Home » Health : योगाभ्यासाची सुरुवात ‘या’ योगासनांनी करा

Health : योगाभ्यासाची सुरुवात ‘या’ योगासनांनी करा

by Jyotsna Kulkarni
0 comment
Health
Share

आजच्या काळात आरोग्य ही सगळ्यांसाठीच खूप मोठी समस्या बनताना दिसत आहे. कारण चुकीच्या जीवनशैलीमुळे आणि खाण्याच्या चुकीच्या सवयींमुळे अनेकांना खूपच कमी वयात मोठे आजार होताना दिसत आहे. त्यामुळे सगळ्यांनीच आता तरी भविष्यातील धोका ओळखून आजपासूनच पौष्टिक आणि सकस आहार आणि दररोज न चुकता व्यायाम केलाच पाहिजे. ज्यांना जिममध्ये जाऊन व्यायाम करायला जमत नसेल तर त्यांनी घरच्याघरी योगासनांचा अभ्यास केला पाहिजे. दुसरीकडे बरेच लोकं हळूहळू का असेना लोकं आता आपल्या आरोग्याबद्दल सजग होऊ लागले आहेत. अनेकांनी आता घरच्याघरी योगा करण्यास सुरवात केली आहे, तर काही करणार आहेत. मात्र योगा करताना नक्की कोणत्या योगासनांपासून सुरुवात करावी? हे समजत नसेल तर हा लेख नक्कीच तुमच्यासाठी आहे. योगासनांचा अभ्यास सुरु करताना आधी कोणती आसने करावे ते जाणून घेऊया. (Health)

अधोमुख श्वानासन 
अधोमुख श्वानासनामुळे संपूर्ण शरीराला चांगला ताण आणि ताकद मिळते. या आसनाचा सराव केल्याने तणाव, नैराश्य आणि निद्रानाश यांसारख्या समस्यांवर मात करण्यास मदत होते. योगा मॅटवर पोटावर झोपा. श्वास घेताना शरीराला पाय आणि हात वर उचलून टेबलासारखा आकार द्या. श्वास सोडताना हळूहळू हिप्स वरच्या बाजूस करा. शरीर उलट्या ‘V’ आकारात बदलेल याची खात्री करा. या आसनाचा सराव करताना खांदे आणि हात सरळ रेषेत राहिले पाहिजेत. पाय हिप्सच्या ओळीत असतील. आता हात जमिनीच्या दिशेने दाबा. मान लांब करण्याचा प्रयत्न करा. काही सेकंद धरा आणि त्यानंतर गुडघे जमिनीवर ठेवा. (Todays Marathi Headline)

Health

ताडासन
ताडासन हे आसन तुमचा तणाव दूर करण्यासाठी तसेच तुमच्या मेंदूला शांत करण्यासाठी फार महत्त्वाचे आहे. तसेच या आसनामुळे शरीरावर तुमचा तोलही नीट राहतो. यासाठी एका जागेवर दोन पायांवर ताठ उभे राहा. समोरच्या दिशेने पाहा. त्यानंतर दोन्ही हात हळूहळू वर घ्या. आणि एकमेकांना जोडा. हे करत असताना कानाला टच करून खांदे वर करा. डोकं सरळ ठेवा. आसना दरम्यान १५-२० वेळा दिर्घ श्वास घ्या. मात्र जर तुम्हाला मायग्रेनचा त्रास असेल, चक्कर येत असेल तर हे आसन करणे टाळा. (Latest Marathi News)

Health

वृक्षासन
या आसनात झाडाप्रमाणे उभे राहून आणि संतुलन राखून केले जाणारे वृक्षासन हे नव्याने योगा शिकणाऱ्यांसाठी योग्य आसन आहे. हे आसन लक्ष केंद्रित करण्यास आणि संतुलन साधण्यास मदत करते. या आसनाच्या सरावा दरम्यान, तुम्ही श्वासोच्छ्वास संतुलित करण्यास आणि एका पायावर शरीर संतुलित करण्यास शिकता. योगा चटईवर सावध मुद्रेत सरळ उभे रहा. दोन्ही हात मांड्याजवळ आणा. उजवा गुडघा हळूहळू वाकवून डाव्या मांडीवर ठेवा. या दरम्यान डावा पाय जमिनीवर घट्ट ठेवावा. डावा पाय सरळ ठेवा आणि श्वासोच्छवासाचा वेग सामान्य करा. हळू हळू श्वास घेताना दोन्ही हात वर करा. दोन्ही हात वर घेऊन ‘नमस्कार’ करण्याची मुद्रा करा. पाठीचा कणा सरळ ठेवा. आतून दीर्घ श्वास घेत राहा. श्वास सोडताना शरीर सोडा. हळूहळू हात खाली आणा. आता उजवा पायही जमिनीवर ठेवा. तुम्ही मुद्रेच्या आधी जसे उभे होतात तसेच उभे रहा. आता हीच प्रक्रिया डाव्या पायानेही करा. (Top Marathi Headline)

