Home » Dr. Mahrang Baloch : बलूच शेरनीचे नाव नोबेल पुरस्कारासाठी !

Dr. Mahrang Baloch : बलूच शेरनीचे नाव नोबेल पुरस्कारासाठी !

by Team Gajawaja
0 comment
Dr. Mahrang Baloch
Share

गेल्या अनेक वर्षापासून पाकिस्तान सरकार विरुद्ध लढत असलेली बलुच लिबरेशन आर्मी, जाफर एक्सप्रेसच्या अपहरण नाट्यानंतर प्रकाश झोतात आली. बलूच लिबरेशन आर्मी म्हणजेच बीएलए फक्त जाफर एक्सप्रेसचे अपहरण करुन स्वस्थ बसली नाही, तर बलुचिस्तानमध्ये तैनात असलेल्या पाकिस्तानी सैन्यावर त्यांनी जबर हल्ले सुरु केले आहेत. आत्तापर्यंत दहाहून अधिक ठिकाणी हे हल्ले करण्यात आले असून यामध्ये मोठ्या संख्येनं पाकिस्तानी सैनिक ठार झाले आहेत. अचानक बलूच आर्मीचे हे उग्र रुप अनेकांना आश्चर्यचकीत करत असले तरी गेली अनेक वर्ष पाकिस्तानच्या जाचाला कंटाळूच बलुच आर्मीचा लढा तीव्र झाला आहे. बलुचिस्तानवर पाकिस्तान सैन्यानं केलेल्या अत्याचाराचा हा बदला घेण्यात येत आहे. (Dr. Mahrang Baloch)

या लढ्यात फक्त बलूच पुरुष उतरले आहेत, असे नाही, तर बलुची महिलाही आता पाकिस्तान सैन्यानं केलेल्या अत्याचाराचा बदला घेण्यासाठी पुढे सरसावल्या आहेत. चौकशीच्या नावावर अनेक वर्ष बलुची महिलांना पाकिस्तानी सैन्य ताब्यात घेत असून त्यांच्यावर बलात्कार होत आहेत. यात लहान मुलींचा समावेश मोठ्या प्रमाणात आहेत. या अत्याचारा विरोधात पहिल्यांदा ज्या बलुची महिलेनं आवाज उठवला, तिला बलूच शेरनी म्हणून ओळखण्यात येत आहे. तिचे नाव आहे, डॉ. महरंग बलोच. महरंग यांनी पाकिस्तान विरोधात लढा उभारला असून बलुचिस्तानमधील बेपत्ता तरुणांना शोधण्यासाठी त्यांनी मोठी मोहीम उभारली आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन 2025 च्या नोबेल शांतता पुरस्कारासाठी त्यांना नामांकन मिळाले आहे. (International News)

बलूच आर्मीनं पाकिस्तानच्या सैन्याला हैराण केलं आहे. एकापाठोपाठ एक होत असलेल्या हल्ल्यानं पाकिस्तानी सैन्य बेजार झाले असतांनाच आता बलूच शेरनी म्हणून ओळख असलेल्या डॉ. महरंग बलोच यांचे नावही पुढे आले आहे. 2025 च्या नोबेल शांतता पुरस्कारासाठी महरंग यांच्या नावाचे नामांकन करण्यात आले आहे. यामुळे बलूच नागरिकांचा लढा जगापुढे येणार आहे. शिवाय पाकिस्तान सरकार बलुचिस्तानचे जे शोषण करत आहे, तिथल्या नागरिकांवर जो अत्याचार करण्यात आला आहे, तो लढाही आता जगापुढे येणार आहे. डॉ. महरंग यांनी नोबेल शांतता पुरस्कारासाठी देण्यात आलेले हे नामांकन बलुचिस्तानमधील बेपत्ता लोकांना समर्पित केले आहे. बलुचिस्तानमधील हजारो तरुण बेपत्ता असून त्यातील अनेकांना पाकिस्तानी जेलमध्ये बंद करण्यात आले आहे. तर अनेकांना मारुन टाकण्यात आले आहे. बुलचिस्तानमध्ये रस्त्याच्या बाजुला मरुन पडलेल्या तरुणांचे मृतदेह ही नित्याचीच गोष्ट आहे. (Dr. Mahrang Baloch)

