Home » Donald Trump : ट्रम्प करणार अणुबॉम्बची चाचणी !

Donald Trump : ट्रम्प करणार अणुबॉम्बची चाचणी !

by Team Gajawaja
0 comment
Donald Trump
Share

शांततेचा नोबेल पुरस्कार मिळण्यासाठी जगभरातील युद्ध थांबण्याचा दावा करणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आता अणुबॉम्बची चाचणी करणार आहेत. जवळपास ३३ वर्षानंतर अमेरिका पुन्हा जिवंत अणुबॉम्बची चाचणी करणार आहे. १९९२ पासून, अमेरिकेने आपल्या शस्त्रागाराची सुरक्षितता आणि विश्वासार्हता राखण्यासाठी संगणक सिम्युलेशन आणि सबक्रिटिकल चाचण्यांवर अवलंबून रहाण्याचे धोरण अवलंबिले होते. त्या काळात अमेरिकेतील सरकाराच्या धोरणानुसार अणुस्फोटांवर स्वेच्छेने स्थगिती ठेवली होती. मात्र ट्रम्प यांनी आता ही स्थगिती उठवून लवकरात लवकर अणुबॉम्ब चाचणी घेण्याची आदेश दिल्यामुळे जगभर खळबळ उडाली आहे. ट्रम्प यांच्या मनात नेमके काय आहे, हा प्रश्न विचारला जात आहे. अमेरिकेनं अणुबॉम्बची शेवटची चाचणी ३३ वर्षांपूर्वी घेतली होती. तेव्हा २,३०० फूट जमिनीखाली चाचणी झाली, तरी यामुळे खडक वितळले होते. (Donald Trump)

आता ट्रम्प यांच्या आदेशामुळे अमेरिकेचे संरक्षण मंत्रालय, म्हणजे पेंटागॉननं तयारी सुरु केली आहे. ट्रम्प यांच्य आदेशानुसार चाचणी चीन आणि रशियाच्या पातळी इतकीच घेण्यात येणार आहे. अमेरिकन काँग्रेस रिसर्च सर्व्हिसच्या अहवालानुसार, अमेरिकेला अणुशस्त्र चाचणी करण्यासाठी अंदाजे २४ ते ३६ महिने लागणार आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा एक नवा आदेश आल्यामुळे जगभर खळबळ उडाली आहे. ट्रम्प पुन्हा एकदा अमेरिकेसह जगाला अणुयुद्धात ओढत असल्याची चर्चा आहे. कारण डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिका तात्काळ अणुशस्त्रांची चाचणी करणार असल्याचे आदेश काढले आहेत. यामुळे ट्रम्प यांनी १९९२ मध्ये केलेली अणुशस्त्र चाचणीवरील स्थगिती उठवली आहे. मात्र ही घोषणा केली ती वेळही खास होती. ट्रम्प यांनी ही घोषणा केली, तेव्हा दक्षिण कोरियातील बुसान येथे चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याबरोबर त्यांची बैठक होणार होती. (International News)

त्यामुळे चीनसोबत चर्चा करतांना शी जिनपिंग यांच्यावर दबाब आणण्याची त्यांच्या नितीचा हा भाग होता का, याचीही चर्चा होत आहे.
याबाबत दिलेल्या आदेशात ट्रम्प यांनी म्हटले आहे की, अमेरिकेकडे इतर कोणत्याही देशापेक्षा जास्त अण्वस्त्रे आहेत. तर अण्वस्त्रांच्या बाबतीत रशिया दुसऱ्या स्थानावर आहे आणि चीन तिसऱ्या स्थानावर आहे. रशिया आणि चीन चाचणी करत असतांना आता अमेरिकेनंही अण्वस्त्रांची चाचणी करणे गरजेचे असल्याचे ट्रम्प यांनी सांगितले. डोनाल्ड ट्रम्प यांच्या घोषणेमुळे ३३ वर्षानंतर अमेरिका पहिल्यांदाच जिवंत अणुबॉम्बची चाचणी करणार आहे. १९९२ पासून, अमेरिकेने आपल्या शस्त्रागाराची सुरक्षितता आणि विश्वासार्हता राखण्यासाठी संगणक सिम्युलेशन आणि सबक्रिटिकल चाचण्यांवर आधारीत ठेवली आहे. मात्र चीन आणि रशिया त्यांची अणुशस्त्रे वेगाने वाढवत असतांना अमेरिकेलाही अधिक अण्वस्त्र वाढवण्याची गरज ट्रम्प यांना वाटत आहे. (Donald Trump)

त्यातच ट्रम्प हे पुन्हा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाल्यापासून रशिया आणि चीन सोबत अमेरिकेच्या संबंधात दुरावा आला आहे. यात रशियाने बुरेव्हेस्टनिक अणु क्रूझ क्षेपणास्त्राची यशस्वी केल्यानंतर अमेरिकेच्या गुप्तचर संस्थांनी ट्रम्प यांना या अमेरिकेला धोका असल्याचे सूचित केले होते. शिवाय चीनमध्येही वेगानं अण्वस्त्र चाचणी होत असून चीन काही वर्षातच अमेरिकेमधील अण्वस्त्रांची बरोबरी करणार आहे. असे झाल्यास अमेरिकेचे जगावरील वर्चस्व धोक्यात येणार आहे, यामुळे ट्रम्प यांनी हा निर्णय घेतल्याची माहिती आहे. पूर्ण अणुशस्त्र चाचणीमध्ये अण्वस्त्राची विध्वंसक शक्ती, किरणोत्सर्गाचे परिणाम आणि तांत्रिक कार्यक्षमता मोजण्यासाठी जिवंत अणुबॉम्बचा स्फोट केला जातो. अशा चाचण्या सहसा भूमिगत किंवा हवेत केल्या जातात. किरणोत्सर्गाच्या जोखमीमुळे हा एक महत्त्वाचा पर्यावरणीय आणि राजकीय मुद्दा ठरतो. अमेरिकेने शेवटची अण्वस्त्र चाचणी २३ सप्टेंबर १९९२ रोजी केली. ही अमेरिकेची १,०५४ वी चाचणी होती. ही चाचणी रेनियर मेसा पर्वताच्या २,३०० फूट खाली असलेल्या नेवाडा चाचणी स्थळावर करण्यात आली. (International News)

=======

हे देखील वाचा : Brazil : ब्राझीलच्या ड्रग्ज तस्करीचे भयाण वास्तव !

=======

या चाचणीला डिव्हायडर असे सांकेतिक नाव देण्यात आले होते. ही भूगर्भातील चाचणी इतकी शक्तिशाली होता की, त्यामुळे जमिनीखालील खडक वितळले. जमिनीचा पृष्ठभाग सुमारे १ फूट वर आला आणि नंतर बुडाला. ३३ वर्षानंतरही तिथे अजूनही १५० मीटर रुंद आणि १० मीटर खोल खड्डा दिसतो. या चाचणीनंतर तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जॉर्ज एच.डब्ल्यू. बुश यांनी भूमिगत अणुचाचण्यांवर बंदी घालण्याची घोषणा केली. आता ट्रम्प यांनी हे धोरण बदलल्यावर अमेरिका कधी आणि कुठे अणुचाचण्या करणार, हे स्पष्ट नाही. मात्र पेंटागॉनतर्फे यासाठी २४ महिन्यांचा कालावधी लागणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. (Donald Trump)

सई बने

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.