Home » भूतानी बांधलेले ‘हे’ शिवमंदिर तुम्हाला माहिती आहे का?

भूतानी बांधलेले ‘हे’ शिवमंदिर तुम्हाला माहिती आहे का?

by Team Gajawaja
0 comment
Shiva temple
Share

भारतात अनेक शिवमंदिरे आहेत आणि त्या प्रत्येक शिवमंदिराबाबत एक कथा सांगितली जाते. मध्य प्रदेशमधील सिहोनिया येथील एक शिवमंदिर तर चक्क भुतांनी बांधलेले आहे, अशी आख्यायिका सांगण्यात येते. फक्त चुन्याच्या आधारानं बांधण्यात आलेल्या या मंदिराला 1000 वर्ष होऊन गेली आहेत. काहीसे अपूर्ण वाटणारे हे मंदिर मात्र गेली अनेक वर्ष ज्या स्थितीत आहे, तसेच आहे. या मंदिरानं अनेक वादळं सोसली, भूकंप झाले,  मात्र मंदिरावर त्याचा काहीही परिणाम झाला नाही. मध्य प्रदेशमधील मुरैना जिल्ह्यातील सिहोनियन शहरात हे शिवमंदिर आहे. सिहोनियापासून सुमारे दोन किमी अंतरावरून हे मंदिर पाहता येते. हे शिव मंदिर जमिनीपासून सुमारे 115 फूट उंचीवर आहे. मंदिर किंचित उध्वस्त अवस्थेत असून मंदिरात प्रवेश करताच भक्तांना प्रथम मंदिराचे तुटलेले अवशेष जमिनीवर पडलेले दिसतात. या मंदिराच्या अशा भग्न अवस्थेमुळेच हे मंदिर भुतांनी बांधले असल्याचे सांगण्यात येते. हे मंदिर म्हणजे काकणमठ शिवमंदिर. भगवान शिवाच्या आज्ञेनुसार या मंदिराची उभारणी भुतांनी करायला सुरुवात केली. मात्र पहाट झाल्यानं मंदिराला ज्या अवस्थेत आहे, तसेच सोडण्यात आल्याचे स्थानिक सांगतात. पण हे मंदिर अर्धवट असले तरी येथे येणा-या भक्तांच्या संख्येत कधीही कमी झाली नाही. उलट मंदिराची वाढती लोकप्रियता पाहता, येथे येणा-या पर्यटकांची संख्याही अलिकडे वाढली आहे. या भुताच्या मंदिराबाबत, म्हणजे काकणमठ शिवमंदिराबाबत आणखीही काही उत्सुकता पूर्ण कथा प्रसिद्ध आहेत.(Shiva temple)

मध्य प्रदेशातील सिहोनियामधील 1000 वर्षे जुने असलेले काकणमठ मंदिर अनेक शिवभक्तांच्या आस्थेचे स्थान आहे. हे शिवमंदिर एका रात्रीत भुतांनी तयार केल्याचे सांगितले जाते. हे प्राचीन मंदिर भगवान शिवाला समर्पित आहे. मंदिरात जाण्यासाठी भक्तांना अनेक पायऱ्या चढाव्या लागतात. त्यानंतर भक्त मंदिराच्या गाभा-यातील पुरातन शिवलिंगाचे दर्शन घेऊ शकतात. या मंदिरात प्रवेश करताना मंदिराचे भग्न अवषेश समोर येतात. मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी दोन्ही बाजूला असलेले खांब दिसतात. या प्रत्येक खांबावर भगवान शंकराच्या अनेक प्रतिमा काढलेल्या आहेत. मंदिराच्या आवारातही अनेक दुसरी लहान मंदिरे असून त्यांचीही पडझड झाली आहे. यातील देवीदेवतांच्या मुर्ती या भग्न अवस्थेत आहेत. या मंदिर परिसरात अनेकवेळा मुस्लीम राज्यकर्त्यांनी आक्रमणे केली आहेत. त्याचा परिणाम म्हणजेच या भग्न मुर्ती असल्याचे सांगण्यात येते. पण असे असले तरी मुळ शिवमंदिराचा ढाचा कोणत्याही आक्रमणकर्त्यांना तोडता आला नाही.  यातच या मंदिराचे वैशिष्ट आहे.  या मंदिरावर अनेकवेळा आक्रमण झाले. मंदिराच्या परिसरातील लहान मंदिरांना तोडण्यात आले, त्यातील मुर्ती काढून टाकण्यात आल्या.  पण अपूर्ण अवस्थेतील या शिवमंदिराला मात्र कोणीही नुकसान पोहचू शकले नाही. या मंदिरातील प्रत्येक दगडाचा हिशोब कोणीतरी अज्ञात शक्ती ठेवते असे सांगण्यात येते. त्यामुळे या भागातून कुठल्याही वस्तू किंवा मुर्ती अन्य ठिकाणी नेण्यात आलेल्या नाहीत. (Shiva temple) 