पाकिस्तानी सैन्य या तरुणांना मारुन बेवारसपणे गटारामध्ये टाकून देते, अशा तरुणांच्या कुटुंबाची अवस्था ही अतिशय दयनीय असते. यामध्ये अनेक बलूच घरे उद्धवस्त झाली आहेत. या कुटुंबासाठी डॉ. महरंग बलोच यांनी उभारलेला लढा हा आधार देणार आहे. डॉ. मेहरंग बलोच यांना बलुचिस्तानमधील अहिंसक चळवळींचा चेहरा मानले जाते. बलूच नागरिकांच्या बेपत्ता होण्याबाबत महरंग आवाज उठवत आहेत. त्यांच्या या नेतृत्वाखाली हजारो बलुची महिला आपल्या कुटुंबातील बेपत्ता झालेल्यांसाठी पाकिस्तानला प्रश्न विचार आहेत. बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानी सरकार आणि सैन्याच्या अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत. त्यात बलुची महिला आणि तरुणांचा बळी जात आहे. याविरोधात एकीकडे बलुच आर्मी शस्त्रांसह लढा देत आहे. तर डॉ. महरंग या शांततापूर्ण आंदोलन करून पाकिस्तान सरकार विरुद्ध उभ्या राहिल्या आहेत. (International News)

32 वर्षीय महरंग बलोच यांच्या कुटुंबावरही पाकिस्तानी सैन्यानं अत्याचार केले आहेत. त्याविरोधात 2006 पासून महरंग यांनी आंदोलन उभे केले आहे. महरंग यांचे वडील, एक राजकीय कार्यकर्ते होते. बलूच नागरिकांसाठी त्यांनी मोठे कार्य केले आहे. मात्र त्यांचे 2009 मध्ये अपहरण करण्यात आले. तब्बल दोन वर्षांनी त्यांचा मृतदेह सापडला. या मृतदेहावरील जखमा पाहिल्यावर त्यांना अतिशय वाईट पद्धतीनं मारहाण झाल्याचे स्पष्ट झाले. यानंतर 2017 मध्ये महरंग यांच्या भावाचे अपहरण करण्यात आले. त्यांचा भाऊ एक वर्षांनी परतला. मात्र त्यांच्यावर पाकिस्तानी सैन्यानं जे अत्याचार केले, त्यामुळे महरंग हादरुन गेल्या. फक्त महरंग यांच्या कुटुंबाबाबतीत अशा घटना झाल्या, असे नाही तर आसपासच्या सर्वच बलूच कुटुंबात अशीच परिस्थिती होती. (Dr. Mahrang Baloch)

=============

हे देखील वाचा : Passport : भारतात चार रंगात मिळतो पासपोर्ट, जाणून प्रत्येक रंगाच्या पासपोर्टचे वैशिष्ट्य

Devendra Fadanvis : भोंग्यांचं राजकारण पुन्हा महाराष्ट्रात होणार ?

=============

पाकिस्तानी सैन्य आणि गुप्तचर संघटना कधीही, कुठल्याही बलूच नागरिकांना पकडून नेत असत आणि त्यांना तुंरंगात डांबून ठेवण्यात येई. याला विरोध कऱणा-यांना जबर मारहाण करण्यात येई. यात मृत पावलेल्यांचे मृतदेह बलुचिस्तानच्या रस्तावर टाकून देण्यात येत असत. अर्थात आत्ताही थोडीफार अशीच परिस्थिती आहे. मात्र महरंग यांनी या सर्वांविरोधात 2019 मध्ये संघटित पद्धतीने लढण्यासाठी एका संघटनेची स्थापना केली. याच संघटनेनं 2024 मध्ये पाकिस्तान सरकारविरुद्ध मोठं आंदोलन करत थेट लाहोरपर्यंत धडक मारली होती. महरंग आपल्या वडिलांना आदर्शस्थानी मानतात. वडिलांचा विद्रूप मृतदेह बघितल्यावर त्यांना मोठा मानसिक धक्का बसला होता. या धक्यातून सावरत त्यांनी बलुचिस्तानमधील अन्य कुटुंबांना आधार द्यायला सुरुवात केली. आता अवघं बलुचिस्तान माझे कुटुंब असल्याचे त्या सांगतात. आपल्याला नोबेल पुरस्काराचे मिळालेले नामांकनही त्यांनी याच बलुचिस्तानमधील कुटंबाना समर्पित केलं आहे. (International News)

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.