देवाचे अस्तिव आहे का ? या प्रश्नावरुन आत्तापर्यंत अनेक वाद-विवाद झाले आहेत. आस्तिक लोक देव आहे, यावरु अडून रहातात, तर नास्तिक देव नाहीच यावर ठाम रहातात. या सर्व वादावर आता हार्वर्ड या विद्यापीठातील एका शास्त्रज्ञानं मोठं विधान केले आहे. जगातील सर्वोच्च समजल्या जाणा-या या हार्वर्ड विद्यापीठातील शास्त्रज्ञानं देवाचे अस्तित्व शोधण्यासाठी मोठ्या फार्म्युल्यांचा अभ्यास केला. यातून जे परिणाम आले, त्यावर सगळेच नतमस्तक झाले आहेत. कारण या शास्त्रज्ञांनी मांडलेल्या गणिताच्या सूत्रानुसार जगात देवाचे अस्तित्व आहे. जगातील सर्वात प्रतिष्ठित विद्यापीठांपैकी एक मानल्या जाणा-या हार्वर्ड विद्यापीठातील शास्त्रज्ञ डॉ. विली सून यांनी देवाचे अस्तित्व शोधण्यासाठी गणिताच्या सूत्रांचा वापर केला. त्यातून त्यांना देवाचे अस्तित्व मिळाले आहे. डॉ. विली सून यांनी गणितीय सूत्र हा विश्वात देवाच्या अस्तित्वाचा अंतिम पुरावा असू शकतो, असा दावा केला आहे. (Dr. Willie Soon)
देवाचे अस्तित्व आहे का, हा वादाचा विषय ठरला आहे. दगडातही देव शोधणा-यांना अनेक नास्तिकांच्या टिकेचे धनी व्हावे लागते. जगात देव नाही, त्यामुळे त्याच्या नावानं चालू असलेली धार्मिकता ही फक्त बाजारपेठ असल्याची टोकाची टिकाही आस्तिकांवर केली जाते. अनेक नास्तिक मंडळी जगात देवाचे अस्तित्वच नाही, यासाठी अनेक प्रयोगही करुन दाखवतात. मात्र आता या वादावर हार्वर्ड या प्रतिष्ठित विद्यापीठातील एका शास्त्रज्ञांनी केलेला प्रयोग मार्गदर्शक ठरणार आहे. लंडनमधील या सर्वात जुन्या विद्यापीठातील खगोलभौतिकशास्त्रज्ञ आणि अवकाश अभियंता डॉ. विली सून यांनी चक्क जगात देवाचे अस्तित्व आहे किंवा नाही, याबाबत अभ्यास केला. त्यासाठी त्यांनी गणितीय सूत्रांचा आधार घेतला. डॉ. विली सून यांची नुकतीच एक मुलाखत झाली. त्या मुलाखतीमध्ये त्यांनी देवाचे अस्तित्व जगात आहे, हे त्यांचे विधान सत्य करण्यासाठी गणितीय सूत्रे जाहीर केली. (Latest Updates)
डॉ. विली सून यांनी या मुलाखतीमध्ये सांगितले की, विश्वाचे रहस्य केवळ ताऱ्यांमध्येच नाही तर गणिताच्या काही मूलभूत तत्वांमध्ये देखील लिहिता येईल. या सिद्धांताचा केंद्रबिंदू ‘सुधार युक्तिवाद’ आहे, यानुसार विश्वाचे भौतिक नियम जीवनाला आधार देण्यासाठी अचूक संतुलित आहेत, हे सुचित होते, अर्थात हा योगायोग असू शकत नाही, असेही डॉ. विली सांगतात. या सर्वांना संतुलित करणारी एक शक्ती आहे, ती म्हणजेच देव असल्याचे डॉ. विली यांनी सांगितले. हे सूत्र डॉ. विली यांनी पहिल्यांदा मांडलेले नाही. प्रथम हे सूत्र केंब्रिज या प्रख्यात विद्यापीठातील गणितज्ञ पॉल डायरॅक यांनी सादर केले होते. विश्वाच्या भौतिक नियमांचे परिपूर्ण संतुलन अकलनीय महान शक्तीच्या गणितीय सिद्धांताच्या संदर्भात परिभाषित केले जाऊ शकते, असा डायरॅकचा अंदाज होता. हा सिद्धांत पॉल यांनी 1963 मध्ये प्रकाशित झालेल्या आपल्या पुस्तकात मांडला आहे. पॉल डायरॅक यांनी त्यांच्या पुस्तकात देवाला सर्वश्रेष्ठ गणितज्ञाची उपमा दिली आहे. (Dr. Willie Soon)
देव हा एक अतिशय उच्च दर्जाचा गणितज्ञ आहे. त्याने विश्वाची निर्मिती करण्यासाठी अतिशय प्रगत गणिताचा वापर केला असल्याचेही पॉल यांनी आपल्या पुस्तकात लिहिले आहे. त्याचाच आधार घेत डॉ. विली सून यांनी देवाच्या अस्तित्वाचे गणितीय पद्धतीनं सूत्र मांडले आहे. त्यांनी यासंदर्भात दिलेल्या मुलाखतीमध्ये आपल्या जीवनाला प्रकाशमान करणा-या शक्तीमागे अनेक उदाहरणे आहेत. गणित आणि विश्वातील सुसंवाद हे जाणीवपूर्वक केलेल्या रचनेकडे आपले लक्ष वेधतात. आपण आपले सर्वोत्तम कार्य करू शकू म्हणूनच देवाने या प्रकाशाची योजना केल्याचे डॉ. विली यांनी सांगितले आहे. (Latest Updates)
===============
हे देखील वाचा : Kim Yo Jong : आमच्या शत्रूला मदत केलीत तर याद राखा….
Masan Holi : वाराणसीच्या मसान होळीसाठी मोठी गर्दी !
===============
डॉ. विली या सर्व सिद्धांताचा सुधारित युक्तिवाद असाही उल्लेख करतात. तसेच मानव ज्या विश्वात वावरतात, त्या विश्वाचे नियंत्रण कोणीतरी करीत आहे. विश्वाचे नियंत्रण करणा-या या शक्तीची समीकरणे एखाद्या दैवी निर्मात्याच्या बोटाच्या ठशावर असू शकतात, असेही त्यांनी नमूद केले आहे. डॉ. विली यांनी दिलेली ही मुलाखत सध्या सर्वाधिक चर्चेत आली आहे. जगप्रसिद्ध भौतिकशास्त्रज्ञ स्टिफन हॉकिन्स यांनीही जगाचे नियंत्रण करणारी एक शक्ती अस्तित्वात असल्याचे सांगितले होते. आता डॉ. विली सारख्या प्रख्यात शास्त्रज्ञांनी त्याची पुष्ठी दिली आहे. (Dr. Willie Soon)
सई बने