Home » असे एक पंतप्रधान जे देशातल्या राजकारणातून अचानक गायब झाले; पुढे त्यांचे काय झाले हे अजूनही कोणाला कळलेले नाही.

असे एक पंतप्रधान जे देशातल्या राजकारणातून अचानक गायब झाले; पुढे त्यांचे काय झाले हे अजूनही कोणाला कळलेले नाही.

by Correspondent
0 comment
Harold Holt | K Facts
Share

एखादी व्यक्ती जर प्रगती करत असेल तर त्याचे पाय खेचायला कोणी ना कोणी असतेच. अशीच परिस्थिती राजकारणात सुद्धा असते. राजकारण म्हणले की विरोधक हे येतच असतात.

आणि विरोध आल्यानंतर शत्रुत्व हे आपोआप येत असते. आज आपण अशाच एका पंतप्रधानांची गोष्ट पाहणार आहोत की जे अचानक देशाच्या राजकारणातून गायब झाले होते. पुढे त्यांचं काय झाले हे अद्याप कोणालाच माहीत नाही.

मात्र या घटनेनंतर त्या देशातल्या जनतेने अनेक तर्क वितर्क लावले. तसेच अनेक प्रश्न उपस्थित केले गेले. पण त्या प्रश्नांची उत्तरे अजूनही कोणाला सापडली नाहीत. या पंतप्रधानांचे गायब होणे हे जगातले एक रहस्यमय उदाहरण मानले जाते.

चला तर मग जाणून घेऊयात अचानक गायब झालेले पंतप्रधान हे नक्की होते तरी कोण?

Harold Holt: The missing prime minister
Harold Holt: The missing Prime Minister

हे पंतप्रधान म्हणजे ऑस्ट्रेलिया या देशाचे १७वे पंतप्रधान हेरोल्ड एडवर्ड होल्ट (Harold Holt) हे होते. आई-वडिलांच्या लग्नानंतर अवघ्या सात महिन्यात ऑस्ट्रेलियातील न्यू साऊथ वेल्स येथे दि. ५ ऑगस्ट १९०८ साली हेरोल्ड एडवर्ड होल्ट यांचा जन्म झाला होता. त्यामुळे त्यांच्या जन्मावर आश्चर्य व्यक्त केले जात होते.

हेरोल्ड हे त्यांच्या कुटूंबातील मोठे भाऊ होते. तर त्यांच्या दुसऱ्या भावाचे नाव क्लिफोर्ड होते. हेरोल्ड यांना लहानपणा पासूनच पोहणे आणि मासे पकडणे यांची प्रचंड प्रमाणात आवड होती. त्यामुळे ते नेहमीच समुद्रात पोहायला किंवा मासे पकडायला जात असे.

ऑस्ट्रेलियाचे (Australia) तत्कालीन पंतप्रधान मेनजिस यांच्या सेवानिवृत्तीनंतर एकहाती विजय मिळवत, हेरोल्ड यांनी २६ जानेवारी १९६६ रोजी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान पद स्वीकारले होते. ते ऑस्ट्रेलियाचे १७वे पंतप्रधान होते.

हेरोल्ड हे १९६७ मधे व्हिक्टोरिया या बिचवर पोहायला गेलेले असताना नेमके त्याचवेळी ते अचानक गायब झाले होते. त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या जनतेने त्यांचा खूप शोध घेतला. पण अखेर तो अयशस्वी ठरला. ते समुद्रातून अचानक गायब झाल्याने त्यांचा कुठेच थांगपत्ता लागला नाही.

त्यामुळे गायब झाल्यानंतर तीन दिवसाने त्यांना मृत घोषित केले. पण अजूनही त्यांचे शव कोणाच्याच हाती लागले नाही. त्यामुळे त्यांच्या मृत्यू बद्दल आजही अनेक तर्क-वितर्क लावलेले आपल्याला ऐकायला मिळतात.

अनेकांच्या मते हेरोल्ड यांनी आत्महत्येचा पर्याय स्वीकारला असे वाटते. तर कित्येकांना हेरोल्ड यांना शार्कसारख्या बलाढ्य माशाने खाल्ले असे वाटते. तर आजून एक आश्चर्याची बाब म्हणजे अनेकांना हेरोल्ड यांना एलियन घेऊन गेले असे वाटते.

मात्र ऑस्ट्रेलियाच्या जनतेला हेरोल्ड गायब होण्यामागे कितीही आणि काहीही वाटलं, तरी देखील या सर्वांचे प्रश्न आजही अनुत्तरित आहेत.

– निवास उद्धव गायकवाड


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.