Health

पश्चिमोत्तानासन
पश्चिमोत्तनासन हे योगशास्त्रातील एक अत्यंत महत्त्वाचे आसन आहे. हे आसन बसून आणि पुढे वाकून केले जाते. हा व्यायाम केल्यामुळे हॅमस्ट्रिंग्स, खालच्या आणि वरच्या पाठीला तसेच बाजूंना चांगला ताण मिळतो. नुकतेच योगासन सुरू केलेल्या प्रत्येक योगींसाठी पश्चिमोत्तनासन हे सर्वोत्तम आसन आहे. योगा मॅटवर दोन्ही पाय सरळ करून पसरवून बसावे. दोन्ही पायांमध्ये अंतर ठेऊ नये आणि शक्य असेल तेवढे पाय सरळच ठेवण्याचा प्रयत्न करावा. मान, डोके आणि पाठीचा कणा ताट ठेवावा. दोन्ही हात दोन्ही गुडघ्यांवर ठेवावे. डोके आणि धड हळू हळू पुढच्या दिशेने झुकवावे. गुडघे न वाकवता हाताच्या बोटांनी पायांच्या बोटांना स्पर्श करावा. एक दीर्घ श्वास घ्या आणि हळू हळू श्वास सोडा. डोके आणि कपाळाने गुडघ्यांना स्पर्श करण्याचा प्रयत्न करा. खांदे वाकवून कोपराने जमिनीला स्पर्श करण्याचा प्रयत्न करा. श्वास सोडत सोडत याच मुद्रेत काही काळ थांबावे. काही सेकंदानंतर पुन्हा पूर्वस्थितीत यावे. (Top Stories)

Health

सूर्यनमस्कार
सूर्यनमस्कार हा एक शक्तिशाली योगसनाचा प्रकार आहे. जो प्राचीन काळापासून भारतात प्रचलित आहे. यामध्ये १२ आसनांचा समावेश आहे. जो दररोज केल्याने तुमचे वजन कमी होण्यास मदत होतेच. शिवाय हृदयाचे आरोग्य, स्नायू, पचनसंस्था मजबूत होण्यास आणि ताण कमी करण्यास देखील मदत होते. १० ते १५ मिनिटे सूर्यनमस्काराचा सराव करणे पुरेसे आहे. (Social Updates)

Health

धनुरासन
धनुरासन हेसुद्धा एक महत्वाचे आसन आहे. जे तुम्ही तुमच्या व्यायाम दिनचर्येत निश्चितपणे समाविष्ट केले पाहिजे, कारण ते एकूण वजन कमी करण्यास प्रोत्साहन देते. हे योगासन पोटाची चरबी वितळवण्यासाठी विशेषतः प्रभावी आहे. ते तुमचे स्नायू मजबूत करते आणि तुमचे शरीर आतून मजबूत करते.

Health

=======

Happy Life Tips : आयुष्यात आनंदी राहण्यासाठी काय करावे? वाचा हे 5 सीक्रेट्स

=======

नौकासन
नौकासन तुम्हाला सडपातळ आणि मजबूत फिगर मिळविण्यात मदत करते. याला बोट पोज असेही म्हणतात कारण ते बोटीसारखे आकार तयार करते. ते तुमचे पोटाचे स्नायू, पाय, कंबर आणि मांड्या मजबूत करते. म्हणून, तुम्ही ते तुमच्या दैनंदिन दिनचर्येत समाविष्ट करू शकता. (Social News)

Health

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कोणताही दावा करीत नाही.)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.