काकणमठ शिवमंदिर (Shiva temple) 11 व्या शतकात बांधले गेल्याचे काही स्थानिकांचे म्हणणे आहे. येथे असलेल्या कचवाह वंशाचा राजा कीर्ती याने आपल्या पत्नीसाठी हे मंदिर उभारले. राजी कीर्ती याची पत्नी राणी काकणवती ही भगवान शिवाची महान भक्त होती. जवळच शिवमंदिर नसल्यामुळे राणीला शिवाची पूजा करता येत नव्हती. त्यामुळे राजानं हे शिवमंदिर बांधले.  मंदिराला राणी काकणवती यांच्या नावावरून काकणमठ नाव पडल्याचे सांगण्यात येते. हे मंदिर प्रथम बघितल्यावर ते कोसळणार आहे असे वाटते. पण आश्‍चर्याची गोष्ट म्हणजे मोठमोठे वादळही या मंदिराला हलवू शकले नाही. या मंदिराच्या आजूबाजूला नेक दगड पडलेले आहेत. पण हे दगड कोणी नेण्याचा प्रयत्न केला तर त्या व्यक्तीला ते शक्य होत नाही. या मंदिरासाठी वापरलेले दगड हे या परिसरात कुठेही आढळून येत नाहीत.  मुळात मंदिरासाठी साधा चुनाही वापरण्यात आलेला नाही.  फक्त दगडावर दगड रचण्यात आले आहेत. या काकणमठ शिवमंदिराची अनेकवेळा तज्ञांनी पहाणी केली आहे.  त्यांनाही आश्चर्यकारक अशा या घटनांची नोंद केली आहे. मंदिराच्या उभारणीसाठी वापरलेला दगड हा या परिसरात कुठेही मिळत नाही.  1000 वर्षानंतरही हा दगड मजबूत आहे.  त्यामुले परिसरातील अनेकांनी हे पडलेले दगड नेण्याचा प्रयत्न केला.  पण त्यावेळी त्यांना कुठलासा भास झाल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे या मंदिराभोवती आणखी गुढ निर्माण झाले आहे.  

=========

हे देखील वाचा : श्री खाटू श्याम मंदिराचा होतोय विकास

=========

चंबळच्या दऱ्याखोऱ्यात असलेले हे काकणमठ शिवमंदिर 10 किलोमीटर अंतरावरूनही दिसते. मंदिराचे आणखी वैशिष्ट म्हणजे, या मंदिराच्या जवळ गेल्यावर या मंदिराचा प्रत्येक दगड हवेत लटकला आहे, असे जाणवते. पण हे लटकलेले दगड आहेत, त्या अवस्थेत गेली अनेक वर्ष असल्याचे सांगण्यात येते.  त्यामुळेच या शिवमंदिराची (Shiva temple) ख्याती झाली आहे. हा परिसर दिवसभर भक्तांनी गजबजलेला असतो.  सोमवार आणि शिवरात्रीलाही दिवसभर भक्तांची येथे गर्दी असते. मात्र सायंकाळी या मंदिर परिसरात कोणीही रहात नाही.  या मंदिर परिसरात काही शक्तींचा त्यानंतर वावर असतो, असे स्थानिक सांगतात. अनोख्या वास्तुशास्त्राचा नमुना असलेले हे मंदिर कितीही गुढ कथांनी भरलेले असले तरी  120 फूट उंचीच्या या मंदिरात भक्तांची कायम गर्दी असते.  भगवान शंकराचे जागृत स्थान म्हणून मंदिराचा उल्लेख करण्यात येतो.  तसेच तेथील उदभूत वास्तुकला बघण्यासही पर्यटकांची गर्दी असते.  

सई बने


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.