अमेरिकेत अलास्का द्वीपकल्पात 7.3 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला. या भूकंपाच्या तीव्र धक्क्यांमुळे लाखो लोक प्रभावित झाले आहेत. भूकंपानंतर त्सुनामीचा इशारा देखील देण्यात आला होता. मात्र तासाभरानंतर हा इशारा मागे घेण्यात आला. ज्या किनारी भागात भूकंपाचे सर्वाधिक वेळ धक्के जाणवले, तेथील लोकांना वस्ती खाली कऱण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. (Alaska)
या भूकंपाआधीही या भागात लहान मोठे भूकंपाचे धक्के बसत होते. मात्र एवढ्या तीव्रतेचा भूकंप आल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या भूकंपानंतर अमेरिकेत पुन्हा द बिग वन या संभावित मोठ्या भूकंपाची लोकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. ‘द बिग वन’ हा एक भूकंप आहे जो अद्याप झालेला नाही, परंतु तो नक्कीच होईल, असे शास्त्रज्ञांचे मत आहे. अमेरिकेतील कॅलिफोर्नियातील सॅन अँड्रियास फॉल्टशी हे द बिग वन हे नाव जोडले गेले आहे. अमेरिकेच्या या पट्ट्यात कधीतही प्रचंड विनाशकारी भूकंप येईल, असे भूगर्भशास्त्रज्ञांचे मत आहे. अलास्का येथे झालेल्या भूकंपानंतर पुन्हा या द बिग वनची भीती सर्वसामान्य नागरिकांना सतावू लागली आहे. (International News)
अमेरिकेच्या अलास्कामध्ये अनेक ठिकाणी 7.3 तीव्रतेचा भूकंप झाला. या भूकंपाचा किनारी भागात राहणाऱ्या मच्छिमारांना मोठा फटका बसला आहे. भूकंपाचे केंद्र सँड पॉइंटपासून सुमारे 87 किलोमीटर दक्षिणेस होते. भूकंपानंतर, सुमारे 7.5 लाख लोकांना त्सुनामीचा धोका जाहीर झाला, मात्र तो नंतर मागे घेण्यात आला. दक्षिण अलास्का आणि अलास्का द्वीपकल्पात, अलास्कातील युनिमॅक पास आणि पॅसिफिक महासागर किनाऱ्यावर हा भूकंप अधिकवेळ जाणवला. भूकंपाच्या बाबतीत हा सर्वच अलास्का भाग अतिशय संवेदनशील मानला जातो. येथेच मार्च 1964 मध्ये 9.2 रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता. (Alaska)
हा भूकंप उत्तर अमेरिकेतील आतापर्यंतचा सर्वात शक्तिशाली भूकंप ठरला. यात अँकरेज शहर पूर्णपणे उद्ध्वस्त झाले. शिवाय त्सुनामीमुळे अलास्काचे आखात, अमेरिकेचा पश्चिम किनारा आणि हवाई भाग उद्ध्वस्त झाले. कालपरवा आलेल्या या भूकंपामुळे अमेरिकेत याच भूकंपाची आठवण काढण्यात आली. अलास्कामधील भूकंपामुळे काही इमारती आणि रस्तांचेही नुकसान झाले आहे. अद्यापही ज्या भागात भूकंप झाला, तिथे नेमके किती नुकसान झाले आहे, याची पाहणी चालू आहे. गेल्या दोन महिन्यांत अमेरिकेत अनेक भूकंप झाले आहेत. टेक्सासमध्ये 5.0 तीव्रतेचा भूकंप जाणवला. डेनाली बरो, अँकरेज आणि अलास्का येथे 4 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला आहे. आधीच अमेरिकेचा एक भाग हा मुसळधार पावसाचा सामना करत आहे. अशात आलेल्या या विनाशकारी भूकंपामुळे भीतीचे वातावरण तयार झाले आहे. (International News)
अलास्का भूकंप संस्थेच्या मते, एका आठवड्यात येथे जवळपास 400 भूकंपांची नोंद झाली आहे. अलास्कामध्ये दरवर्षी सुमारे 10-15 भूकंपांची नोंद होते. 1938 पासून अलास्कामध्ये पाच मोठ्या भूकंपाच्या घटना घडल्या आहेत. या घटना सामान्यतः दक्षिण-मध्य अलास्का आणि अलेउशियन बेटांवर झाल्या आहेत. येथे दर दोन वर्षांनी 7.0 किंवा त्याहून अधिक तीव्रतेचे भूकंप होतात. या सर्वात द बिग वन थेअरी चर्चेत आली आहे. ” द बिग वन” हा एक भूकंप आहे जो अद्याप झालेला नाही, परंतु तो नक्कीच होईल, याबाबत शास्त्रज्ञांचे ठाम मत आहे. मात्र हा भूकंप कधी, कुठे येईल, याबाबत नेमकी तारिख आणि वेळ सांगू शकत नाहीत. हा द बिग वन भूकंप कॅलिफोर्निया राज्यात अधिक येण्याची शक्यता शास्त्रज्ञांना वाटत आहे. (Alaska)
याबाबत भूगर्भशास्त्रज्ञांनी सविस्तर अभ्यास करुन एक अहवालही प्रसिद्ध केला आहे. त्यानुसार कॅलिफोर्नियाची फॉल्ट लाइन 1000 किलोमीटरपेक्षा जास्त लांब आहे. त्यामुळे येथे कधीही 8 हून अधिक तीव्रतेचा भूकंप होण्याची शक्यता आहे. या भूकंपात लॉस एंजेलिस, सॅन दिएगो आणि सॅन फ्रान्सिस्को सारखी शहरे उद्ध्वस्त होण्याची भीतीही शास्त्रज्ञांना आहे. अमेरिकेत ही द बिग वन थेअरी एवढी चर्चेत असते की, यावर अनेक हॉलिवूड चित्रपट बनवले गेले आहेत. त्यात 1974 मध्ये भूकंप, 1990 मध्ये द बिग वन: द ग्रेट लॉस एंजेलिस अर्थक्विक, 2015 मध्ये आलेल्या सॅन अँड्रियास या चित्रपटांचा समावेश आहे. यामधून द बिग वन भूकंप आल्यास किती विनाश होऊ शकतो, याची चुणूक दाखवण्यात आली आहे. (International News)
=============
हे ही वाचा : Pakistan : जेव्हा पाकिस्तानमध्ये श्रीरामांचा जयघोष होतो….
==========
अलास्कामधील भूकंपानंतर शास्त्रज्ञांना वाटते की, सर्वात मोठा धोका सॅन अँड्रियासकडून नाही तर त्याच्या उत्तरेकडील कॅस्केडिया सबडक्शन झोनमधून आहे. ही फॉल्ट लाइन व्हँकुव्हर पासून उत्तर कॅलिफोर्नियापर्यंत पसरलेली आहे. या झोनमध्ये 9 रिश्टर स्केल हून अधिकचा भूकंप येऊ शकतो, ज्यामुळे सिएटल, पोर्टलँड, वॉशिंग्टन सारख्या प्रमुख शहरांवर परिणाम होऊ होईल, असा अंदाज काही शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे. या भूकंपामुळे 1 लाख चौरस मैलांहून अधिक परिसरात विनाश होण्याची भीतीही शास्त्रज्ञांना आहे. (Alaska)
सई बने
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics