उद्या अर्थात २१ ऑक्टोबर रोजी दिवाळीतील सर्वात महत्त्वाचा आणि मुख्य दिवस आहे, तो म्हणजे लक्ष्मीपूजन. पाच दिवसाच्या दिवाळीच्या सणात लक्ष्मीपूजनाला विशेष महत्त्व आहे. या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा केली जाते आणि आर्थिक भरभराटीसाठी देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवला जातो. दरवर्षी अश्विन अमावस्येला लक्ष्मीपूजन केले जाते. एका आख्यायिकेनुसार या दिवशी बलीच्या बंदिवासातून देवी लक्ष्मीची मुक्तता झाली होती, यामुळेच दिवाळीच्या अश्विन अमावस्येला लक्ष्मीपूजन करण्याची प्रथा आहे. शिवाय या दिवसाचे अजून एक महत्त्व म्हणजे तब्बल १४ वर्षांच्या वनवासानंतर प्रभू राम, सीता आणि लक्ष्मणासह अयोध्येत परतले होते. त्यांच्या स्वागतासाठी अयोध्यावासियांनी दिव्यांची आरास केली होती. तो दिवस आश्विन अमावस्येचा होता. त्यामुळे या अश्विन अमावस्येला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. (Laxmi Pujan 2025)
देवी लक्ष्मी ही धनाची, पैशाची, समृद्धीची देवता आहे. असे म्हटले जाते की, लक्ष्मी सोडून प्रत्येक व्यक्तीलाच या जगात पैशाची, धनाची गरज आहे. त्यामुळे गरीब असो किंवा श्रीमंत दिवाळीतील लक्ष्मी पूजनाच्या दिवशी देवी लक्ष्मीची यथासांग पूजा करतात. पूजेनंतर देवीकडे समृद्धीची प्रार्थना देखील केली जाते. तज्ज्ञांकडून अनेकदा लक्ष्मी पूजनाच्या दिवशी काही गोष्टींची खरेदी केल्यास नक्कीच त्याचा लाभ होतो असे सांगितले जाते. यामध्ये हळद, चांदी किंवा सोने, तुळशीचे रोप, कवडी घेतली जाते. यातली जी कवडी आहे तिला लक्ष्मी पूजनामध्ये खूप महत्त्व आहे. कवडी प्रत्येकाच्याच घरात असते. मात्र या दिवशी कवडीची खरेदी करणे शुभ असते. लक्ष्मी पूजनाच्या दिवशी कवडीचे महत्त्व काय असते आणि तिचा वापर करून कोणते उपाय केले जातात चला जाणून घेऊया. (Diwali)
कवडीला लक्ष्मी चे प्रतिक मानले जाते समुद्रातुन्न उत्पन्न झालेल्या बहुतेक वस्तुंचा संबंध या ना त्या कारणाने लक्ष्मी शी जोडला जातो. इतकेच काय तर लक्ष्मी ची पूजा करतांना त्यांचा आवर्जून उपयोग केला जातो. याचे कारण असे की लक्ष्मी ची उत्पत्ति समुद्रातुन्न झालेली आहे. (Todays Marathi Headline)
कवडी हे समुद्रात सापडणारे, एका प्रकारच्या गोगलगाईचे कवच आहे. शास्त्रीय दृष्ट्या सायप्रिइडी कुलातील सायप्रिया वंशाच्या सागरी गोगलगाईंच्या शंखांना कवडी म्हणतात. कवड्या विविध रंगांच्या, चकचकीत आणि सुंदर असल्यामुळे शंख-शपल्यांचे संग्राहक त्या मौल्यवान मानतात. पूर्वी आफ्रिकेत आणि भारतात कवड्यांचा नाण्यांप्रमाणे उपयोग व्हायचा त्याचप्रमाणे त्या दागिने म्हणून वापरत. तसेच सारीपाट, चौसर इत्यादी खेळांमधे याचा वापर दान टाकण्यास करण्यात येत असे. साधू-बैरागी-वासुदेव कवडीच्या माळा गळ्यात घालतात. गायी, बैल, घोडे, म्हशी इत्यादींच्या सुशोभनासाठी कवड्यांचा वापर करण्यात येतो. (Latest Marathi News)
