वास दूर होईल. त्यानंतर ते थंड होण्यास बाजूला ठेवा. दुसऱ्या कढईत गव्हाचे पीठ तूप टाकून मध्यम आचेवर भाजा. हे तूप आणि पीठ चांगले एकजीव होईल आणि पीठ हलक्या सोनेरी रंगाचे होईल. कढईत साजूक तूप घालून त्यात 1 वाटी डिंग फुलेपर्यंत तळून घ्या. डिंक चांगले फुलून वर आल्यावर एका ताटात तो काढून घ्या. त्यानंतर मेथीचे दाणे मिक्सरमध्ये घालून जाडसर पावडर तयार करून घ्या. त्यानंतर डिंकदेखील वाटून घ्या. यानंतर एका कढईत गूळ टाकून त्यामध्ये दूध किंवा थोडं पाणी घालून चांगळे उकळा, गूळ पूर्णपणे वितळून त्याचा पाक तयार करा. या पाकामध्ये गव्हाचे पीठ, मेथी पावडर, तूप, वेलची पावडर, आले पावडर टाकून चांगल्या प्रकारे मिक्स करा. आणि गरमागरम लाडू वळायला घ्या. आवश्यकतेनुसार थोडं दूध किंवा तूप घालून लाडूला आकार द्या. (Top Trending News)
========
Hair Care : ‘हे’ उपाय करून घरच्या घरी पांढऱ्या केसांना करा काळे
Tourism : स्लीप टुरिझम म्हणजे काय? काय आहे हा नवा ट्रेंड?
========
तिळाच्या लाडू
साहित्य
२०० ग्रॅम तीळ, ३ चमचे तूप, ५० ग्रॅम कच्चे शेंगदाणे, ३०० ग्रॅम गूळ
कृती
कढईत तीळ टाकून भाजून घ्या. एका प्लेटमध्ये काढून थंड होण्यासाठी ठेवा. आता त्याच पॅनमध्ये शेंगदाणे टाका आणि सोनेरी होईपर्यंत भाजा. भाजलेले शेंगदाणे दुसऱ्या प्लेटमध्ये काढा. ते थंड झाल्यावर शेंगदाणे बारीक करून घ्या. आता त्याच कढईत तूप मंद आचेवर वितळवून घ्या. कढईत गूळ टाका आणि वितळू द्या. आता गॅसवरून पॅन काढा आणि बाजूला ठेवा. त्यात तीळ आणि भाजलेले शेंगदाणे टाका आणि चांगले मिक्स करा. ही पेस्ट एका वेगळ्या प्लेटमध्ये काढून थंड होऊ द्या. आता या मिश्रणाचे एक एक करून लाडू तयार करा. (Social News)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
