Home » काळ्या पैशाला शुभ्र रंग देणारी दुबई

काळ्या पैशाला शुभ्र रंग देणारी दुबई

by Team Gajawaja
0 comment
Dubai Economy
Share

दुबई, या शहराची शान अशी आहे की जगातील प्रत्येक नागरिकाला या शहराला एकदा तरी पाहण्याची इच्छा आहे. सर्वत्र आरशासारखे रस्ते.  त्यावरुन धावणा-या मोठ्या गाड्या,  उंचच उंच इमारती, जगातील प्रख्यात हॉटेल, सोन्याची खाण आहे की काय अशी भारणारी ज्लेलर्सची दुकानं.  दुबईबद्दल विचारु नका, एवढं कौतुक या शहराचे करण्यात येते. (Dubai Economy)

मात्र या शहरामध्ये राहणाऱ्या नागरिकांच्या आर्थिक सुबत्तेसंदर्भात माहिती देणारा एक अहवाल नुकताच प्रसिद्ध झाला आहे.  हा अहवाल सुज्ञ नागरिकांना विचार करायला लावणार आहे.  कारण या दुबईमध्ये सर्वाधिक पैसा जो गुंतवला जात आहे, तो गुन्हेगारी क्षेत्रातील आहे.  काळ्या पैशाला पांढरं करण्यासाठी या दुबईचा आधार घेतला जातो.  यामध्ये भारतीय आघाडीवर आहेत.  तब्बल ३० हजार भारतीयांनी दुबईमध्ये महलवजा घरं घेतली आहेत.

 भारतातील राजकारणी, गुन्हेगारी प्रवृत्तीचे नागरिक, व्यावसायिक आणि चित्रपट जगतातील कलाकार यांची मोठी गुंतवणूक या दुबईमध्ये आहे.  भारतीयांपाठोपाठ पाकिस्तानचा नंबर लागतो.  ज्या देशात गव्हाच्या पिठासाठी ८०० रुपये मोजले जातात, त्याच देशातील सर्वच राजकारण्यांचे मोठे बंगले या दुबईमध्ये आहेत.  शिवाय येथील व्यवसायातही त्यांची गुंतवणूक आहे.  त्यामुळे काळा पैसा गुंतवण्यासाठी आवडते शहर म्हणून दुबईचा उल्लेख करण्यात येत आहे.  

दुबईतील मालमत्तेबाबत (Dubai Economy) एक अहवाल करण्यात आला.  यात जगभरातून हजारो नागरिक जे दुबईत मालमत्ता खरेदी करत आहेत, त्यांचा अभ्यास करण्यात आला.  दुबईमध्ये साधं घर घ्यायचं असेल तरीही करोडो रुपये लागतात. याच दुबईमध्ये एखाद्या महलासारखी घरे घेण्यावर गुंतवणूकदारांचा भर असतो.  एवढा पैसा त्यांच्याकडे येतो कुठून याचा तपास या अहवालात करण्यात आला.  या अहवालात दुबईत येणारा सर्वाधिक पैसा हा गुन्हेगारी मार्गातून येत असल्याचे स्पष्ट झाले. (Dubai Economy)

अनेक गुन्हेगारांची दुबईत मालमत्ता असल्याचे या अहवालात सांगितले आहे. आर्थिक गुन्हेगार आपला काळा पैसा दुबईतील रिअल इस्टेटमध्ये गुंतवत असल्याचे अहवालात म्हटले आहे.  यात भारतीयांसोबत पाकिस्तानी नागरिकांचाही मोठा सहभाग आहे. सुमारे ३०००० भारतीयांची मालमत्ता दुबईत आहे.  तर १७००० पाकिस्तानी नागरिकांची मालमत्ता दुबईत असल्याचे स्पष्ट झाले आहे.  ब्रिटनचे नागरिक तिसऱ्या तर सौदीचे नागरिक चौथ्या क्रमांकावर आहेत.

यात सर्वात आश्चर्य़ व्यक्त होत आहे, ते पाकिस्तानबाबत. सध्या पाकिस्तानची अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे.  तेथील सर्वसामान्य जनतेला दैनंदिन वस्तू मिळवण्यासाठी मारामारी करण्यापर्यंत वेळ आली आहे. अशा परिस्थितीत पाकिस्तानी राजकरण्यांची अरबोंची मालमत्ता दुबईत आहे.  दुबईत त्यांचे आलिशान बंगले आणि घरे आहेत. जागतिक दुबई अनलॉक या अहवालातून या सर्व पाकिस्तानी राजकारण्यांची दुबईतील संपत्ती उघड करण्यात आली आहे.  पाकिस्तानी राजकारण्यांची तब्बल ११ अब्ज डॉलर्स मुल्याची मालमत्ता या दुबईत आहे.  एवढ्या पैशात पाकिस्तानला सुगीचे दिवस येणार आहेत.  (Dubai Economy)

दुबईतील रिअल इस्टेटमध्ये गेल्या काही दशकांत मोठी भर पडली आहे.  अचानक येणा-या या पैशानं सर्वांच्याच भुवया उंचवाल्या.  त्यामुळे हा पैसा नेमका कुठल्या मार्गातून येतो, याचा शोध घेण्यात आला. भारतातीलही अनेकाची गुंतवणूक  दुबईमध्ये आहे.  ज्यांच्यावर जागतिक निर्बंध आणि मनी लाँड्रिंगचे आरोप आहेत त्यांचे गुतवणूकीचे प्रमाण अधिक आहे. अमेरिकेतील न्यूयॉर्क आणि लंडनमधील रिअल इस्टेटमध्येही डर्टी मनीआकर्षित होत असल्याचे अहवालात म्हटले आहे. पण पाश्चिमात्य देशांतील निर्बंधांमुळे धोका असलेले लोक दुबईमध्ये मालमत्ता खरेदी करण्यास प्राधान्य देतात. (Dubai Economy)

==============

हे देखील वाचा : सौदी अरेबियामधील महिला मिस युनिव्हर्स स्पर्धेत सहभागी

==============

दुबईत भारतीयांकडे  असलेल्या मालमत्तांची अंदाजे किंमत $१७ अब्ज आहे. त्यापाठोपाठ पाकिस्तानी राजकारणी आहेत.  पाकिस्तानी राष्ट्राध्यक्ष आसिफ अली झरदारी यांची ३ मुले, हुसेन नवाज शरीफ, गृहमंत्री मोहसिन नक्वी यांच्या पत्नी, ४ खासदार, सिंध आणि बलुचिस्तान विधानसभेचे ६ हून अधिक आमदार,  शिवाय पाकिस्तानचे माजी लष्करप्रमुख जनरल परवेझ मुशर्रफ, माजी पंतप्रधान शौकत अझीझ, डझनभराहून अधिक निवृत्त लष्करी जनरल,  पोलिस प्रमुख, एक राजदूत आणि एक शास्त्रज्ञ यांच्याही नावे दुबईत प्रचंड मालमत्ता आहे.   या सर्व मालमत्तांची किंमत केली तर पाकिस्तानची गरीबी कुठल्याकुठे निघून जाईल, अशी परिस्थिती आहे.  

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.