हिवाळा सुरु झाला की, लगेच सर्दी खोकल्यासारखे आजवर डोके वर काढतात. थंडीच्या दिवसांमध्ये सतत सर्दी, खोकला होणे खूपच सामान्य आहे. अनेकदा आपण पाहिले तर अनेक घरांमध्ये सांगितले जाते की, सर्दी खोकला झाल्यावर डॉक्टरकडे जाण्यापेक्षा थोडी दारू प्यायली तर हा आजार एकदम गायबच होऊन जातो. ऐकायला जरा विचित्र वाटत असले तरी अनेक घरांमध्ये सर्रास हे ऐकण्यात येते. काही ठिकाणी हिवाळ्यात लोक रम पितात. रमबद्दल असेही म्हटले जाते की ते प्यायल्याने सर्दी आणि खोकल्यापासून आराम मिळतो. मात्र खरंच दारू प्यायल्याने सर्दी खोकला बरा होतो का? असा प्रश्न अनेकदा विचारला जातो. चला तर जाणून घेऊया यामागची सत्यता. (Alcohol)
रमबद्दल असंही म्हटले जाते की हिवाळ्यात गरम पाण्या्याबरोबर प्यायल्यास थंडी जाणवत नाही. तसेच ते गरम पाण्यात मिसळून प्यायल्याने सर्दी-खोकल्यापासून आराम मिळतो. रममध्ये अल्कोहोलची टक्केवारी जास्त आहे. त्यात सुमारे ४० टक्के अल्कोहोल मिसळले जाते आणि ते तयार करण्यासाठी उसाचा रस आंबवला जातो (दारू बनवण्याची रासायनिक पद्धत). मात्र यासर्व ऐकिवात असलेल्या गोष्टी आहेत. आजवर असे कोणतेही संशोधन किंवा अभ्यास झालेला दिसला नाही, ज्यामुळे हिवाळ्यात गरम पाण्यासोबत रम प्यायल्याने सर्दी आणि खोकला बरा होतो. एक गोष्ट मात्र खरी आहे आणि ती म्हणजे दारू आरोग्यासाठी हानिकारक आहे. (Marathi)
हिवाळ्याच्या दिवसांत किंवा सर्दी-खोकला झाल्यावर अनेक लोक ‘ओल्ड मंक’ रम गरम पाण्यात मिसळून पिण्याचा सल्ला देतात. अनेक घरांमध्ये हा एक पारंपारिक घरगुती उपाय मानला जातो. मात्र जागतिक आरोग्य संघटना (WHO) यांनी दिलेल्या माहितीनुसार दारूच्या एका थेंबाचाही आरोग्यावर गंभीर परिणाम होतो. डब्ल्यूएचओ सांगते की, अल्कोहोल हे विषारी द्रव्य आहे, त्याच्या सेवनाची कोणतीही पातळी सुरक्षित म्हणता येणार नाही. तुम्ही जितकी जास्त दारू प्याल तितकी ती तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक असू शकते. मात्र याचा अर्थ असा नाही की, कमी प्रमाणात दारू पिणे सुरक्षित असते. अगदी कमी प्रमाणात अल्कोहोल देखील सुरक्षित नाही. (Todays Marathi Headline)

दारूचा एक थेंबही कॅन्सरला आमंत्रण देण्यास कारणीभूत असल्याचे डब्ल्यूएचओने सांगितले आहे. दारूच्या सेवनाने ७ प्रकारचे कॅन्सर होऊ शकतात. यामध्ये घशाचा कर्करोग, यकृताचा कर्करोग, आतड्याचा कर्करोग, तोंडाचा कर्करोग, स्तनाचा कर्करोग, आतड्याचा कर्करोग, अन्ननलिकेचा कर्करोग यांचा समावेश आहे. डब्ल्यूएचओ सांगते की, असे अनेक देश आहेत जिथं लोकांना हे देखील माहिती नाही की दारू प्यायल्याने देखील कर्करोग होतो. डब्ल्यूएचओच्या या माहिती नंतरही जर तुम्ही तुमच्या मुलांना सर्दी-खोकल्यावर औषध म्हणून अल्कोहोलयुक्त पेयाचे काही थेंब दिले तर त्याचा मुलांच्या आरोग्यावर खूप वाईट परिणाम होऊ शकतो. या मुलाला जीवघेणा आजाराचा धोका वाढतो. (Top Marathi News)
