Home » अबब! या पाच देशात तीन महीने रात्रच होत नाही…!

अबब! या पाच देशात तीन महीने रात्रच होत नाही…!

by Team Gajawaja
0 comment
Do you Know
Share

सूर्योदय झाल्यावर आपल्या दिवसाची सुरवात होते. भारतीय संस्कृतीत सूर्याला आपण देवस्थानी मानतो. वैज्ञानिकदृष्ट्या बघायचं झाल्यास या सूर्यामुळेच पृथ्वीवर जीवन आहे. सूर्यप्रकाशामुळे आपल्या वाढीसाठी आवश्यक असं ‘ड’ जीवनसत्व मिळत असतं.

पण जर तुम्हाला कोणी सांगितलं की असे काही देश आहेत जिथे काही महीने फक्त दिवस असतो आणि तिथे रात्र  होतच नाही, तर तुमची काय प्रतिक्रिया असेल? हो हे खरं आहे!आज जगात असे पाच देश आहेत जिथे वर्षातले तीन महीने रात्रच होत नाही, किंवा तिथे सूर्यास्तच होत नाही. तर? (Do you Know)

तसं बघायला गेलं तर, हे जग अद्भुत गोष्टींनी भरलेलं आहे. आपल्या आजूबाजूला अशा अनेक गोष्टी आहेत… ज्याबद्दल आपण अजूनही उत्तरं शोधत आहोत. एखादी गोष्ट अशीच का? त्याचा आकार असाच का? त्याचा रंग असाच का? त्याचा वास असाच का? असे ना ना तऱ्हेचे प्रश्न आपल्याला पडत असतात आणि ते  स्वाभाविकच आहे. या सृष्टीचा निर्माता कोण? हे महासागर, या नद्या, झाडं, प्राणी, पक्षी यांची उत्पत्ती कशी झाली… ? देव खरंच आहे का? त्याचं अस्तित्व सिद्ध करता येईल का? एका बाजूला विज्ञान आणि दुसऱ्या बाजूला धर्म… हे एक न संपणारं कोडं!

आपल्या पृथ्वीबद्दल बोलायचं झाल्यास या अशा अनेक अद्भुत गोष्टी आपण अनुभवू शकतो आणि त्या खऱ्या आहेत. त्याच्या मागेसुद्धा विज्ञान आहे. म्हणजे आपला दिनक्रम सुरू होतो तो सकाळी. आपण दिवसा काम करतो, रात्री झोप घेतो. हे आपलं दैनंदिन आयुष्यातलं दिनचक्र आहे. जे अव्याहतपणे चालू असतं. 

एका दिवसात चोवीस तास असतात. सम प्रमाणात दिवस आणि रात्र यामध्ये विभागणी करायची झाल्यास, आज आपला बारा तासांचा दिवस तर बारा तासांची रात्र असते (अर्थात यामध्ये चढ-उतार होत असतात). हे झालं सर्वसाधारण दिवस रात्र यांचं चक्र. पण आज आपण अशा देशाबद्दल माहिती घेणार आहोत – (Do you Know)

१ अलास्का (अमेरिका) – 

हा अमेरिकेतला म्हणावं तर निर्जन प्रदेश. जिथे तापमान उणे अंश सेल्सिअस असतं. हा प्रदेश अमेरिकेने रशियाकडून विकत घेतला. अलास्का त्याच्या निसर्गसौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. अलास्का हा एक बेटासारखा प्रदेश. जगभरातून लोक हा प्रदेश कसा आहे हे पाहाण्यासाठी येतात. या प्रदेशाचं वैशिष्ट्य म्हणजे इथे मे ते जुलै म्हणजे तीन महीने सूर्यास्तच होत नाही. 

====

हे देखील वाचा: Canada declares National emergency : भारतामधील कृषी आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या कॅनडामध्येच राष्ट्रीय आणीबाणी घोषित!

====

२ कॅनडा – 

कॅनडामध्ये जवळपास वर्षभर हिमवृष्टी होत असते. हा बर्फाछादीत प्रदेश म्हणूनच जगभरात प्रसिद्ध आहे. इथे जवळपास पन्नास दिवस सूर्यास्तच होत नाही. म्हणूनच इथले नाईटक्लब हे पन्नास दिवस डे अँड डे क्लब मध्ये बदलले जातात. थोडक्यात दिवसभर हे क्लब चालूच असतात. शेवटी लोक आता आपल्या देशात संध्याकाळ कधी होईल आणि सूर्य कधी मावळेल याची वाट पाहत असतात.

३ फिनलंड – 

जवळपास एकहजार तळी असलेला आणि अनेक बेटांचा मिळून बनलेला हा निसर्गसंपन्न देश. जगभरातले लोक या देशातलं नितळ सौन्दर्य पाहण्यासाठी निसर्गसंपन्नतेचा अनुभव घेण्यासाठी खास येतात. या देशाला वर्षभर भेट देतात. जेव्हा फिनलंडमध्ये उन्हाळा ऋतु चालू होतो तेव्हापासून पुढचे तीन महीने सूर्यास्त होत नाही. सतत दिवसच असतो. 

४ आईसलँड – 

आईसलँड हा जगातल्या काही देशांपैकी असा देश जिथे जवळपास बरेचसे महीने बर्फ पडत असतो, तसंच थंडी पण खूप असते. मे ते जुलै इथे सूर्यास्त होतच नाही. 

====

हे देखील वाचा: Russia -Ukraine Crisis: रशिया – यूक्रेन संघर्षामध्ये भारताची भूमिका कोणती?

===

५ नॉर्वे – 

जगातला अजून एक निसर्गसंपन्नतेने विपुल असलेला प्रदेश म्हणजे नॉर्वे.  युरोप खंडाच्या उत्तरेला असलेला हा देश. नॉर्वेच्या हॅमरफेस्ट या शहरात तर ७६ दिवस प्रकाशच असतो आणि केवळ चाळीस मिनिटे सूर्यास्त होतो. म्हणजे १२.४० ला सूर्य मावळतो आणि लगेचच म्हणजे १.३० ला सूर्योदय होतो. म्हणूनच या देशाला कंट्री ऑफ मिडनाईट सन (Country Of Midnight Sun) असंसुद्धा म्हणतात.

नॉर्वेतल्या एका शहरात तर उलटी परिस्थिती आहे. या गावात शंभर वर्ष सूर्यकिरणच पोहोचले नाहीत, कारण त्या गावाचं स्थान असं आहे की ते सगळ्या बाजूनी डोंगराने वेढलेलं आहे. त्यावर वैज्ञानिकानी गावात सूर्यप्रकाश यावा यासाठी एक शक्कल लढवली. डोंगरावर आरसे उभे करून त्यातून किरण परावर्तित होऊन ते या गावामध्ये पोहोचतील, अशा पद्धतीने ते आरसे उभे केले.  (Do you Know)

तर हे आहेत जगातले पाच देश जिथे सूर्यास्तच होत नाही.  

-निखिल कासखेडीकर


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.