Dictionary मध्ये बिग बॉसला पर्यायवाची शब्द शोधाल तर Controversy हा शब्द तुम्हाला मिळेल, म्हणजे बघा ना, मराठी बिगबॉस सीजन पाच नुकताच संपला, तो चालू असताना सुद्धा Controversy चालू होत्या. हा सीजन लवकर संपला म्हणून सुद्धा Controversy सुरू झाली आणि सुरज चव्हाण जिंकल्यामुळे सुद्धा Controversy झाली. आता सुरू झालेल्या हिंदी बिगबॉसमुळे सुद्धा Controversy सुरू झालीये आणि ती आणखी वाढण्याची शक्यता आहे. बिगबॉसच्या या १८ व्या सीजनमध्ये चक्क एक गाढव बिग बॉसच्या घरात Contestant म्हणून गेला आहे. आता हा गाढव कोण आहे. त्यामुळे काय Controversy सुरू आहे? जाणून घेऊया. (Bigg Boss)
हिंदी बिग बॉसच्या १८ व्या सीजनची सुरुवात झाली आणि बिग बॉस पाहणाऱ्या प्रेक्षकांचा ते काय पाहताय याच्यावर विश्वास बसत नव्हता. कारण, हिंदी बिग बॉसच्या १८ व्या सीजनमध्ये बिग बॉसच्या घरात जाणारा १९ वा सदस्य हा गधराज उर्फ मॅक्स नावाचा एक गाढव होता. हा गाढव आहे बिग बॉसच्या घरात सदस्य म्हणून आलेले गुणरत्न सदावर्ते यांचा. गुणरत्न सदावर्ते हे काय महाराष्ट्रासाठी नवं नाव नाही. मराठा आरक्षणाविरोधातली याचिका असो किंवा एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचं नेतृत्व असो या सगळ्यामुळे सदावर्ते हे नाव माध्यमांमध्येही बरंच गाजलं. तर हा गाढव गुणरत्न सदावर्ते यांचा पाळीव प्राणी आहे. (Entertainment News)
आधीच वादग्रस्त असणारा हा शो या गाढवामुळे आणखी वादग्रस्त झाला आहे. हा गाढव शो मध्ये आणण्यामागे काही मार्केटिंग Strategy आहे का? शो ला आणखी TRP ला मिळावा म्हणून हा गाढव आणला आहे का? असं सोशल मीडियावर बोललं जात आहे. त्यात आता People For The Ethical Treatment Of Animal म्हणजे PETA या जागतिक संस्थेने बिग बॉसचे होस्ट सलमान खानला एक पत्र पाठवलं आहे. ज्यामध्ये बिग बॉस १८च्या घरात असणाऱ्या गाढवाबद्दल चिंता व्यक्त केली आहे. Peta ही संस्था प्राण्यांवर होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात आणि त्यांच्या हक्कासाठी जागतिक स्तरावर काम करते. पेटा इंडियाचे सहयोगी शौर्य अग्रवाल यांनी सलमान खानला पत्रात लहिलय की, बिग बॉसच्या सेटवरुन त्या गाढवाला काढण्यासाठी सलमान खानने निर्मात्यांशी बोलावं. (Bigg Boss)
“रीयालिटि शो मध्ये गाढव वापरल्यामुळे प्रेक्षकांमध्ये अस्वस्थता आहे निर्माण झाली आहे. आम्हाला प्रेक्षकांकडून अनेक तक्रारी येतं आहेत. ज्यामध्ये गाढवाला बिग बॉस हाऊसमध्ये ठेवण्याबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. बिग बॉस एक हलका-फुलका मनोरंजन शो आहे, पण शो सेटवर प्राण्यांचा वापर करणं हा गंभीर मुद्दा आहे. प्राण्यांच्या दृष्टीकोनातून, गाढव स्वाभाविकपणे नर्वस असतात. शो सेटवरील लाइट्स, बिग बॉसच्या घरात होणारा आवाज आणि गोंधळ हे त्या प्राण्यासाठी भयंकर ठरेल. प्राण्यासाठी शो सेट योग्य नाही हे प्रेक्षकांना स्पष्ट आहे, ज्यांना गाढवाला लहान, संकुचित जागेत ठेवलेले पाहून दु:ख होत आहे.” असं या पत्रात सांगितलं गेलं आहे. त्याशिवाय त्या गाढवाला पेटा इंडियाकडे पुनर्वसनासाठी पाठवण्यात यावं. अशी सुद्धा मागणी करण्यात आली आहे. प्राणी हे अॅक्टर नसतात. पेटा ही संस्था त्यांच्या कामातून नेहमीच चित्रपटात, सर्कशीत आणि इतरत्र प्राण्यांवर होणाऱ्या अत्याचाराचा विरोध करतात. पण बिग बॉसमध्ये या प्राण्यावर खरच अत्याचार होतोय का? (Entertainment News)
======
हे देखील वाचा : अभिजित सावंतच विनर असावा यासाठी चाहतीचे केदार शिंदेंना पत्र
======
प्राण्यांना चित्रपटात किंवा रीयालिटि शो मध्ये वापर करण्याबाबत काही नियम आहेत. चित्रपटात किंवा रीयालिटि शोमध्ये प्राणी वापरण्यासाठी कोणालाही Animal Welfare Board Of India मध्ये Registration करावं लागतं. शूट सुरू करण्याआधी प्राणी वापरण्यासाठी Animal Welfare Board Of India कडून परवानगी मिळवावी लागते. तीन महिन्यांंपेक्षा जास्त कोणताही प्राणी शूटसाठी वापरण्यास बंदी आहे. आता बिग बॉस मेकर्सने या सर्व नियमांचं पालन केलं आहे की नाही हे अजून समोर आलेलं नाही. त्यामुळे बिग बॉस मेकर्स या पत्रावर काही अॅक्शन घेऊन गधराज उर्फ मॅक्सला बिग बॉसच्या घरा बाहेर काढणार की नाही हे पाहणं महत्त्वाच ठरेल. (Bigg Boss)