Home » नाटक माझ्यासाठी मेडिटेशन थेरपी – पूजा कातुर्डे

नाटक माझ्यासाठी मेडिटेशन थेरपी – पूजा कातुर्डे

by Team Gajawaja
0 comment
पूजा कातुर्डे
Share

अभिनेत्री पूजा कातुर्डेला आत्तापर्यंत विविध मालिकेत पाहिले आहे. मालिकेतील ग्लॅमरस अभिनेत्री म्हणून तिची ओळख आहे. तरुण कलाकार सध्या मालिका, वेबसिरीजकडे वळतात. पण, पूजा मात्र तेवढीच नाटक वेडी आहे. नाटक तिच्यासाठी मेडिटेशन थेरपी आहे, जगण्याची नशा आहे.

पूजा कातुर्डेने आत्तापर्यंत अहिल्या बाई होळकर, गणपती बाप्पा मोरया, विठू माऊली, बाकरवडी, सांग तू आहेस का ? अशा मालिका, तर बबन, ती वेळ अशा सिनेमात काम केले आहे

पूजा आपल्या नाटकाच्या प्रवासाबद्दल सांगते, ‘’ कलाकार म्हणून सुरुवात करत असताना आपली वेगवेगळी स्वप्न असतात. खरंतर लहानपणापासून माझा आणि नाटकाचा काही संबंध नव्हता. पण, 2015-2016 मध्ये पुण्यामध्ये प्रदीप वैद्य यांचे थिएटर वर्कशॉप केले. त्या वर्कशॉपनंतर आम्हाला एकपात्री प्रयोग बसवायला सांगितला होता.

जेव्हा प्रयोग सादर करायची वेळ आली मला अजुनही तो दिवस आठवतो, उत्साह होता तेवढंच टेन्शनही होतं. मला तो क्षण जगायचा होता, भीती होती, पोटात गोळा आलेला, अश्या सगळ्या संमिश्र भावनांनी मी प्रयोग केला. ती 40 मिनीटे खूप काही शिकवून गेली.

====

हे देखील वाचा: ‘रौद्र’साठी संस्कृत शिकली उर्मिला जगताप

====

त्यावेळी प्रेक्षकांच्या मिळणा-या प्रतिक्रीया, झालेल्या चूका, केलेली मजा हा संपूर्ण अनुभव खूप काही शिकवणारा होता. त्यानंतर मी रंगभूमीच्या प्रेमात पडले. विविध भाषांतील, विविध प्रकारची नाटकं पाहिली.

पूजाने आत्तापर्यंत प्रयोगिक एकांकिका केल्या आहेत. त्यात एलाब सोलो एक्ट प्ले, कवडसा सोलो एक्ट याचा समावेश आहे. त्याशिवाय 2019 मध्ये पूजाने तिचा मित्र चैतन्य सरदेशपांडे सोबत गुगलीफाय या नाटकाचे प्रयोग केले.

मध्यंतरी लॉकडाऊनमुळे बंद असलेले हे नाटक पुन्हा सुरु केले आहे. या नाटकाबद्दल पूजा सांगते, ‘’ दुनियादारी फिल्मी स्टाईल या मालिकेच्या शूटिंगच्या वेळी मी आणि चैतन्य वज्रेश्वरीला शूट करत होतो. त्यावेळी मला नाटक करायचे आहे, हे मी चैतन्यला सांगितले. त्यावेळी आम्ही हॉटेलमध्ये बसलो होतो. तेव्हा आजुबाजूला सगळे मोबाईलमध्ये होते, त्यावेळी आम्हाला या नाटकाची कल्पना सुचली आणि त्यानंतर काही महिन्यांनी चैतन्य हे नाटक घेऊन माझ्याकडे आला. ‘’

‘ गुगलीफाय ’ हे नाटक आजच्या पिढीचे आहे, जी इंटरनेट पिढी झाली आहे. सगळं काही गुगलला विचारणारी. पण, त्यामुळे आपली स्मरणशक्ती कमी होत चालली आहे. त्याचा गंभीर परीणाम नात्यावरही होत आहे. यावर हे नाटक आधारीत आहे. या नाटकाला बक्षिसेही मिळाली आहेत.

जागतिक रंगभूमी दिनानिमित्त पूजा सांगते, ‘’सध्या कलाकारांकडे वेगवेगळ्या संधी आहेत. पण, तरीही कलाकारांनी नाटकांचा अनुभव घेतलाच पाहिजे. माझ्यासाठी सुख म्हणजे काय ? असं कोणी विचारलं तर मी रंगभूमी सांगेन.

====

हे देखील वाचा: ‘स्वरलता… तुला दंडवत’ कार्यक्रमातून गानसम्रज्ञी लता मंगेशकर यांना मानवंदना

===

नाटकासारखा अनुभव कुठेच नाही. टीव्ही- वेबसिरीजचा कधीतरी कंटाळा येऊ शकतो. पण, नाटकाचा कधीच कंटाळा येत नाही. मला कधी उदास वाटलं किंवा पुढे काय करावं हे सुचलं नाही की मी नाटकाकडे वळते. नाटक मला एनर्जी देते.”


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.