हीच कवडी देवी लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे. देवी लक्ष्मी समुद्रकन्या आहे. त्यामुळे कवड्यांचा देवी लक्ष्मीशी नातं असल्याचे सांगितले जाते. पाच कवड्या घेऊन त्याला हळदीचा टिळा लावावा आणि लक्ष्मीच्या फोटोसमोर ठेवावा. ज्योतिषशास्त्रानुसार कवडी देवघरात ठेवल्याने देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो. लक्ष्मी पूजेमध्ये ११ पिवळ्या कवड्या ठेवाव्यात आणि त्यानंतर या कवड्या लाल कपड्यात बांधून तिजोरीत ठेवून द्याव्यात. यामुळे धनलाभाचे योग जुळून येऊ शकतात. (Top Marathi HEadline)
धार्मिक श्रद्धेनुसार, पांढरी कवडी हा समुद्रमंथनातून मिळणाऱ्या वस्तूंपैकी एक आहे आणि तो देवी लक्ष्मीचे प्रतीक मानला जातो. लाल कापडात गुंडाळून पूजास्थळी किंवा संपत्तीमध्ये ठेवल्याने संपत्तीचा मार्ग मोकळा होतो आणि गरिबी दूर होते. (Top Stories)
देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी देवी लक्ष्मीच्या पूजनाबरोबरच ११ सिद्ध कवड्यांचे पूजन करावे आणि ह्या कवड्याना पिवळ्या रंगाच्या कपड्यात बांधून त्या तिजोरीत किंवा आपल्या पैसे ठेवण्याच्या जागेत ठेवून द्यावे. ह्यामुळे देवी लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि आपली तिजोरी नेहमी पैश्याने भरलेली असते. आपल्या घरात सुखसमृद्धी आणण्यासाठी आपल्या घराच्या मुख्य दारावर ११ सिद्ध कवड्या लाल रंगाच्या कपड्यात बांधून ती कपडे लटकवून द्यावी असे केल्याने आपल्या घरात सुखसमृद्धी येते त्याचबरोबर आपल्या घरात कोणत्याही प्रकराची नाकारात्मक शक्ती प्रवेश करत नाही. (Top Marathi News)
दिवाळीत लक्ष्मीपूजनाच्या वेळी ५ पिवळ्या कवड्या आणि ९ गोमती चक्रे देवीकडे ठेवा. त्यानंतर पूर्ण विधीपूर्वक लक्ष्मी आणि गणेशाची पूजा करावी. त्यानंतर दुसऱ्या दिवशी लाल कपड्यात कवड्या आणि गोमती चक्र बांधून तिजोरीत किंवा कपाटात ठेवा. असे केल्याने घरात सुख-समृद्धी राहते. तसेच लक्ष्मी मातेच्या कृपेने कधीही आर्थिकसंबंधी कोणतीही अडचण येत नाही. (Latest Marathi Headline)
========
Laxmi Pujan : लक्ष्मी पूजनाच्या दिवशी लक्ष्मीला अर्पण करा ‘हे’ खास फुल मिळवा भरभराटीचा आशीर्वाद
========
दिवाळीच्या आदल्या शुक्रवारी केशर आणि हळदीच्या मिश्रणात ५ कवड्या ठेवाव्यात आणि नंतर लक्ष्मी देवीच्या बीज मंत्रांचा जप करावा. यानंतर माता लक्ष्मीच्या मंदिरात जाऊन पूजा करा आणि काही वेळ कवड्या तिथे ठेवा. पूजेनंतर या कवड्या लाल रंगाच्या कपड्यात बांधून तिजोरीत किंवा कपाटात ठेवाव्यात. असे केल्याने दिवाळीत मंगलमय वातावरण राहते आणि आर्थिक संबंधित समस्यांपासून मुक्ती मिळते. (Top Trending News)
दिवाळीत लक्ष्मीपूजनाच्या वेळी दिव्यात ५ कवड्या, काळी हळद आणि ५ अख्खी सुपारी धुवून लाल कपड्यात बांधून चांदीच्या भांड्यात किंवा पूजेच्या ताटात ठेवा. यानंतर, दुसऱ्या दिवशी त्यांना तिजोरीत किंवा कपाटात सुरक्षित ठेवा. असे केल्याने घरात लक्ष्मीचा वास सदैव राहील आणि तुमच्या जीवनात प्रगती सुरू होईल. (Social News)
(टीप : आम्ही केवळ ही माहिती म्हणून तुमच्यापर्यंत पोहचवत आहोत. कोणतेही उपाय करताना तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या.)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics