२८ जानेवारी १९७७, हिमाचल प्रदेशाच्या मुख्यमंत्र्यांनी पदाचा राजीनामा दिला आणि गाडी-बंगला सोडून थेट बस पकडली. ती बस त्यांच्या गावाकडे जाणारी होती. कोणाला काही समजण्यापूर्वीच ते आपल्या घरी सिरमौर येथे रवाना झाले होते. एक नेता ज्याने इतकी वर्ष मुख्यमंत्री पद भुषवले आणि पदाचा राजीनामा दिल्यानंतर एचआरसीची बस पकडून आपले घर गाठले. हे सर्व आश्चर्यचकीत करणारी गोष्ट आहे. ज्यांनी हे केले ते म्हणजे हिमाचल प्रदेशाचे पहिले मुख्यमंत्री डॉ. यशवंत सिंह परमार (Dr. Yashwant Singh Parmar). हिमाचलचे गठन ते त्याच्या विकासासाठीचे कार्याचे श्रेय हे त्यांनाच जाते. तर जाणून घेऊयात त्यांच्याबद्दलच अधिक.
हिमाचलचे निर्माते होते डॉ. परमार
डॉ. परमार हे सिरमौर जिह्याचे वरिष्ठ सचिव आनंद सिंह भंडारी यांच्या घरी ४ ऑस्ट १९०६ मध्ये जन्मले होते. प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर बीए करण्यासाठी ते लाहौरला गेले आणि लखनौ येथून विवि मधून एलएलबी केल्यानंतर पीएचडी सुद्धा केली. त्यांचा संबंध जिल्ह्याशी असल्याने सिरमौर येथे परतल्यानंतर त्यांना न्यायाधीश बनण्यात आले. एका वादाच्या निर्णयामुळे त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि १९४१ मध्ये प्रजामंडळात सहभागी झाले. त्यांच्याच प्रयत्नाने १९४८ मध्ये ३० जिल्ह्यांनी एकत्रित मिळून हिमाचल प्रदेश बनवला. १०५२ मध्ये निवडणूक झाली तेव्हा डॉ. यशवंत परमार हे काँग्रेस मधून मुख्यमंत्री झाले. १९५६ मध्ये हिमाचलला केंद्र शासित प्रदेशाचा दर्जा दिला गेला. १९६३ मध्ये यशवंत परमार हे पुन्हा एकदा मुख्यमंत्री म्हणून निवडून आले आणि पंजाब मधील कांगडा आणि शिमलाला हिमाचल प्रदेश सामील केले. १९६३ मध्ये ते तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले आणि १९७१ मध्ये त्यांनी हिमाचलला पूर्ण राज्याचा दर्जा दिला.

तर पूर्ण राज्याचा दर्जा हिमाचलला मिळाल्यानंतर त्यंनी प्रदेशाच्या विकासाच्या दिशेने आपले काम सुरु केले. हिमाचल मधील रस्ते करण्याचे श्रेय हे त्यांनाच जाते. या व्यतिरिक्त सुद्धा अशी काही कामे केली जी हिमाचलच्या विकास आणि निर्माणासाठी फार फायदेशीर ठरली. (Dr. Yashwant Singh Parmar)
हे देखील वाचा- भारताचे अर्थमंत्री ते पाकिस्तानचे पंतप्रधान, लियाकत अली खान यांच्य हत्येचे गुढ आजही कायम
१८ वर्ष राहिलेले मुख्यमंत्री बसने घरी परतले
डॉ. यशवंत सिंह परमार हे हिमाचल प्रदेशात १८ वर्षापर्यंत मुख्यमंत्री म्हणून राहिले. त्यांनी आधुनिक हिमाचल प्रदेशाचा पाया रचला आणि रस्त्यांची निर्मिती, शिक्षण केंद्रे स्थापन केली. त्यांच्या इमानदारीचे व्यक्तिमत्व सर्वांनाच माहिती होते. जेव्हा ते एक राजकिय नेते झाले तेव्हा सुद्धा त्यांनी बसच्या माध्यमातूनच प्रवास केला. १८ वर्ष मुख्यमंत्री राहिल्यानंतर जेव्हा १९७७ मध्ये त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला तेव्हा त्यांनी गाडी सोडून पायी चालत गेले आणि शिमला येथील बस स्थानकातून थेट आपले घर त्यांनी गाठले.
खात्यात अवघे ५६३ रुपये होते
परमार यांचे आयुष्य हे अत्यंत साधेपणाचे होते. त्यांनी आपल्या आयुष्यात ८ पुस्तके लिहिली. मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी २ मे १९८१ मध्ये त्यांचे निधन झाले. येथे खासकरुन सांगायची बाब अशी की, १८ वर्ष मुख्यमंत्री पदाची कमान सांभाळली तरीही त्यांच्या निधनाच्या वेळी बँक खात्यात फक्त ५६३ रुपये शिल्लक राहिले होते.