आपल्या समाजात प्राचीन काळापासून अशा काही मान्यता चालत आल्या आहेत त्यावर आपण विश्वास ठेवतो. त्याचसोबत त्यामागील आपल्याला कथा सुद्धा सांगितली जाते. त्यापैकीच एक असलेली म्हणजे कुत्र्यांचे रडणे हे वाईट असते. म्हणजेच काहीतरी अपशकुन घडणार असे म्हटले जाते. असे ही म्हटले जाते की, कुत्र्याचे रडणे म्हणजे येणाऱ्या काळात एखाद्याच्या मृत्यू पूर्वीचे संकेत देतात. असे बोलल्यानंतर कोणीही घाबरेलच. (Dogs cry at night)
पण घरातील पाळीव कुत्रे असो किंवा रस्त्यावरील कुत्रे यांना सुद्धा एखाद्या व्यक्तीसारख्याच भावना असतात. त्यांना जसा आनंद होतो तसेच त्यांना दु:ख ही होत असते. ते बोलत नसले तरीही ते आपल्या हालचालींवरुन आपल्या काही भावना व्यक्तीला सांगू इच्छितात. त्यामुळे जर त्यांना कोणीही समजून घेणारे नसतील तर ते आपले दु:ख त्यांच्या पद्धतीने व्यक्त करत असतील. त्यांच्या ही डोळ्यात पाणी येते. पण रात्रीच्या वेळी खरंच कुत्रे रडतात का आणि त्यामागील काय कारणं असू शकतात याच बद्दल आपण अधिक जाणून घेऊयात.
ज्योतिष याबद्दल काय म्हणतात?
खरंतर ज्योतिष असे मानतात की, कुत्रे सर्वाधिक तेव्हाच रडतात जेव्हा त्यांच्या आजूबाजूला एखादी आत्मा असते. ज्याला आपण सर्वसामान्य लोक पाहू शकत नाहीत. यामुळेच त्यांना पाहून कुत्रे रडतात. म्हणूनच कुत्र्यांना रडताना पाहून लोक पळतात.
विज्ञान आणि तज्ञ काय म्हणतात?
मान्यता आणि ज्योतिष यापुढे जात विज्ञानाच्या दृष्टीकोनातून पाहिले तर कुत्रे रडत नाहीत. हे भुंकत असतात. खरंतर रात्रीच्या वेळी असा आवाज काढून ते एखाद्या दुसऱ्या ठिकाणी असलेल्या आपल्या साथीदारापर्यंत पोहचू पाहत असतात. एका मेसेज प्रमाणे ते असे करतात.
या व्यतिरिक्त कुत्रे सुद्धा एक जीवच आहेत. त्यांना सुद्धा दुखापत होते, दुखते. शारिरीक व्याधी होतात. अशा स्थितीत कुत्रे भुंकतात. त्यामुळेच ते आपल्या साथीदारांना मदतीसाठी भुंकत आपल्याकडे बोलवत असतात.(Dogs cry at night)
एकटेपण दूर करण्यासाठी असे करतात
माणसांप्रमाणेच कुत्र्यांना सुद्धा एकटेपण राहणे आवडत नाही. यामुळेच जेव्हा कधी त्यांना एकटे वाटते तेव्हा ते आपल्या साथीदारांना भुंकत बोलावतात.
हे देखील वाचा- मृत आजीशी तरुणाने चक्क AI च्या मदतीने साधला संवाद
वय वाढल्याने घाबरतात
वय वाढते तसे कुत्रे सुद्धा घाबरु लागतात. याच भीतीमुळे त्यांना रात्री एकटेपण वाटत राहते. यामुळेच ते रडतात. असे असू शकते की, कुत्र्याचा एखादा साथीदार त्याला सोडून सुद्धा गेला असेल. याचेच दु:ख ते रात्रीच्या वेळी रडून बाहेर काढतात.