Home » डोनाल्ड ट्रंप यांच्या डोक्यावर अटकेची तलवार

डोनाल्ड ट्रंप यांच्या डोक्यावर अटकेची तलवार

by Team Gajawaja
0 comment
Donald Trump
Share

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंम्प (Donald Trump) यांनी सोशल मीडियात नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे.त्यात त्यांनी मला अटक केली जाणार असल्याचे म्हटले आहे. कारण न्यूयॉर्क मधील फिर्यादी काही महिलांना पेमेंट केलेल्या पैशांसंदर्भात तपास केला जात आहे. आरोप असा आहे की, माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंम्प यांनी या महिलांना लैंगिक संबंधांच्या बदल्यास पैसे देण्याचे प्रकरण हे पब्लिकली न करण्यास सांगितले होते.

ट्रंप यांनी आपल्या सोशल नेटवर्क ट्रुथवर एक पोस्ट मध्ये असे म्हटले की, मॅनहट्टन जिल्हा अटॉर्नी कार्यालयातून अवैध रुपात लीक माहितीवरुन असे संकेत मिळत आहेत की, अग्रणी रिपब्लिकन उमेदवार आणि अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांना पुढील दोन दिवसात अटक केली जाणार आहे.

ट्रंप यांनी सोशल मीडियात याबद्दलचे काही अधिक स्पष्टीकरण दिलेले नाही. त्यांना संभाव्य अटकेबद्दल कसे कळले हे सुद्धा सांगितलेले नाही. आपल्या पोस्टमध्ये त्यांनी २०२० च्या राष्ट्राध्यक्ष निवडणूकीत डेमोक्रेटिक पार्टीच्या जो बिडेन यांनी पराभव केल्यानंतर जनादेशाची चोरी असे म्हटले. तसेच आपल्या समर्थकांना विरोधी आंदोलन करण्यास सांगितले. ट्रंप हे जेव्हा राष्ट्राध्यक्ष होते तेव्हा भडकाऊ मेसेज देण्याच्या कारणास्तव कॅपिटलमध्ये ६ जानेवारी २००१ रोजी त्यांच्या समर्थकांनी हिंसाचार केला होता.

न्यूयॉर्कमधील ईडी अधिकाऱ्यांनी ही संभावना लक्षात घेता काही सुरक्षा व्यवस्था केली आहे. जेणेकरुन ट्रंप यांच्यावर आरोप लावले जातील. प्रकरणात माजी राष्ट्राध्यक्षांवर आरोप लावण्यासाठी संभाव्य मतांसह न्यायाधीशांच्या निर्णयासाठी कोणत्याही वेळेच्या मर्यादेची सार्वजनिक घोषणा करण्यात आलेली नाही.

ट्रंप (Donald Trump) यांनी आपल्या सोशल मीडिया नेटवर्कवर गेल्या वर्षात अशी सुचना दिली होती की, संघीय तपास एजेंसी एफबीआय गुपत कागदपत्रांसंदर्भात त्यांच्या निवासस्थानी तपास करत आहे. मॅनहट्टन मध्ये ग्रँन्ड ज्युरी ट्रंपचे माजी वकील माइकल कोहेन यांच्यासह साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले होते. कोहेन यांनी असे म्हटले होते की, ट्रंप यांनी एका दशकापूर्वी दोन महिलांसोबतच्या लैंगिक संबंधांच्या बदल्यात त्यांना पैसे दिले होते. ट्रंप यांनी महिलांशी असलेल्या संबंधांना फेटाळून लावत असे म्हटले होते की, डेमोक्रेटिक पार्टी संबंधित आरोप २०२४ मध्ये राष्ट्रपती निवडणूकीच्या स्पर्धेतून त्यांना बाहेर टाकण्यासाठी लावले जात आहेत.

हे देखील वाचा- पुतिन यांच्या विरोधात इंटरनॅशनल कोर्टाकडून अटक वॉरंट जारी

मॅनहट्टन जिल्हा अटॉर्नी अल्विन ब्रॅग यांचे कार्यालय अशा आरोपींचा तपास करत आहेत की पेमेंटच्या प्रकरणी एखाद्या कायद्याचे उल्लंघन झाले आहे किंवा ट्रंप यांच्या कंपनीने आरोपांसंदर्भात महिलांचा आवाज दाबण्यासाठी कोहेन यांना पैसे दिले होते. कोहेन यांनी असे म्हटले आहे की, ट्रंप यांच्या निर्देशनावर त्यांनी पॉर्न एक्ट्रेस स्टॉर्मी डेनियल्स आणि प्लेबॉय मॉडेल करेन मॅकडॉगलला एकूण २८०,००० डॉलरच्या पेमेंटची व्यवस्था केली होती.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.