Home » तूप की एलोवेरा, कोरड्या त्वचेसाठी काय उत्तम?

तूप की एलोवेरा, कोरड्या त्वचेसाठी काय उत्तम?

by Team Gajawaja
0 comment
Skin Care in Monsoon
Share

Dry Skin Care Tips : उन्हाळ्याच्या दिवसात आपण त्वचेकडे अधिक लक्ष देत नाही. पण खरंतर, या दिवसात त्वचेची खास काळजी घ्यावी. कोरड्या त्वचेसाठी तूप आणि एलोवेरा या दोन गोष्टींचा सर्वाधिक केला जातो. पण कोरड्या त्वचेसाठी यामधील काय उत्तम आहे हे माहितेय का? याबद्दलच पुढे जाणून घेऊया. तूप घट्ट असते आणि त्वचेसाठी फायदेशीर ठरते. खासकरुन पायांना भेगा पडणे, कोरड्या ओठांसह त्वचेसाठी तूप वापरू शकता. यामुळे त्वचेमध्ये ओलसरपणा टिकून राहण्यास मदत होते. तर एलोवेरा वजनाने हलके आणि थंड असते. चिकटपणाशिवाय त्वचा हाइड्रेट ठेवण्यास मदत करते. यामुळे एलोवेराचा दररोज वापर करू शकता.

त्वचेला तूप लावण्याचे फायदे
कोरड्या त्वचेसाठी तूपाचा वापर करणे फायदेशीर मानले जाते. यामुळे त्वचा डीप हाइड्रेट होते. हेच कारण आहे की, कोरड्या, फाटलेल्या त्वचेसाठी तूपाचा वापर करू शकता. एवढेच नव्हे तूपामधील व्हिटॅमिन आणि अँटीऑक्सिडेंट्स त्वचेला होणाऱ्या नुकसानीपासून दूर ठेवते. दररोज तूपाचा वापर केल्याने त्वचा कोमल आणि मऊसर होते. अशातच कोरड्या त्वचेमुळे रिंकल्स आणि फाइन लाइन्सची समस्या दूर होऊ शकते.

Purity of ghee

असा करा वापर
तूपाचा मॉइश्चराइजरचा वापर करू शकता. झोपण्यापूर्वी कोरड्या त्वचेवर थोड्याशा प्रमाणात तूपाचा वापर करू शकता. तूप हाताचे कोपरे, गुडघे आणि तळव्यांना लावू शकता.

=======================================================================================================

हेही वाचा : 

Walk : सकाळी अनवाणी गवतावर चाला आणि ‘हे’ चमत्कारिक फायदे मिळवा

ओव्हर इटिंग केल्याने होऊ शकतात या गंभीर समस्या, अशी घ्या काळजी

=======================================================================================================

कोरड्या त्वचेसाठी एलोवेराचे फायदे
एलोवेरा जेल वजनाने हलके असते. यामुळे त्वचेला एलोवेरा जेल लावल्यानंतरही त्वचा चिकट दिसत नाही. त्वचा हाइड्रेट राहण्यास मदत होते. उन्हाळ्यात त्वचा तेलकट होण्यापासून दूर राहण्याासाठी एलोवेरा जेलचा वापर करू शकता. एलोवेरा त्वचेला थंडावा देत असल्याने सनबर्न किंवा जळजळची समस्या दूर होऊ शकते. एलोवेरा त्वचेमधील ओलसरपणा टिकून राहण्यास मदत करते. यामध्ये अँटी-इंफ्लेमेंटरी गुण असतात, जे त्वचा कोरडी आणि उन्हामुळे होणारी जळजळची समस्या शांत करते.(Dry Skin Care Tips)

असा करा वापर
-ताज्या एलोवेरा जेलचा वापर चेहऱ्यासाठी करा.
-एलोवेरा जेल मॉइश्चराइजरच्या रुपात वापरू शकता.
-एलोवेरा सनबर्नच्या उपचारासाठी फायदेशीर मानले जाते.

तूप की एलोवेरा, कशाचा वापर करावा?
तूप आणि एलोवेरा त्वचेसाठी फायदेशीर मानले जातात. पण उन्हाळ्याच्या दिवसात एलोवेरा अत्याधिक उपयुक्त मानले जाते. यामुळे त्वचेला थंडावा मिळण्यासह त्वचा हाइड्रेट राहते. याउलट तूपाचा वापर उन्हाळ्यात करणे टाळा. असे केल्याने त्वचा कालांतराने अधिक तेलकट होऊ शकते.


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.