E-cigarette Health Risks : ई-सिगरेट किंवा व्हेपनिंगला अनेकजण तंबाखू सिगरेटचा ‘स्वच्छ’ पर्याय समजतात. परंतु वैद्यकीय तज्ज्ञ, WHO आणि ICMR यांनी स्पष्ट केले आहे की ई-सिगरेट तितक्याच हानिकारक आहेत. काही वेळा पारंपरिक सिगरेटपेक्षाही जास्त! त्यामधील निकोटीन, फ्लेव्हर केमिकल्स, भारी मेटल्स आणि गरम वाफ शरीरातील अनेक महत्त्वाच्या अवयवांना मोठा धोका निर्माण करतात. यामुळे फुफ्फुसांचे गंभीर आजार, हृदयविकाराचा वाढलेला धोका, मेंदूवर परिणाम आणि रोगप्रतिकारक शक्ती कमी होणे असे गुंतागुंतीचे दुष्परिणाम दिसून येऊ शकतात.
फुफ्फुसांवरील गंभीर परिणाम
ई-सिगरेटमध्ये वापरले जाणारे डायअॅसिटायल, फॉर्मलडिहाइड आणि इतर रसायनांचे मिश्रण फुफ्फुसांमध्ये सूज निर्माण करते. यामुळे “EVALI” (E-cigarette or Vaping Associated Lung Injury) नावाचा प्राणघातक आजार होऊ शकतो. तसेच “पॉपकॉर्न लंग” किंवा Bronchiolitis Obliterans या आजारामुळे फुफ्फुसांची क्षमता कमी होते, श्वास घेण्यास त्रास होतो आणि दीर्घकालीन श्वसनविकार उद्भवतात. काही लोकांमध्ये अत्यंत गरम वाफेमुळे फुफ्फुसातील ऊती जळणे किंवा द्रव जमा होणे असेही प्रकार घडतात.
हृदयविकार आणि रक्तवाहिन्यांवर धोका
ई-सिगरेटमधील निकोटीन थेट हृदयाच्या कार्यावर परिणाम करते. निकोटीनमुळे रक्तदाब वाढतो, हृदयाची गती अनियमित होते आणि रक्तवाहिन्यांमधील सूज वाढते. यामुळे दीर्घकाळ व्हेपनिंग करणाऱ्यांमध्ये:
- हृदयविकाराचा झटका,
- स्ट्रोक,
- ब्लॉकेज किंवा कोलेस्टेरॉल जमा होण्याची प्रक्रिया वेगाने वाढते.
काही संशोधनात असेही आढळले आहे की व्हेपनिंगमधील सूक्ष्म धातूंचे कण रक्तात मिसळून रक्तप्रवाहावर परिणाम करतात.

E-cigarette Health Risks
मेंदूवर आणि मानसिक आरोग्यावर परिणाम
तरुणांमध्ये ई-सिगरेट सर्वाधिक हानिकारक ठरते कारण २५ वर्षांपर्यंत मेंदू विकसित होत असतो. निकोटीन मेंदूतील केमिकल्सचा समतोल बिघडवते. त्यामुळे:
- एकाग्रता कमी होणे
- ताण व चिडचिड वाढणे
- व्यसनाची तीव्रता वाढणे
- मेंदूचे निर्णयक्षमता करणारे भाग कमजोर होणे
असे दुष्परिणाम दिसतात. दीर्घकाळ व्हेपनिंग केल्यास नैराश्य, चिंता आणि झोपेचे विकारही वाढू शकतात.
===========
हे देखील वाचा :
Blood Sugar Control : रक्तातील वाढलेल्या शुगरला मधुमेहाच्या रुग्णांनी असे करा कंट्रोल
Winter Pregnancy Care : गर्भवती महिलांनी हिवाळ्यात अशी घ्यावी आरोग्याची काळजी
Vitamin D Deficiency : हिवाळ्यात सतत जाणवणारा थकवा हे व्हिटॅमिन D कमतरतेचे लक्षण तर नाही ना?
===========
तोंड, घसा आणि रोगप्रतिकारक शक्तीवरील दुष्परिणाम
गरम वाफेतील केमिकल्स तोंड आणि घशातील ऊतींना नुकसान करतात. परिणामी:
- घशात जळजळ
- तोंडातील इन्फेक्शन
- दात आणि हिरड्यांचे आजार
- तोंड कोरडे पडणे
यासारख्या समस्या वाढतात. व्हेपनिंगमुळे शरीरातील इम्यून सेल्स कमजोर होत असल्याने संसर्ग पटकन होतात. वारंवार खोकला, श्वासात घरघर आणि सर्दी ही त्याची सुरुवातीची चिन्हे असतात.(E-cigarette Health Risks)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