रम ही उष्ण असते. उसाच्या बायप्रोडक्टपासून रम बनवण्यात येते. तर ब्रँडी बनवण्यासाठी फळांचा रस आणि डिसिल्ड वाइनचा वापर केला जातो. थंड हवेच्या प्रदेशातील लोक जास्त करुन रम किंवा ब्रँडी पितात. हिवाळ्यात संध्याकाळी एक रम किंवा ब्रँडी प्यायल्याने शरीरात उष्णता निर्माण होते, असा दावा केला जातो. सर्दी-खोकला यांसारखे आजार ब्रँडी आणि रम प्यायल्याने अनेक आजार दूर होतात, असा देखील दावा केला जातो. सांधे दुखी तसंच अर्थराइटिसवर देखील रम घेतल्याने आराम मिळतो, असे सुद्धा अनेक लोकं सांगतात. एवढेच नाही तर, हृदयासंबंधी आजार, आर्टेरी ब्लॉकेज, श्वसनाचे विकार हे देखील रम किंवा ब्रँडीमध्ये असलेल्या फ्लामेटरी गुणधर्मांमुळे दूर होतात असे सांगितले जाते. (Latest Marathi Headline)
दारू प्याल्याने शरीरात उष्णता निर्माण होते, याला विज्ञानही दुजोरा देते. म्हणजेच जे अल्कोहोल जितके स्ट्रॉग असते तितकीच जास्त उष्णता शरीराला मिळते. मात्र यामुळं आजार ठिक होतात हा दावा मात्र आधारहीन आहे. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, अल्कोहोलमुळं शरीराला नुकसान होते. रम असो किंवा ब्रँडी यामुळं तुमच्या शरीरातील रोग प्रतिकारशक्ती कमजोर करते. अल्कोहोल एक जंतुनाशक असल्याने देखील अनेकांचे म्हणणे असते, जे शरीरातील जीवाणू नष्ट करते. अल्कोहोलमध्ये स्थानिक जंतुनाशक असतात जे कोणत्याही पृष्ठभागावरील काही जीवाणू नष्ट करू शकतात. पण शरीरातील बॅक्टेरिया मारल्याच्या प्रकरणात तथ्य नाही. (Top Trending News)
========
Migraine : हिवाळ्यात वाढतो का माइग्रेनचा धोका? तज्ज्ञांनी दिले महत्त्वाचे मार्गदर्शन
Thyroid : जगभरात वाढत आहेत थायरॉईड कॅन्सरचे रुग्ण ही आजारपणं लाइलाज आहे का ?
========
रमच्या सेवनाने थंडीपासून आराम मिळतो, असाही अनेकांचा समज आहे. असे अजिबात नाही. अल्कोहोलमुळे व्हॅसोडिलेशन होते, ज्यामुळे रक्तवाहिन्या रुंद होतात आणि समस्या आणखी वाढू शकते. अनेक लोक असे मानतात की कफ सिरपमध्ये अल्कोहोल असते ज्यामुळे खोकला बरा होतो. हे खरे आहे की अनेक सिरपमध्ये अल्कोहोल असू शकते परंतु त्याचे प्रमाण खूपच कमी असते. कफ सिरपमध्ये अल्कोहोल जोडले जाते कारण औषधाचे काही घटक पाण्यात विरघळत नाहीत, ज्यामुळे अल्कोहोल खूप कमी प्रमाणात त्यात मिसळले जाते. (Social News)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
